सिनेमॅटोग्राफ्री पद्धतीने लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे म्हणजे नेमकं काय ?
सिनेमॅटोग्राफ्री पद्धतीने लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे म्हणजे नेमकं काय हे गेली 17वर्षे या क्षेत्रात असणाऱ्या विनायक पाटील(साईंट्या फिल्मस्) या फोटोग्राफरच्या शब्दांत....
सिनेमॅटोग्राफी म्हणजे वधू वरांचे चित्रपटाच्या कथानकासारखे विशिष्ट गाणे डोक्यात ठेवून घटनाक्रमाने त्यानुसार करवून घेतलेले शुटींग किंवा फोटोग्राफी...
बऱ्याचदा फोटोग्राफर ग्राहकांना सिनेमॅटिक पध्दतीने लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ काढून देऊ असे म्हणतात परंतु ग्राहकांना त्याचा नेमका अर्थ कळत नाही. नुसतं लग्नाचे सर्व विधींचे फोटो काढणं आणि तेच सिनेमॅटिक पद्धतीने काढणं यातला नेमका फरक समजत नाही. फक्त सिनेमॅटिक म्हणजे खूप भारी एवढंच ते डोक्यात घेतात. चांगली व्हिडीओग्राफी , फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी करायची म्हणजे त्यासाठी आवश्यकता असते ती उच्च दर्जाच्या आधुनिक उपकरणांची...जी खूप कष्टाने आणि आशेने फोटो/व्हिडीओग्राफरने स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली असतात.. त्यात उच्च दर्जाचा कॅमेरा, लेन्सेस ,गिम्बल, फोटोचे लाईट्स, स्टँडस आणि सहकारी..इतका सगळा लवाजमा घेऊन फोटोग्राफर/ सिनेमटोग्राफर डोक्यात विशिष्ट गाणे ठेऊन कथानक ठेवून वेगवेगळ्या अँगलमध्ये स्टाईल मध्ये तो वधू वरांचे फोटो व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. व नंतर त्या डेटावर(केलेल्या शुटींग वर) सॉफ्टवेअर वापरून सिनेमातील गाणी( ग्राहकांच्या पसंतीची किंवा स्वतःच्या कुशाग्र बुद्धीने)वापरून त्याची चित्रपटाप्रमाणे प्रसंगांची मांडणी करतो. फोटो निवडून त्यावर एडिटिंग मिक्सिंग करून अल्बम डिझाईनला देतो. या सर्व कामात त्याचे कित्येक दिवस जातात. परंतु इतके सुंदर काम करूनही ग्राहक मात्र बऱ्याचदा तुमच्या आठवणी जपणाऱ्या या फोटोग्राफर/ व्हिडिओग्राफर/ सिनेमटोग्राफर ला त्याच्या कष्टाचा मोबदला त्याचा पगार वेळेवर देत नाहीत .. हीच एक मोठी खंत आहे..
जरुरी है जनाब कॅमेरा से तस्वीरें लेना भी..क्यूँकी आईना गुजरे लमहें नही दिखा सकता... पर जाने क्यूँ कदर ही नही की जाती ग्राहक के लमहोंको समेटकर रखनेवाले कलाकार की..
शब्दांकन व लेखन
सौ.विनिता विनायक पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!