मराठा महासंघाचा जेष्ठ खंदा समर्थक हरपला!
अखिल भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष कै.दिपक उर्फ आप्पा मिसाळ यांचे
२८ आॅगस्ट रोजी निधन झाल्याने एक खंदा समर्थक हरपल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली. सर्व जण त्यांना 'आप्पा' या नावाने आदराने बोलवत असत, इतक्या प्रेमळ स्वभावाचे पापभिरू व्यक्तिमत्व होते.
समाजाचे काम उभे करीत असताना सुरवातीच्या काळात तशी कार्यकत्यांची वानवा होती. तेंव्हापासून ४० ते ५० वर्षे मित्रत्व, पाहूणे या नात्याने आप्पा मराठा महासंघाशी जोडले गेले. कार्यकर्ता ते शहर उपाध्याक्षपर्यंत राहून आरक्षण लढ्यात असो, विविध कार्यक्रम असो आप्पा नेहमीच सहभागी असत. आप्पांचा मित्रपरिवार मोठा.
राजकीय मान्यवर, अधिकारी, वकील, पत्रकार यांच्या मध्ये आप्पांची सदैव ऊठबस. याचा फायदा संघटनेला झाला. आणीबाणी प्रसंगी मदतीला धावून जाणारे अजातशत्रू आप्पा व्यवसायात नेहमीच व्यस्त असत. थोरल्या भावाच्या आकस्मीत निधनाने मोठया कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना अनेक बाक्या प्रसंगी विशेषतः एका लहान भावांचा मृत्यू तर दुसर्या भावाचा प्रदिर्घ आजार अशा संकटांना धीराने तोंड देत पुतणे मुलांच्या साथीने आप्पा व्यवसायामध्ये व्यस्त राहिले.
अशा सामाजिक जाणीवा असणार्या आप्पांनी मराठा भवन कोल्हापूर येथे व्हावे यासाठी अनेक बुजूर्गाकडून मदतीचे शब्द घेतले होते. त्यांच्या निधनाने मिसाळ कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
तळमळीने झटणाऱ्या आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली!
वसंतराव मुळीक राष्ट्रीय उपाध्यक्ष, चंद्रकांत चव्हाण, मारूती मोरे,शशिकांत पाटील,सर्जेराव चव्हाण, डाॅ.शिवाजीराव हिलगे, प्रकाश जाधव, शिवाजी मोरे, अवधूत पाटील
जिल्हा कार्यकारिणी अखिल भारतीय मराठा महासंघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!