लाँकडाऊनच्या आधी आणि लाँकडाऊन नंतर केंद्र आणि राज्य सरकारची पावले
कोणत्याही गोष्टीचा कामाचा एक प्लाँन असतो तो प्लाँन सुरवातीला करावा लागतो.
*जगातल्या देशाकडील* *अनुभवावरुन माहिती घेऊन*
*पण जसे नोटबंदीच्या वेळेस फक्त थोडे दिवस थांबा काळा पैसा सापडेल, अतिरेकी बनावट नोटा छापतात, रोज एक एक कारण देऊन फेकु शेठ लोकांना उल्लु बनवत होते., कोणत्याही गोष्टीची पुर्वतयारी नाही कि काही प्लाँन नाही.. ATM मशिन मध्ये ही नोटा निघत नव्हत्या शेवटी जुन्या ATM मशिन बदलावे लागले तेव्हा कोठे ( सर्वसामान्याचे हक्काचे पैसे ही त्यांना मिळत नव्हते आणि त्या नोटबंदीत बनावट नोटा तर सापडल्या नाहीतच*
*पण हजारो कोटीचा भ्रष्टाचार ही झालेला दिसतो कारण अर्थमंत्र्यांनी सांगितलेला अकडा आणि रिजर्व बँकेकडील अकडा यात ही तपावत होती.. असो*
*तसेच सध्या कोरोनाच्या या महामारीत झाले आहे बरयाच देशांचे हजारो लोक मृत्युमुखी पडत होते तरी आपले प्रधानमंत्री मोदी*
*" नमस्ते ड्रम " हा कार्यक्रम घेण्यात मग्न होते . (150 ते 200 कोटी खर्च झाला आणि आता त्याच ड्रम ने (भारताला) ( भारताच्या प्रधानमंत्र्याला धमकी ही दिली.) या कार्यक्रम घेण्याआधीच 30 जानेवारीला भारतात कोरोनाचा रुग्ण सापडला होता.,*
*पण सरकार जागे नव्हते.,*
*भविष्यातील चिंता जर असती तर सरकार जागे झाले असते*.
*मेडीकल इक्विपमेंट सारखा वस्तु सरकार 19 मार्च पर्यत निर्यात करत होते., त्या वेळी तर भारतात कोरोनाची भयानक परिस्थीती होती..*
*पण सरकार जाग्यावर नाही आणि विरोधी पक्ष ही त्याचे काम करत नाही*
*देशाबाहेरुन आणलेल्या या आजाराने मात्र येथील* *सर्वसामान्य ,गरीब माणुसाच्या प्रेताचे थर रचत चालले आहे आणि त्या बरोबर अत्यावश्यक सेवेत असणारे पोलिस, डाँक्टर,नर्सेस, आणि ईतर घटक ही . यांना साधे उच्च दर्जाचे मास्क ही कितीतरी दिवस देऊ शकले नाही., कि सँनिटाईजर वर कंट्रोल करु शकले नाही*
*जर मोदींना वाटत असते 23 ला लाँकडाऊन करायचा तर त्याआधी*
*भारतातील वेगवेगळ्या राज्यातुन माहिती मागवली असती*
*अत्यावश्यक सेवेत किती डाँक्टर आहे*
*किती पोलिस आहे*
*किती मेडीकल इंक्विपमेंट ( मास्क ,सँनिटाईजर उपलब्ध आहे.*
*अत्यावयक सेवेत कोरोनाग्रस्ताबरोबर काम करणारया डाँक्टराची नर्सेस ची आणि अन्य व्यक्तीची बाहेर हाँटेल मध्ये राहण्याची व्यवस्था करता येईल का ? अशी किती हाँटेल आहे किंवा मोकळी घरे( flat) आहे.*
*गरजेच्या वस्तु देण्यासाठी आपण कसे नियोजन करणार*
*पण अशी या महाराष्ट्र सरकारने ही आणि केंद्र सरकारकडे ही कोणताही प्लाँन नव्हता,,*
*गाडीला जसा रस्ता भेटेल त्या दिशेने जायाचे ., आणि त्यामुळे भारतात ही अवस्था झाली आहे.,*
*आज लाखाच्या वर कोरोनाग्रस्त लोक जाईल*
*लवकरच पावसाळा आहे*
*पावसाळ्यात जर 5 ते 10 लाखाच्या वर आकडा गेला तर काय व्यवस्था असणार आहे ..*
*आजही डाँक्टारांची भरती केली नाही.*
