जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

राजीव गांधींनी 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला, तेव्हा मोदींची गॅंग गाईच्या शेणात पार बुडालेली होती

राजीव गांधींनी 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला, तेव्हा मोदींची गॅंग गाईच्या शेणात पार बुडालेली होती

१९८४ मध्ये राजीव भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. आणि, तरुणाईचा भारत घडवण्यात मग्न होते. 
आज जी 'डिजिटल इंडिया''ची चर्चा सुरू आहे, त्याचे जनक राजीवच. जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारावे, अशी 'तरूण' मांडणी तेव्हाच ते करत होते.

सॅम पित्रोदांसोबत राजीव यांनी कॉम्प्युटर युगाला भारतात वाट करून दिली, तेव्हा जे संसदेवर 'बैलगाडी मोर्चे' काढत होते, ते आज आम्हालाच 'डिजिटल इंडिया' समजावून सांगताहेत. 
ज्यांची पोरं आज 'सिलिकॉन व्हॅली'त आहेत, ते तेव्हा मात्र 'संगणक (आणि, आरक्षणही) हा भारतीय संस्कृतीवरचा हल्ला आहे', असं सांगण्यात मग्न होते.  

मोदींना नंतर ज्या 'डिजिटल इंडिया'साठी श्रेय दिलं गेलं, ती सारी नेपथ्यरचना राजीव गांधींनी तयार केली होती. 
राजीव यांचे विरोधकही ते नाकारणार नाहीत. 
त्यांच्याच विचारातून कॉंग्रेसने पुढे जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाला वाट करून दिली. 

मतदाराचे वय २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणले तेही राजीव गांधींनी. 
कारण, त्यांचा नव्या पिढीच्या समंजसपणावर भरवसा होता. 
या नव्या भारताचे जन्मदाते राजीवच. 

मात्र, सामाजिक समता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांसोबत हे नवे बदल आपल्याला करावे लागतील, यावर ते ठाम होते. तसे त्यांनी 'युनो'मध्ये भाषण करतानाही सांगितले होते. 
त्यामुळेच राजीव नव्या जगाचे नेते ठरले होते. 
म्हणून तर, जागतिकीकरणाला प्रवेश देणा-या कॉंग्रेसनेच पुढे मनरेगा, मध्यान्ह भोजन, अन्न सुरक्षा अशा योजनांनाही गती दिली. 

राजीव अकाली गेले नसते, तर भारताचे भवितव्य आणखी वेगळ्या शैलीत लिहिले गेले असते. 

नव-याच्या आणि बापाच्या मारेक-यांनाही माफ करत, त्यांच्या वारसदारांनी सहिष्णु, समंजस, सेक्युलर भारताची दिशा स्पष्ट केली.
खरा भारत तोच आहे, ज्यासाठी राजीव यांनी प्राणांची आहुती दिली!
 
- संजय आवटे  

#राजीव_गांधी_पुण्यतिथी/ २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!