जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

स्वराज्याच्या शपथेचा सक्षिदार किल्ले रायरेश्वर !



स्वराज्याच्या शपथेचा सक्षिदार किल्ले रायरेश्वर रायरीचे पठार भोरपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे.किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते. गडावर जाण्याच्या वाटा रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर लागतेच. १.टिटेधरण कोर्लेबाजूने : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गाव व तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे. २.भोर-रायरी मार्गे : भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी बस येते. याच वाटेला सांबरदर्‍याची वाट म्हणून देखील संबोधली जाते. या वाटेने रायरेश्ववर गाठण्यास दोन तास लागतात. ३. केंजळगडावरून सूणदर्‍याने किंवा श्वानदर्‍याने सुद्धा रायरेश्वरला जाता येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभरमावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!