जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

आरोग्यासाठी जगा । आरोग्यपूर्ण जगा ।।

कोरोना नावाचे भूत

मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे. अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात. अगदी प्रत्येक वर्षी मरतात. टी. बी. ने जगभर दरवर्षी 15 लाख लोक  मरतात. त्यातील फक्त भारतात पाच लाख लोक दरवर्षी मरतात. आज रोजी, अगदी आत्ता भारतात 27 लाख 90 हजार लोकांना टी. बी.ची लागण झालेली आहे. त्यातील किती मरतील हे या क्षणी सांगता येणार नाही. हे मरणाचे आकडे पाहिले आणि आजचा कोरोना पाहिला तर कोरोना हा सर्वात माईल्ड आजार आहे, असेच म्हणावे लागेल. गेल्या वर्षी भारतातील 67000 लोकांना डेंगू झाला होता.

कोरोना एक कॉमन कोल्ड

कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथामध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल. आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल. 
हे मी माझ्या मनाचे सांगित नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची गेल्या चार दिवसापूर्वी माझावर मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात. हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो. 

कोरोनाचा प्रसार

कोरोनाचा प्रसार हवेतून होत नाही. त्यामुळे आपण एकटे असताना किंवा आपल्या आसपास काही फुटांवर कोणी माणूस नसताना तोंडाला मास्क बांधणे अवैज्ञानिक आहे. कोरोनाचा आकार आहे, शंभर नॅनोमिटर. आणि आपल्या फडक्याची छिद्रे किती मोठी असतात, आपणास माहीत आहेच. मित्रांनो! आपण नव्हतो, तेव्हाही लाखो व्हायरस होते आणि आपण नसल्यानंतरही व्हायरस राहाणार आहेत. या विश्वातील सर्व प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, किटक, जिवाणू, विषाणू हे सर्व निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याबरोबरच आपणास आपले जीवन जगायचे आहे. या जगात सुमारे 2 लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत. आपण त्यांना टाळू शकत नाही. तर आपण स्वतःला अधिक सामर्थ्यशाली, शक्तीशाली बनवावे लागते. त्याच्या काही पद्धती आहेत. 

डर का माहोल

अनेक प्रकारच्या रोगांने मृत्यूचा आकडा पाहिला तर कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मात्र कोरोनाने झालेल्या मृत्यूचा स्फोट केला जातोय. जगात कुठेही कोणी कोरोनाने मेले तर लाखो-कोट्यवधी माध्यमांतून त्याची बातमी जगभर पसरवली जातेय. त्यातून एक फार मोठी भिती जनमानसामध्ये पसरली आहे. मरणाच्या बातम्या पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. चांगले झालेल्या लोकांचे आकडे फोकस करून सांगितले जात नाहीत. 

भीतीचे परिणाम

पूर्वी येऊन गेलेल्या साथीवर अनेक मानसशास्त्रज्ञांनी समाजातील लोकांचे सर्व्हे केले तेव्हा लक्षात असे आले की प्लेग, देवी वगैरे आजारांनी मेलेल्या लोकांपेक्षा नुसत्या भीतीने मेलेल्या लोकांची संख्या जास्त होती! कुठल्याही साथीला, आजाराला, परिस्थितीला सामोरे जायचे असते. भ्यायचे नसते. पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करायचा असतो. यातच माणसाचे मनुष्यपण आहे. पण आज जास्तीत जास्त भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम जणू काय मुद्दाम केले जातेय असे वाटायला लागते. त्याच्या ब्रेकिंक न्यूजचा विषय बनवला गेलाय. सामान्य माणसाला इतर गोष्टींची माहिती नसल्याने भीतीने ते अगदी गांगरून जातात. ही भीती का पसरवली जातेय, त्याचे कारण आहे.

डर का व्यापार

जितकी भीत मोठी तितका मोठा व्यापार करता येतो. हे व्यापार कोण करतं, हे आजपर्यंतच्या इतिहासाने पुनःपुन्हा दाखवून दिलेले आहे. या जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ जर कुठली असेल तर ती आहे, हेल्थ इंडस्ट्री.

