जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बस्तवडेतील किल्ला स्पर्धेत करण व प्रथमेश जगदाळे प्रथम तर साक्षी चिखलकर द्वितीय तर सांघिक शाहू मंडळ तृतीय !

बस्तवडे गावातील किल्ला स्पर्धेचे निकाल जाहिर... 

सुमुहूर्तावर बक्षीस वितरण समारंभ

दीपावलीचे औचित्य साधून बस्तवडे गावातील मुलांच्यात स्व:इतिहास आणि छत्रपती शिवाजी महराजांच्या अफाट अतुलनीय कार्याची सत्यओळख व्हावी या उदात्त हेतूने गावाचे सामजिक कार्यकर्ते श्री सागर भोसले आणि संतोष पाटील यांनी ह्या किल्ला स्पर्धेचे प्रायोगिक तत्त्वावर आयोजन केले होते.


प्रथम क्रमांक 
Karan jagdale




ह्या स्पर्धेत गावातील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. किल्ला आकर्षक व वस्तुस्थितीला धरून बांधणे. त्याचे ऐतिहासिक महत्व विशद करणे, ऐतिहासिक खाणाखुणा दर्शविणे आणि इतिहासाची सत्यजाण जपणूक करणे ह्या गुणांवर आधारीत ही किल्ला स्पर्धा आयोजित होती.


ह्याच गुणांवर आधार घेऊन परीक्षक मराठा अभ्यासक अमरसिंह राजे यांनी आणि आयोजक मंडळींनी निकाल जाहिर केले आहेत.


महाराजांच्या ३७२ किल्ल्यांपैकी एक महतत्वाचा दुर्ग असलेला पण प्रसिद्धीस नसलेला पद्मदुर्ग साकारणाऱ्या करण जगदाळे आणि प्रथमेश जगदाळे यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. हा किल्ला साकारण्यासाठी त्यांना १०-१५ दिवसाचा कालावधी लागला आहे. त्यांनी अत्यंत बारकाव्याने किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती. 



महाराजांनी "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.". असे उद्गार काढले होते.


ह्या किल्ल्या बद्दल माहिती देताना करण आणि प्रथमेश यांनी सांगितले कि, “पद्मदुर्गाला कासा किल्ला म्हणून ही ओळखले जाते. या कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे म्हणतात.



या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आहे. गेल्या चारशेहे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी. एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य सर्वांना चकित करते.

पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली आहेत.”



ह्या टाक्या आणि चारही बाजूला आभासी समुद्राचे निळाशार पाण्याची योजना या दोघांनी केली  होती.



द्वितीय क्रमांक हा साक्षी चिखलकर आणि अथर्व पाटील ह्या दोघांनी ३ दिवसात राजगड हा किल्ला बांधला. त्याला देण्यात आला आहे. किल्ला म्हंटले कि सर्रास फक्त मुलेच बांधतात आणि किल्ले बांधणे हे मुलींचे काम नाही त्यांनी छान रांगोळ्या काढाव्यात आणि फराळ बनवावा अशी एक लोकमानसिकता आहे. त्याला राजगडची प्रतिकृती साधून साक्षीने छेद दिला. इतकेच नव्हे तर किल्ल्या संदर्भात तीने जे विवेचन वाचून दाखवले. यासाठी तीने आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींच्या चरित्राचा आधार घेतला. जो एक अस्सल ऐतिहासिक पुरावा म्हणून जगमान्य आहे. साक्षीचा आदर्श घेऊन इतर मुलीही ही शिवचरित्रात रस घेतील आणि घराघरात जिजाऊ मांसाहेब तयार होतील त्यामुळे प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील हा संदेश सकारात्मक आहे.


                                                द्वितीय क्रमांक 

 साक्षीचा किल्ला



तृतीय क्रमांक हा सांघिक आहे. शाहू मंडळाच्या सदस्यांनी १०-१२ दिवस झटून बांधलेला सिंहगड. सर्व स्पर्धकांनी ह्याच किल्ल्याची भीती बाळगली होती. गावात वातावरण निर्मिती सुध्दा तशीच झाली होती. किल्ला मुलांनी भव्यदिव्य बांधला होता निसंशय! फक्त तो बांधताना त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या खाणाखुणा चुकल्या त्यांनी सांप्रत काळातील टिळक बंगला सुद्धा त्यात दाखवला जो कि किल्ल्याचा ऐतिहासिक पुरावा नाही. सांघिक पणे त्यांनी किल्ल्याचे विवेचन केले त्यात ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कमी सांगितला जो कि सिंहगड किल्ल्याचे महत्त्व कमी दर्शविणारे होते. त्यामुळे गावातील मुलांना दहशत वाटणाऱ्या ह्या किल्ल्याचा द्वितीय क्रमांक हुकला. पण त्यांनी तांत्रिकदृष्ट्या आग ओकणारी तोफ निर्मिती त्यांनी केली होती. ज्यामुळे मुलांना नव तंत्रज्ञानाची गोडी लागली. त्यांच्या ह्याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना तृतीय स्थान देण्यात आले आहे.



उत्तेजनार्थ आयोजकांच्या कडून वितरण प्रसंगी बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे. आयोजक सुमुहूर्तावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आखणार आहेत. ज्याची वर्दी ते जाहिरपणे सर्वांना देतील.



एक मात्र खरे कि मुलांनी गुगल map आणि विकिपीडियावरील वरील माहितीच्या आधारे किल्ला बनविला होता. चित्रपट आणि सिरीयल मध्ये बघितल्याबर हुकुम त्यांनी त्यांच्या आकलनशक्तीने ह्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या पैकी कोणीही अस्सल शिवचरित्र वाचले नव्हते. साक्षी चिखलकरने अस्सल शिव चरित्र वडिलांच्याकरवी ऐकले होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!