जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

पुरस्काराचे खरे अधिकारी... अन आप्पा धर्माधिकारी !

पुरस्काराचे खरे अधिकारी
 अन आप्पा धर्माधिकारी !

-पुरुषोत्तम आवारे पाटील

भारतात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सामाजिक कार्य आणि प्रबोधन याची उत्तम मशागत इथल्या संत आणि महापुरुषांनी करून ठेवली आहे. सामाजिक कार्य आणि परोपकार हा संस्कार म्हणूनच इथे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाच्या संस्कारात वेगळा टाकण्याची गरज पडत नाही. तांत्रिक भाषेत ज्याला '' इनबिल्ट'' म्हटले जाते अशा सामाजिक भानाचे आपण सगळे वाहक आहोत हे कुणाला वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. म्हणूनच इथल्या धार्मिक,राजकीय,आर्थिक अन सांस्कृतिक चळवळीतही सामाजिक कार्य किंवा परोपकाराला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. इथे कुणालाही स्वतंत्र काही करायचे असल्यास त्याचा आधार सामाजिक कार्य हाच निर्माण करावा लागतो. उद्या कुण्या बुवा,बाबाने छोटेसे धार्मिक दुकान जरी थाटले तरी त्याला याच कामाची ढाल पुढे करून प्रवास करावा लागतो. थोडक्यात समाजसेवा हाच आमचा स्थायीभाव बनला आहे. 
     समाजसेवेला सरकारी अधिष्ठान प्राप्त झाले की पुढचे अनेक कठीण मार्ग सोपे होतात ,सत्तेचा परिसस्पर्श झाला की समाजसेवेची इतरही दालने उघडी होतात आणि संस्था चालवणाऱ्यांचे नवकोट नारायण व्हायला लागतात. त्यासाठी सामाजिक कार्याची सरकार दखल घेत असते. सामाजिक कार्यात उत्तम कामगिरी करण्याऱ्या व्यक्तीं संस्था याना सन्मानित करीत  असते. लोकांच्या हितासाठी त्यांच्याच करातून चालणाऱ्या सरकारने समाजसेवा करणाऱ्या लोकांचा उत्साह नक्कीच वाढवला पाहिजे ही त्यामागील भावना असते. राज्य सरकार कडून दिले जाणारे महाराष्ट्र भूषण सारखे मोठे पुरस्कार त्याचाच एक भाग समजले जातात. १९९६ पासून सरकारने हा मानाचा पुरस्कार सुरु केला आहे. आजवर विविध क्षेत्रात कार्यरत २० व्यक्तींना सरकारने सन्मानित केले आहे. पुरस्कार जाहीर झाला की त्यावर होणारी ओरड पाहता '' दया कुछ तो गडबड है '' असे लोकांना का वाटते ? 
     आजवर ज्या वीस व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला त्यातील १२ लोक ब्राह्मण असणे हा आम्हाला काही दोष वाटत नाही मात्र इथल्या बहुसंख्य लोकांना त्यावर संशय घेण्याची वेळ का येते ? यावर सरकार मध्ये बसलेल्या विचारवंतांनी नक्कीच चिंतन करायला हवे. २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोकणातील रामदासी बैठकांचे प्रचारक आप्पा धर्माधिकारी याना जाहीर झाला. यापूर्वी त्यांचे पिताश्री नाना धर्माधिकारी याना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुळात धर्माधिकारी जसा धार्मिक संप्रदाय चालवितात तसे संप्रदाय या राज्यात असंख्य लोक चालवत आहेत , नेमके त्यापैकी बहुजन बाजूला सारत संघाचा विचार पेरणाऱ्या व्यक्तीच का निवडल्या जातात याचे उत्तर माहित न होण्याएवढा बहुजन समाज दुधखुळा राहिला नाही. जिस कि लाठी ऊस कि भैस हे तत्व आता सगळ्यांना पाठ झाले आहे. या पुरस्काराचे खरे अधिकारी सत्ता बाजूला टाकत यापुढे आणखी किती धर्माधिकारी सत्तेचे भूषण होतील याची चिंता राज्याला लागली आहे. 
       कोकणात आणि नजीकच्या जिल्ह्यात या धर्माधिकारी परिवाराने समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे तोंडी लावणारे उपक्रम घेऊन त्या आडून संघाचा विचार आणि अवैज्ञानिक संस्कार पेरण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचे या पुरस्काराने मूल्य वाढले आहे. केंद्रातील सरकारने अगोदरच पदमश्री देऊन या कामाला प्रतिष्ठा दिलेली आहेच वरून एकाच घरात दोन महाराष्ट्र भूषण येऊन पडल्याने सत्तेची मजबूत भिंत या कामाच्या मागे उभी राहिल्याचे प्रस्थापित झाले आहे. सरकारने कोणत्याही जाती,धर्माच्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात कुणाचीही हरकत नसते मात्र पुरस्कार सतत जेव्हा एखाद्या बाजूने झुकतात तेव्हा लोकांमधून तक्रारींचे सूर उमटायला लागतात. प्रतिभा हा काही कुण्या एका जातीधर्माच्या मक्ता राहिलेला नाही. सगळ्याच समूहातून तो प्रकट होत असताना सरकारने असा भेदभाव करायला नको. 
     राज्यात तात्यासाहेब साळुंखे,ज्ञानेश महाराव,भीमराव पांचाळे,सत्यपाल महाराज,हरी नरके,श्याम मानव,पुरुषोत्तम खेडेकर,मा.म. देशमुख ,चंद्रकांत वानखडे,अशी असंख्य नावे आहेत की ज्यांचा कामाचा परिचय करून द्यायचा असेल तर एखादा महाग्रंथ होईल ,एवढ्या उंचीची माणसं केवळ विचारांचे वाहक नाहीत म्हणून बाजूला ठेवली जात असतील तर लोकांमध्ये रोष निर्माण नक्कीच होईल. निखळ समाजसेवा,परोपकार किंवा अध्यात्मिक शिकवण देणाऱ्या असंख्य व्यक्ती बहुजन समाजात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. सरकारने दरवर्षी समतोल राखला जाईल या पद्धतीने या पुरस्कारांची घोषणा करायला हवी तरच पारदर्शकता पाळलीगेली याचा अनुभव लोकांना घेता येईल. या पुरस्कारांचे नाव बदलून ब्राह्मण भूषण करा अशी जी काही मागणी सोशल मीडियावर होतेय,त्याची वेळ का आली याचाही विचार सरकारने करायला हवा. धर्माधिकारी तुम्हाला योग्य वाटत असतील तर खुशाल निवडा पण त्याचे खरे अधिकारी वाळीत नका टाकू.

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!