सत्ता आणि सत्य

विज्ञान हे सत्यावर आणि तथ्यावर चालत असते आणि सत्ता किंवा सरकार हे पर्शेप्शनवर चालत असते. तेव्हा विज्ञान काय सांगते, आजपर्यंत जे जे संशोधन झालेले आहे, ते काय सांगते त्याच्याकडे जरा डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. वैज्ञानिक तथ्य जर समजून घेतले तर भीतीचे वातावरणही निवळेल आणि जगण्याचा सुंदर मार्गही सापडेल. स्वातंत्र्याच्या वातावरणात मुक्तपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या श्रद्धेला आपण जागे करूया. प्रेमाने प्रस्फुरीत झालेले आणि ज्ञानाने दिग्दर्शित केलेले विवेकी जीवन आपण जगूया. हा डर का माहोल योग्य नाही. तो वैज्ञानिक नाही. सत्यावर आधारित नाही. तो एक बाजारू फंडा आहे. सरकार काय सांगते आणि विज्ञान काय सांगते याचा विचार व्हायला हवा. 

माणसे का मरताहेत?

कोरोना एक कॉमन कोल्ड आहे, तर इतकी माणसे का मरताहेत? असा स्वाभाविक प्रश्न विचारला जातोय. 
1. त्याचे उत्तर असे की माणसे नेहमीच मरत असतात. ती जगभर मरतात. कोरोनाच्या नावावर जेवढी मरणे खपवली त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या आजाराने मरताहेत. संपूर्ण जगातील आकडा इतर रोगांच्या मानाने फारच कमी आहे. 
2. ज्या इटलीमध्ये जास्त माणसे मेली कारण इटलीत वृद्ध माणसांची संख्या जास्त आहे. म्हातारी माणसे काहीतरी निमित्त होऊन मरतातच. 
3. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माणसे उपचाराच्या पद्धतीमुळे जास्त मरताहेत! कोरोना झालेल्या माणसांवर जे प्रोटोकॉलनुसार उपचार केले जाताहेत त्यामुळे माणसे जास्त मरताहेत. कारण त्याच्यावर नको त्या औषधांचा मारा केला जातोय. त्यामुळे जीवनशक्ती अगदी कमकुवत होऊन जाते आणि मग शरीर साथ द्यायची सोडून देते. म्हणजे इथे रोगापेक्षा उपाय भयंकर आहे. 
गेल्या वर्षी इटलीमध्ये नुसत्या मलेरियाने दोन लाख लोक मेले होते. मात्र त्याच्या अशा बातम्या दाखवल्या नाहीत. त्याच्या ब्रेकिंग न्यूज आल्या नाहीत. म्हणून ते लोकांना माहीत नाही. ईश्वर ना करो, पण इटलीमध्ये अजून मरणाचा आकडा वाढू शकतो. कारण प्रत्येक वर्षी तिथे तेवढे लोक इन्फेक्शनने मरतातच. आय. एल. आय. म्हणजे इन्फ्लुएंझा लाईड इलनेस या आजाराने 20 हजारांहून लोक मेले होते. 

निसर्गाची व्यवस्था

साथी येतात-जातात, दुष्काळ, महापूर, भूकंप इ. नैसर्गिक गोष्टी घडणे हा एक नैसर्गिक भाग आहे. महामारी हे एक निसर्गाची बॅलन्सिंग व्यवस्था आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अनेक गोष्टींमध्ये विषमता निर्माण होते, सृष्टीचक्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्याचे बॅलंसिंग साधले जाते. ही व्यवस्थासुद्धा नैसर्गिक नियमाचाच एक भाग आहे. 
जन्म-मरण हे चक्र सातत्याने सुरूच आहे. निसर्ग काही आपल्या हातातील गोष्ट नाही. तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यापुढे निर्माण करीत असतो. त्या परिस्थितीला आपण सामोरे कसे जातो किंवा तिचा मुकाबला कसा करतो, तिला प्रतिसाद कसा व काय देतो, याच्यावर आपले जीवन, जगणे आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात. 

