महाराष्ट्रातही पोहण्याचे क्रीडा प्रकार सुरू करा : आंतरराष्ट्रीय खेळाडू
महाराष्ट्रातही पोहण्याचे क्रीडा प्रकार सुरू करा :आंतरराष्ट्रीय खेळाडू
मुंबई : आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी शिवसेना उपनेते ना. सचिनराव अहिर यांच्या मदतीने ना. आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यात कोरोनो काळात क्रीडा प्रशिक्षण आणि सरावाला लावलेली स्थगिती तत्काळ उठवून पोहण्याच्या क्रीडेला राजश्रय मिळवून द्यावा असे निवेदन दिले.
इंग्रजी भाषेत दिलेल्या या निवेदनातून त्यांनी शासनाला सांगितले आहे कि, इंडियन स्विमिंग फेडरेशन ने वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धा देशभर भरवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यातील स्विमिंग खेळाडूंनी नेहमीच या क्रीडाप्रकारात भारत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं मिळवून दिली आहेत. तद्वत इतर राज्यातील खेळाडूंनी आपला सराव व प्रशिक्षण ही सुरू केले आहे. स्विमिंग मध्ये काटेकोरपणे सातत्याने सराव केला तरच पोहण्याचे प्राविण्य टिकवून पदकांची लयलूट करता येते. कोविड १९ च्या लॉकडाऊन मुळे खेळाडूंच्या सरावावर बंधने आली आहेत, त्यामुळे देश-विश्वस्तरावर महाराष्ट्राचे नांव उज्ज्वल करण्याच्या या धडपडीला महाराष्ट्र शासनाने स्थगिती उठवून प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक खेळाडू स्वजबाबदारीने कोरोनो पासून दूर राहील अशी ग्वाही ही खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्या पालकांनी मंत्री महोदयांना दिली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते ना सचिनराव अहिर, ऑलिपमिक खेळाडू वीरधवल खाडे, संदीप शेजवळ, राष्ट्रीय खेळाडू रुद्रान्श मिश्रा हे उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!