जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

नाते संबंध : आनंद शितोळे

निरपेक्ष भावनेने माणसांची नाती असावीत , जपावीत हा आदर्शवाद झाला.

प्रत्यक्षात माणसांची नाती जुळतात ती कुठल्यातरी अपेक्षेने , काहीतरी कमतरता आहे म्हणून.

कधी हि गरज भौतिक असतेय ,आर्थिक असतेय ,मानसिक असतेय,सांस्कृतिक असतेय,शारिरीक असतेय.

दोन माणसांमध्ये जेव्हा नात्याची गरज सामायिक असते किंवा परस्पर पूरक असते तेव्हा नाती रुजतात ,फुलतात ,टिकतात आणि दोन्ही माणसांना आनंद,समाधान देतात.

जेव्हा माणसांच्या गरजा, अपेक्षा भिन्न असतात किंवा परस्परविरोधी असतात तेव्हा नाती रुजत नाहीत.

बऱ्याचदा अश्यावेळी प्रथमदर्शनी जुळलेली नाती नंतर निरस ,बेचव होऊन जातात.

कधीकधी त्यांच ओझ वाटायला लागत.

वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्यालाच तपासायला लागतय भवताली असणारी माणस आपल्या आयुष्यात का आहेत.

ते समजल तर गुंते सहज सुटतात आणि सगळ सोप ,सरळ होऊन जातय.

रक्ताची नाती ह्याला बहुधा अपवाद असतात.

ज्या वातावरणात आपण वाढतोय तिथे ह्या नात्यांची अपरिहार्यता स्विकारायला लागतेय.

मग कधी अशी रक्ताची नाती माणसांना प्रचंड बळ देतात, माणसांना प्रेरणा देतात कधीकधी माणसांना पोखरून ,खच्ची करून निसत्व बनवतात.

कुठलेही असले तरी हे गुंते सोडवायला जमल पाहिजे.

सुख आणि समाधान ह्यातला फरक समजायला सुरुवात तिथूनच होते.

#आनंदग्यान
#नात्यांचा_गुंता
#जगण्याचा_पाया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!