*आणि या कंठीण परिस्थीतीत जी काही ठिकाणी भरती केली आहे ती काँट्रेक्ट बेस वर भरती केली आहे ( म्हणजेच कठीण वेळेस काही डाँक्टरानी सेवा करावी आणि वेळ झाली कि त्यांना काढुन टाकावे आणि कठीण परिस्थीती संपल्यावर मात्र कायमची भरती करायची त्यावेळेस जे कठीण परिस्थीत डाँक्टर घरात लपुन होते ते येणार आणि त्यांची भरती करणार .असो.*
*आजही महाराष्ट्रात आणि भारतात शेकडो लोक रस्त्यावर पायी चालत आहे.*
*पण सरकार त्यांना सोडण्याची व्यवस्था करत नाही किंवा आहे त्या ठिकाणी पोटभर जेवण ही देऊ शकत नाही..*
*ते काही कडील पैसे संपले आहे पुढे जगायचे कसे ही चिंता आहे त्यामुळे लोक गावाकडे चालली आहे तर दुसरीकडे या शहरात आता आपले काही खरे नाही भितीदायक परिस्थीती आहे* *त्यामुळे लोक गावाकडे निघालीत*
*पण सरकार त्यांनी गावाकडे ही जाऊ देत नाही आँनलाईन* *वेबसाईट बंद करुन टाकल्यात*
*हे महाराष्ट्राचे सरकार पण* *आगोदरच्या सरकार सारखे आँनलाईन वर आहे का..*
*गावाला जाण्यासाठी आँनलाईन फाँर्म भरल्याशिवाय पास मिळत नाही .( धन्यवाद या ही महाराष्ट्रातील आँनलाईन सरकारचे )*
*या लाँकडाऊन मध्ये किसान योजनेअंतर्गत शेतकरयांना 500 रुपये आहे ते पैसे काढण्यासाठी बीड येथे रात्री 2 पासुन लोक लाईन ला उभे होते*
*विचार करा.. काय अवस्था आहे.*
*आणि यांनी 20 लाख कोटीचे पँकेज जाहीर केले पण या पँकेज अंतर्गत एक ही रुपया* *सर्वसामान्याच्या बँक खात्यात जमा होणार नाही..( असो )*
*केंद्र सरकार बरोबर महाराष्ट्र सराकार ही लोकांना फक्त उसने आवसान देत आहे.*
*महाराष्ट्रातुन सर्वात जास्त टँक्स केंद्राला जातो.. महाराष्ट्रात जास्त लोकसंख्या आहे. तर केंद्राने महाराष्ट्राला सर्वात जास्त पैसे दिले पाहिजे., पण केंद्रात वेगळे सरकार आणि राज्यात वेगळे सरकार हे फक्त ऐकमेकावर ढकलतात त्यात सर्वसामान्याचे हाल होतात. सर्वसामान्य लोक मरतात.,*
*महाराष्ट्रातील भाजप वाले म्हणतात... सरकारने पँकेज जाहिर करावे . सरकारने बाराबलुतेदाराना मदत करावी*
*आणि महाराष्ट्रातील भाजपचे आमदार खासदार नगरसेवक आणि निवडुन आलेले लोकसेवक मात्र PM केअर फंडाला मदत करतात त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री फंडाला जर मदत केली तर महाराष्ट्रातील लोकांना मदत होईल ..पण केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणुन केंद्र सरकारच्या फंडात महाराष्ट्रातील भाजप वाले मदत करतात ( असो )*
*मुख्यमंत्री ठाकरे बद्दल सुरवातीला चांगले वाटले , हे टाळ्या वाजवा, दिवे लाव मेणबत्त्या लावा हे तरी सांगत नाही त्यामुळे त्यामोदीच्या* *तुलनेत हे बरे वाटले .जरा उपदेश देतात. जरा आवसान तरी देतात. पण हे आवसान* *देण्यापलीकडे जास्त काही करु शकत नाही..*
*जाणता राज्याने शरद पवार यांनी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योगपती , क्रिक्रेट च्या लोकांना चित्रपटातील हिरो हिरोईल ला आव्हान केले असते तर करोडो रुपये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात जमा झाले असते.,पण कोरडे आवसान देण्याची सवय लागली कि तेच होणार..*
