आज दुपारी एक व्यक्ती माझ्याकडे आली त्या
व्यक्तीने दिल्ली मधील कुणातरी
फायनान्स कंपनीकडून 9% वार्षिक
व्याजदराने कर्ज घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉसेसिंग फी म्हणून ऑन लाईन 10,000
रु दिली. त्या नंतर त्यांना व्हाट्स एप वर कर्ज सेंक्शन झाल्याचे भारतीय राज
मुद्रा असलेले पत्र आले. आणि पुढील कर्ज पूर्तते साठी पुन्हा 25 हजाराची फी भरणेची
मागणी केली अन्यथा 72 तासात लोन रिजेक्ट होणार असे संगितले. पुढे भरण्यासाठी 25
हजाराची रक्कम सदर व्यक्तीकडे नसल्याने त्याने त्याच्या मित्राकडे उसने घेण्याचा
प्रयत्न केला. त्या मित्राने एवढी रक्कम अचानक कशाला गरज पडली म्हणून विचारले
असता. अगोदर आढे-वेढे घेऊन नंतर मित्राकडून उसने घेण्याची निकड असल्याने मित्राला
खर-खर सांगून टाकले मला 9% कर्ज विनातारण भेटले आहे, त्याच्या प्रोसेसिंग फी
साठी गरज आहे म्हणून मी तुझ्याकडे पैसे मागायला आलो आहे. माझे कर्जाची रक्कम
खात्यात आल्या-आल्या तुला मी पैसे परत करतो. हे एकल्यावर त्या मित्राने मला कॉल
केला. आणि घडलेल्या घटने बाबत मला संगितले. मी त्याला संगितले की हे सर्व फेक
कागदपत्रे आहेत. कोणत्याही बँकेला भारताची राजमुद्रा वापरता येत नाही. पण गावा
खेड्यातील माणूस राजमुद्रा बघून भाळतो आणि फसतो. स्थानिक बंकेकडुन किंवा फायनान्स
कंपनी कडून आरबीआय च्या नियम अटी नुसार कर्ज मिळण्याची शकयता नसते म्हणून मग अशी
मंडळी या ऑनलाईन वाल्यांच्या पाशात अलगद अडकतात. निप्पाणी-मुरगुड-चिक्कोडी भागातील
गावा खेड्यातील मंडळींनो या पोस्ट द्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो की असे ऑनलाईन
कर्ज मिळत नाही. एक तर दिल्ली-हरियाणा तून हिन्दी ठग असतात. कर्ज देण्याच्या नियम
अटी आरबीआय तयार करते. आरबीआय डायरेक्ट कुणालाही कर्ज देत नाही,
बँकासोडून. ज्याच्याकडे मागील 3 वर्षाचे आयटीआर नाहीत त्याला हे असे ऑन लाईन कर्ज
भेटत नाही. फसू नका, सजग बना ! सदर व्यक्ती चिक्कोडी जवळची आहे आणि
तशीच एक व्यक्ती मुरगुड परिसरातील एका गावातील नामांकित आहे. त्यांनी पैसे भरले
नाहीत पण मला त्याची कल्पना दिली. मी कर्ज देण्याचे काम करतो म्हणून. आपल्या
भागातील राष्ट्रीयकृत, खाजगी किंवा सहकारी बँकेतूनच कर्ज घ्या. किंवा
नोंदणीकृत फायनान्स ब्रोकर कडून कर्जासाठी प्रयत्न करा. तिथे ही कर्ज भेटले नाही
तर स्वत:चे सीबीलचा सुधार करा, ब्रोकर कडून सल्ला घ्या. फसू नका. सदर जाहिरात ही
निप्पाणी शहरात सगळीकडे चिकटवली आहे. त्यामुळे मला हा प्रश्न पडला आहे. ह्या
जाहिरातीतील नंबर हरियाणा, गुरगाव, नोयडा दिल्ली चा मग त्यांचे पांप्लेट निप्पाणीत
कोण चिकटवले ? त्यांचा साथीदार निप्पाणीतीलच असेल. भागातील मा.
पोलिस निरीक्षक साहेबांनी याकडे कृपया लक्ष घालावे. निप्पाणीच्या गुरुवार च्या
बाजारात मुरगुड, गडहिङ्ग्ल्ज, चिक्कोडी, संकेश्वर भागातील गावा खेड्यातील बरीच लोक बाजारला
येतात. त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून ही पोस्ट !
मी निप्पाणी मध्ये गेलो
नाही, पण तिथे निप्पाणी मेडिकल चौकातील भिंतीवर,
लाईटच्या पोलवर सदर जाहिरात वाचली असे समजले. निप्पाणी कर सावध व्हा ! सजग व्हा !
_अमरसिंह राजे (कर्ज-विमा व गुंतवणूक सल्लागार)_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!