समाजात तेढ वाढविणा-या
राष्ट्रद्रोही पत्रकारीतेचा देशविघातक वायरस रोखायलाच हवा....!!
अटक राहूल कुलकर्णीला झाली...
तिकडे दिल्लीत रूबिका सुधरली...!
भांडवलदाराचे चाकर बनून सत्तेच्या सिंहासनापुढे देशाचा बळी देणारे सत्ता धार्जिण्या पत्रकारीतेचा अंडरकरंट्स प्रचंड स्ट्राँग बनलेले आहेत . ते असेच मोडावे लागतील.
एबीपीने बातमी दिलेली देशात ३० टक्के कोरोना मरकजने पसरवला. उरलेल्या ७० टक्क्यांवर तोंड आवळून धरलं. पण हे तीस टक्के मोजले ते कशाच्या आधारावर ते सांगितले नाही.!!
याच एबीपी गृपने ICMR च्या हवाल्याने देशातील 8.50 लोक इंफेक्टड होतील अशी एक बातमी दिली होती. नंतर ICMR ला पुढं येऊन सांगावं लागलं अस काही नसून ती अफवा होती!!
सोलापूर ला कोरोना पेशंट सापडल्याची बातमी एबीपी माझा ने अचानक लावली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. त्याची जबाबदारी घेतली का?
कुरमुसे प्रकरणाशी काही संबंध नसताना भलत्याच रिजनमध्ये राहणाऱ्या राहुल कुलकर्णीने येऊन उडी मारायचा संबंध तरी काय?
संभाजी भिडेची सर्वात पहिली प्राईम टाईमवरील मुलाखत एबीपीनेच लावलेली. भिडेंचं शिक्षण देखील त्यांनीच सर्वात आधी वायरल केलेलं.!!
हिंदी एबीपीने चालवलेली थुंकण्याची, सिगरेट मागण्याची, नागडं फिरण्याची बातमी मराठीत एबीपीनेच आधी चालवलेली. नंतर ती ही काढून टाकली.!!
दुबईमध्ये नमाज पडतानाचा अग्निहोत्रीचा फोटो दाखवून बातमी केली की हे दृश्य भारतातील आहे.!!!
मग सीएम लाईव आले. अफवा पसरवणाऱ्यांना मी सोडणार नाही असा सज्जड दम भरला आणि दणादण बऱ्याच बातम्या गायब झाल्या.
मागे एकदा यांच्याच रिपोर्टरने नाशिकमधील अधिकाऱ्याची खोटी बातमी केलेली. त्यामुळे कित्येक दिवस त्यांना व त्यांच्या परिवाराला मानहानीकारक वातावरणात रहावं लागलं. नंतर न्यूज फेक असल्याचं सिद्ध झालं. तेव्हा बातमीदाराला काढलं गेलं. माफी मागून प्रकरण मिटवलं गेलं.
सावरकर चिकित्सा प्रकरणात शेपूट घालून माफिनामा सादर केलेला एबीपी माझा आता ऊर्मटपणे उभा आहे!
यातून त्यांच्या जाणीवेत नेणीवेत संघी नरेशन किती स्ट्राँग बसलेलं आहे याची कल्पना करता येईलच.!!
बाकी राहूल कुलकर्णीसारखे पत्रकार मुस्लिम प्रश्न व मुद्द्याचे रिपोर्टिंग, मराठा आरक्षणाचे रिपोर्टिंग ज्या संघी चष्म्यातून करत होता त्यावर स्वतंत्र लेख होईल.
अगदी मराठवाड्यातील मजूर स्त्रियांची बदनामी करणारा रिपोर्टही जोडीला घेता येईलच.!!
आता तो कुडमूड्या जोशी आहे की भटका जोशी याच्याशी घेणं देणं नाही.!!
देश विघातकी मनूवाद अंगात भिनायला ब्राह्मणच असावं असा नियम नाही. ते कोणत्याही जातीत असू शकतो!!
काल दुपारी अटक झाली. तेव्हापासून साम, लोकमतच्या अँकर्सचा आवेश जरा लिमिटेड झालाय.
अजून चार पाच केसेस होऊन अटक झाल्या की आपोआप सुतासारखे सरळ होतील.
म्हणजे लोकांना थेट सांगतील की बांद्र्याच्या प्रकरणानंतर एकापाठोपाठ एक असे भाजप नेते बाईट्स, मुलाखतीसाठी कसे उपलब्ध झाले?
सर्वांच्या वाक्यात स्क्रिप्टेड एकवाक्यता कशी होती, आणि उद्धव रिजाईन ट्रेंडमध्ये सर्व कसे सहभागी होते ते !!
पत्रकाराने खरं बोलावं, थेट बोलावं, चुकलं तर माफ कर म्हणावं.
पण पत्रकारानं अजेंडा रेटणारं बनू नये.
त्यानं खोटं बोलू नये.
शब्दांचे खेळ फक्त तुम्हालाच येतात या भ्रमातही राहू नये.
शहरांना आग लावू नका...
या शहरांत तुमचंही घर आहे हे लक्षात ठेवा....!!
कारण आग दुजाभाव करत नाही..!!!
साभार सोशल मीडिया
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!