धर्मांधतेमुळे भारत संरक्षणाच्या बाबतीत दुर्बल...
धर्मांधतेमुळे भारत संरक्षणाच्या बाबतीत दुर्बल बनला आहे, माजी लष्करातील अधिकाऱ्यांची व्यथा...
एअर चीफ मार्शल अर्जुन सुब्रमण्यम यांचं स्पष्ट मत असं आहे की रिमोट सेन्सिंग आणि मानव रहित अवकाश संशोधन आणि अवकाश उड्डाण्याची क्षमता यामध्ये भारत आश्चर्यकारकरीत्या जपान आणि इजराइल सारख्या छोट्या राष्ट्रांच्या मानाने फारच मागे पडला आहे. 1950 मध्येच अमेरिका आणि सोवियत रशियाने कोल्ड वारच्या दरम्यान लष्करी उद्देशासाठी अवकाशात उपग्रह सोडले आणि त्यामुळे त्यांना भवितव्यातल्या स्टार वाॅरची कल्पना येऊ लागली अवकाशाचे लष्करी करण आणि अवकाशामध्ये युद्धजन्य शस्त्र ठेवणे यामध्ये फरक आहे .आक्रमकरीत्या शत्रूवर जमीन, अवकाश आणि समुद्र यावर हल्ला करता येण्याची क्षमता मिळवणे हे फार महत्त्वाचे आहे .आता नव्या #स्टार #वॉर मध्ये शत्रूचे उपग्रह उध्वस्त करण्याची क्षमता असणारे #उपग्रह किंवा शस्त्रे ही अवकाशात ठेवावी लागणार आहेत बहुतेक राष्ट्रांनी या अवकाश युद्धाची शक्यता गृहीत धरून आपली तयारी केली आहे पण हे सरकार त्याबाबत खूपच दुर्बल आहे. त्यांना फक्त पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी कोणतीच वैज्ञानिक प्रगती केली नाही असे खोटे नहाटे आरोप करण्यातच धन्यता वाटते.
एअर हाॅईस मार्शल #अर्जुन असे सांगतात की पृथ्वीपासून शंभर किलोमीटर उंचीवर कर्मन लाईन किंवा एअर स्पेस असे म्हटले जाते त्याच्या पलीकडे लष्कराची ताकद पोहोचण्यासाठी वेगळ्या पद्धतीची लष्करी सज्जता लागते आणि त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान असावे लागते ते भारताकडे नाही आहे.
येत्या पाच वर्षांमध्ये लष्करी उपयोगासाठी खास बनवलेले उपग्रह त्याच्यामध्ये सेंसर, रडार, क्षेपणास्त्रे असतील. अशा रीतीने भारत सुसज्ज झाला तर चीनच्या आकाशातील आक्रमणाशी तोंड देण्यास आपण सक्षम बनू.
#एअरव्हाईस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम यांनी दिलेला इशारा भारताच्या संरक्षणाच्या रीतीने फार महत्त्वाचा आहे. केवळ 16000 कोटीचे राम मंदिर बांधून , मंदिरासाठी मोठे मोठे रस्ते तयार करणे,कॉरिडॉर बांधणे यामध्ये जर भारताची आर्थिक आणि मानसिक शक्ती खर्च व्हायला लागली तर भारतावर बलाढ्य शक्तींचे आक्रमण थोपवता येणे कठीण होईल. धर्मांधते कडे देशाची वाटचाल होते आहे .ती थांबवायची असेल तर येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्याचा निर्णय जनतेने घ्यायलाच हवा .मोदी ,शाह, फडणवीस यांना दूर करा तर व्यवहारी भारत जगाच्या पाठीवर निदान स्वतःचे संरक्षण करू शकेल.
डॉ. सुभाष के देसाई
गारगोटी, कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!