विश्वगुरू ! छे...छे.... भारत हा तर तिसऱ्या जगातील देश
अज्ञानात सुख असतं किंवा ज्ञान भेटत असलं तरी ते नाही समजण्यात पण सुख असतं, याची खात्री भारत आता महासत्ता होणार, किंवा #भारत #विश्वगुरु होणार असल्या लबाड्यांवर विश्वास ठेवणाऱ्या भोळ्या भक्तांकडे बघितलं कि खात्री पटते.
जगात किंवा पृथ्वीवरील माणसाने केलेल्या प्रगती मध्ये आपण #भारतीय किती मागे आहोत याची साधी कल्पनाही करू शकत नाही. उगीच पन्नास वर्षे मागे आहोत, शंभर वर्षे मागे आहोत असं काही लोक म्हणतात. पण मला वाटतं आपण बरोबर दोनशे वर्षे मागे आहोत.
#1929 मधे जगात #आर्थिक #महामंदी आली होती. म्हणजे अमेरीकेत लाखो लोक रस्त्यावर आले, नोकऱ्या गेल्या, घरे गेली, त्यांना एक वेळची भाकरी पण मिळेनाशी झाली. त्याच काळात युरोप मधे पण आर्थिक महामंदी आली. जर्मन करंसीची किंमत ईतकी कमी झाली होती कि एखाद्या करंडीत भरून नोटा ठेवल्या तर लोक त्यातील नोटा फेकून देऊन करंडी घेऊन जात.
याचा अर्थ काय होतो?
याचा अर्थ होतो त्या काळी म्हणजे शंभर वर्षांपूर्वी अमेरीकन लोक, युरोपियन लोक उद्योगधंद्यांवर अवलंबून होते. तेवढे लोक शेती सोडुन इतर उद्योगधंद्यावर अवलंबून असावे लागतात. थोडक्यात मंदी येण्यासाठी अर्थव्यवस्था अगोदर विकसित व्हावी लागते.
भारताची काय स्थिती आहे?
भारताला कोणत्याच मंदीची डायरेक्ट तितकी झळ पोचत नाही जितकी पाश्चात्य जगाला पोचते. कारण भारतात मुळी उद्योगधंद्यावर तितके लोक अवलंबूनच नाहीत. म्हणजे भारतातील दोन त्रित्यंश लोक रानातुन येऊन भाकर तुकडा मोडत टीव्ही वरच्या बातम्या बघुन घाबरत घाबरत आमटी पातळ झाली म्हणून त्यात आजुन मिठ घालतात. आणि बाहेर येऊन चर्चा करतात,
"घातली आय आता काय खरं न्हाय मंदी येनार हाय म्हणत्यात?
मग त्यातलं कुणीतरी म्हणतं?
कोणती मंदी? खालच्या आळीची का? "
थोडक्यात आपण आजुन पण थर्ड वर्ल्ड कंट्रीच आहोत. आता थोडक्यात थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे काय आसतं ते सांगतो. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जग दोन गटात विभागलं.
१. पाश्चात्य विकसित भांडवलशाही देश
२. कम्युनिस्ट देश
आणि
३. जे पाश्चात्य विकसित भांडवलशाही देश पण नाहीत, आणि कम्युनिस्ट देश पण नाहीत. ते तिसऱ्या जगातील देश.
...अजुन आता तिसऱ्या जगातील देश म्हणजे काय?
तर ह्या देशांना आजुन आधुनिक विकास म्हणजे काय तेच माहीत झालेले नाही. थोडक्यात त्यांच्या दृष्टीने आपण गुहेत राहणारे आहोत. नव्वदच्या दशकात भारताला विकसनशील देश म्हणु लागले होते पण गेल्या पाच वर्षांत #थर्डवर्ल्ड चा दर्जा पुन्हा बहाल केलेला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
आपल्याकडे आता होत असलेले शेअर घोटाळे ते लोक विसाव्या शतकाच्या सुरुवातीस करत होते 😂. आता जी हिंडनबर्गने शॉर्ट सेलिंग करुन अडाणीला आणि आडाणीच्या बंधूंना दिवसा चांदणं दाखवलंय ते जर्मनीतील काही लोक #1924 मधेच प्लान करत होते आणि त्यांनी तसले राडे करुन बसलेत पण.
आणि त्यातून चालु असलेली अर्थव्यवस्था म्हणजे राज्य व्यवस्था उलथवून टाकून एक नवीन राज्य व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्लान करत होते. तेंव्हा आपल्याला माहीत नसतं पण बर्लिनचे रस्ते, बर्लिनच्या रस्त्यावरची वाहणे, आणि रस्त्याच्या कडेच्या ईमारती बघितल्या तर वाटतं.
भैंचो, भारतात आजुन 1924 च उजाडलेलं नाही. आणि आपल्याला हे लोक मंदिर मस्जिदच्या भांडणात जिंकुन विश्वगुरू बनन्याची स्वप्नं दाखवत आहेत.
Source: Social Media_Vikas Godage FB Wall
#Indianeconomy
#Economics
#economy
#marketdown
#thirdworld
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!