येवलेवाडीत अंबिका फॅशन अँड बुटीक इन्स्टिट्यूटच्या शाखेचे उद्योजक श्री अशोक सावंत यांचे हस्ते उदघाटन संपन्न
पुणे : येथील येवलेवाडीत अंबिका फॅशन अँड बुटीक इन्स्टिट्यूटच्या शाखेचे उदघाटन उद्योजक श्री अशोक सावंत यांचे हस्ते संपन्न झाले.
प्रोजेक्ट ड्रीम ऑफ माय मदर' अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेश्मा सावंत यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या अंबिका फॅशन अँड बुटीक इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन दापोलीतील मिठाईचे उद्योजक असलेल्या श्री अशोक सावंत यांच्या हस्ते केले.
रेश्मा यांनी आत्ता पर्यंत शेकडो महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. त्यांना शक्य होईल ती सर्व मदत केली आहे. स्वतःचे दुकान ते इन्स्टिट्यूट आणि ब्रॅंचेस हा प्रवास खूप खडतर होता.
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे रेश्मा यांनी जग जिंकण्यासाठी कोरोना नंतर पुन्हा झेप घेतली. ह्या कार्यक्रमाला आणि रेश्मा यांना प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, वृषाली ताई कामटे, शितलताई सुरवसे, अश्विनीताई कदम, माहुरगड बचत गटाच्या सर्व महिलांनी उपस्थिती नोंदवून पाठिंबा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेश्मा सावंत यांनी केले तर आभार पूजा यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!