*पण एक लक्षात ठेवा या भाजप ला ही लोक वैतागले आहे. आणि महाराष्ट्रात तीन मोठ्या राजकीय पक्षाचे सरकार असुन ही सर्वसामान्याला काहीच भेटले नाही..आज ही*
*महाराष्ट्रात खुप भयानक परिस्थीती आहे,,*
*सरकारने या महामारीची खरी आकडेवारी जाहिर केली तर या पावसाळ्यात आणि त्यानंतर हिवाळ्यात किमान 5 ते 10 लाखाचा आकडा महाराष्ट्र पार करणार.. एकीकडे केंद्र सरकार महाराष्ट्राला योग्य मोबदला देत नाही. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोरडे आसवासन देत आहे., या सर्वसामान्य वंचित लोकांना बेरोजगाराना कोण देणार नोकरी ? कोण देणार त्यांना शेतीसाठी बी बियाणे खते*
*(सर्वच शेतकरयांनी बि बियाणे खते मोफत मिळु शकतात )*
*सर्वच मजुरांना , बेरोजगार युवकांना काम मिळु शकते..*
*जरी सरकारकडे सध्या पैसे नसले तरी*
*फक्त सरकारने केंद्र आणि सर्वच राज्यातील सरकारने*
सर्वच धर्माच्या वेगवेगळ्या मंदिरातील ,चर्चमधील,मस्दिजमधील विहारामधील आणि अन्य सर्व प्राथर्नास्थळावरील संपत्ती सरकारने ताब्यात घेतली तर एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही .सर्वावर उपचार होतील. सध्या काही हाँस्पिटल फुल्ल आहे. नवीन पेशट हा हाँस्पिटल मधुन त्या हाँस्पिटल ला पाठवतात अशी परिस्थीती आहे. तर पुढील काळात या पावसाळ्यात काय परिस्थीती होईल.
आँनलाईन सरकारने आता येथे लक्ष दिले पाहिजे.
एका धार्मिक स्थळातीची संपत्ती 14 हजार कोटी रुपये बँकेत जमा आहे 8 टन सोने आहे.
पण तेथे काम करणारया 600 कामगारांचा एप्रिल मधील पगार केला नव्हता. ही सत्य परिस्थीती आहे.
आज लोकावर ही कठीण परिस्थीती आली आहे.
लोकांचा जीव वाचवणे आणि ही कोरोनाग्रस्ताची संख्या कमी करणे गरजेचे आहे.
पण त्यासाठी मग जर या मंदिरातील संपत्ती घेतली तर कोण विरोध करणार नाही
आणि विरोध करणारयांना समोर येऊन सागावे लोक श्रध्देने पेसे देतात ते देवाच्या नावाने त्या देवाचा पैसे कोण कोणा धर्मगुरुसाठी देत नाही. आणि आता दे पैसे जर सरकारने घेतले तर काहीतरी ठोस स्वरुपात काम करता येईल, नाहीतर तुमची सुध्दा खुर्ची तर जाणारच हे ही लक्षात ठेवा आणि तुम्ही ही या सर्वसामान्याच्या गेलेल्या जीवाला तेवढेच जबाबदार आहे.अजुनही वेळ गेली नाही.
यश भालेराव
9067047333
7448047333
टिप
1) जागतिक बँकेकडुन भारत सरकारला या कोरोनाच्या माहामारीत सर्वसामान्यासाठी खर्च करावे यासाठी किती पैसे आले
2)सरकारकडे पैसे जर नाही तर सर्वच धर्मातील प्राथर्नास्थवर आतापर्यत जमा झालेली संपत्ती सरकारने जमा करावी
3) लाँकडाऊन नंतर ही अत्यावश्यक ( कोरोनाग्रस्तावर उपचार करणारया डाँक्टर ,नर्स आणि अन्य अत्यावश्यक सेवेत असणारयाची राहण्याची व्यवस्था सरकारने किमान काही महिने तरी वेगळी करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!