आपण व्हायरसला मारू शकत नाही

व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंढून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे. मग आपण काय करायचे? आपण जसे पडणाऱ्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो. नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढायी सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे. हा उपाय कोण सांगू शकते? जनमानसापर्यंत कोण घेऊन जाऊ शकते? हे काम डब्ल्यू. एच. ओ. करणार नाही. हे काम इंडियन मेडिकल असोशिएशन करणार नाही. हे काम फक्त आयुष मंत्रालय करू शकते. आता फक्त एकच आशा भारतातील आयुष मंत्रालयावर आहे. 

कोरोना इज कॉन्फरशी

फरिदाबाद निवासी डॉ. विश्वरूपराय चौधरी यांनी जानेवारीमध्येच सांगितले होते, की कोरोना ही एक कॉन्फरशी आहे. आता तर निकारूआ, ब्राझील आणि मॅक्सिकोचे अध्यक्षही जाहीरपणे म्हणताहेत की, कोरोना ही कॉन्फरशी आहे. ते एक षडयंत्र आहे! 

कोरोना एक हॉरर पिक्चर

तुम्ही कधी भुताचा हॉरर सिनेमा पाहिलाय का? आपल्याला माहीत असते की पडद्यावरचे भूत येऊन आपल्याला काहीही करणार नाही. तरीही आपण घाबरलेले असतो. हृदयाचे ठोके वाढलेले असतात. तसे आपल्या घरातल्या टी.व्ही.वर हा कोरोनाचा हॉरर पिक्चर सुरू आहे. घरातल्या छोट्या पडद्यावर आता त्याचा क्लायमॅक्स होत आलाय. काही दिवसांतच त्याचा दी एन्ड होईल! कोरोना हा एक हॉरर पिक्चरसारखाच भाग निर्माण केलाय. लक्षात ठेवा, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. तो 80 टक्के लोकांना झालेला माहीतही होत नाही. साधा आजार आहे. भिऊ नका. दक्षता घ्या. 

जीवन आणि दक्षता

फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जीवनात नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पदोपदी दक्ष राहावे लागते. थोडेसे लक्ष दुसरीकडे गेले तरी ठेच लागते किंवा खड्यात पाय जाऊ शकतो. दुर्लक्ष झाले तर अपघात होऊ शकतो. दक्षता ही जीवनभर नेहमीसाठी घेण्याची गोष्ट आहे. तशीच दक्षता घ्या. भीती नको. तुम्ही जर भीती बाळगली तर भीतीमुळे जीवनशक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते आणि नको तो आजार चिकटतो. त्यामुळे भीती सोडा आणि दक्ष व्हा!

औषधाने आजार बरा होत नाही

कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा. 

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

प्रतिकारशक्ती बलवान बनवण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला तर ती सबळ होऊ शकते. 
1. प्राकृतिक आहार – यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक फुड, फास्ट फुड खाऊ नये. प्राकृतिक मौसमी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश असावा. रोज पोट भरून फळे व भाज्या प्राकृतिक स्वरूपात म्हणजे कच्या स्वरूपात खावीत. नंतर तुम्हाला जे हवे ते खा. अन्न, पाणी आणि हवा याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे. 
2. योग्य तो व्यायाम – व्यायामामध्ये दम लागेपर्यंत चालणे, सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम (श्वासाचा व्यायाम) हा नित्य नियमाने व्हावा. प्राणायाम हा रोगनिवारणाचे कार्य करीत असतो. हवा ही एक दवा आहे. 
3. पुरेसा विश्राम – शांत आणि गाढ झोप घ्यावी. अति आवाज, गोंधळ, यांने स्नायू तानलेल्या स्वरूपात राहातात त्यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नाही. शरीरातील पेशी-पेशींला विश्रांती मिळाली पाहिजे. ती रोज झोपेत मिळते. पण शांत झोपच लागत नाही. त्यासाठी योगनिद्रेचा अभ्यास करावा किंवा रोज न चुकता जेव्हा जिथे वेळ मिळेल तिथे ध्यान करावे. तुमचे जे आताचे वय आहे, तुम्हास जेवढी वर्षे झालीत तेवढे मिनिटे रोज ध्यान व्हायला हवे. ध्यान करण्यासाठी न हालता स्थिर बसणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे तटस्थपणे पाहात राहाणे एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे. 

मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसासी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे, असे म्हणावे लागेल. 
स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!

अधिक देशमुख, पुणे
9850666581

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!