वीजचोरी... शिरजोरी... घरचेभेदी आणि बीड पॅटर्नची भीती
वीजचोरी...शिरजोरी आणि घरचेभेदी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक कारखान्यांनी आणि त्यांच्या वाहतूकदारानी बीड मधील टोळ्यांना उचल देऊन त्यांना ऊस तोडणीसाठी करारबद्ध केले आहे. ऊस तोडणीसाठी आलेले मजूर हे गायरान जागेत किंवा माळावर झोपड्या बांधून राहत आहेत. हे मजूर संध्याकाळ झाली की आकडा टाकून वीज घेत आहेत. हे बरेच लोक बघतात. पण वीज चोरीचा बीड पॅटर्न म्हणून बोलून अंगावर ओढून का घ्या अशी मानसिकता तयार झाली असल्यामुळे चुप्पी साधून आहेत.
गावातील कुण्या दीन पददलित गरीबाच लाईट बिल भरण्यासाठी उशीर झाला की लगेच त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात पटाईत असलेले वायरमन आणि वीज मंडळाचे अधिकारी अशा वीज चोरीकडे अर्थपूर्ण (?) नजरेने कानाडोळा करीत आहेत, असेच आज लोकांना वाटत आहे.
कराडचे प्रकरण आणि वंजारी समाजा बद्दल मीडियाने रंगवलेली भीती त्यामुळेही काही अधिकारी-वायरमन अशा मजुरांना प्रश्न विचारण्याचे धाडस करत नाहीत. याचाच गैर फायदा ही मजूर मंडळी उचलत असून, त्यांच्याकडे असलेल्या महागड्या फोनच्या चाजर्गिंसाठी आणि स्वतच्या सोयीसाठी सरळ सरळ आकडा टाकून वीज चोरी करीत आहेत. "१०- १२ led बल्बने अशी किती वीज वापरणार आहेत ते", असे त्या-त्या गावातील लाभार्थी राजकीय नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी- अधिकारी प्रति प्रश्न करून आवाज काढणाऱ्याचा आवाज दाबत आहेत. कारण कारखान्याची माणसे, त्यात बीडची माणस, कराडच्या समाजाची माणस म्हणून बोटं चेपे धोरण अवलंबने सर्रास चालू आहे.
पण ह्या वीज चोरीचा भुर्दंड सामान्य लोकांनी गरिबांनी का सोसावा. वायरमन किंवा वीज मंडळाचे अधिकारी ह्यावर काही कडक कृती करणार आहेत की नाही हा सर्व सामान्य ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे.
वीज चोरीचा हा बीड पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र लागू राहणार नाही कशावरून अशी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
तात्काळ अशा वीज चोरीवर प्रशासनाने न घाबरता आणि कुणाचीही भीड न बाळगता कडक कृती करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!