वाढदिवसानिमित्त अभासेचे सचिन पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर : अखिल भारतीय सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजकार्याचा सुंदर आदर्श घालून दिला आहे. वाढदिवस साजरा करताना त्यांनी, त्यांच्या परिवाराने व मित्रमंडळींनी कोल्हापूर येथील अवनी चॅरिटेबल ट्रस्ट ला देणगी दिली. तसेच ट्रस्टमधील मुलींना शालेय साहित्य वाटप करून आनंदाचा क्षण वाटून घेतला.
या सामाजिक उपक्रमात अमरसिंहराजे जगदाळे सरकार, सौ.शिवानी सचिन पाटील, अपूर्वा मोरे, अभिजीत पवार आणि कुनाल वायंगडे उपस्थित होते. कार्यक्रमावेळी ट्रस्टच्या व्यवस्थापिकांनी सचिन पाटील यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सचिन पाटील म्हणाले की, “समाजातील दुर्बल घटकांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हेच आमच्या जीवनाचे खरे समाधान आहे.”
अवनी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत अनाथ आणि गरजू मुलींसाठी शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसन क्षेत्रात सातत्याने कार्य केले जाते. सचिन पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या या सामाजिक योगदानामुळे ट्रस्टला आवश्यक साहाय्य मिळाले असून मुलींना नवचैतन्य मिळाले आहे.
#सामाजिककार्य #अखिलभारतीयसेना #सचिनपाटील #कोल्हापूर #AvaniCharitableTrust #AmarsinhrajeJagdaleSarkar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!