कोकणचा तडाखा न्यूज
COVID19 :- जूनमध्ये कोरोना बाधित ओळखण्यासाठी होणार पंचाईत;ती कशी काय?
COVID19 :- जूनमध्ये कोरोना बाधित ओळखण्यासाठी होणार पंचाईत;ती कशी काय?
तर जुन आणि जुलै हे दोन महिने अत्यंत महत्त्वाचेच
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत पसरलेली आहे. तर आता पुढील जुन आणि जुलै महिन्यांत या आजाराचा उद्रेक होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच हेच दोन महिने ऋतू बदलाचे असून,या दरम्यान सर्दी, ताप, खोकल्याच्या आजाराचे रुग्ण वाढीस लागतात.तेव्हा साधा फिव्हर कोणता आणि कोरोना फिव्हर कोणता हे ओळखणे आरोग्य विभागाला कठीण जाणार आहे. असे जरी असले तरी अद्यापही आयसीएमआरने याबाबत कुठलीही गाईड लाईन्स जारी केले नसल्याने जिल्हा पातळीवर त्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही.
ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी,खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे सध्या ही लक्षणे कोरोना झाल्याची आहे.मात्र,हीच लक्षणे नवीन ऋतू सुरु झाला की आपल्या आरोग्यात बदल होऊ लागतात. ताप, सर्दी खोकला हे तर ठरलेले आजार आहेत. तेव्हा कोणता रुग्ण हा कोरोना बाधित आहे आणि कोणता रुग्ण साध्या आजाराचा आहे हे कळणे कठीण जाणार आहे. यासाठी आरोग्य विभाग पुढील काही दिवसांत याबाब काही नियोजन करणार जरी असले तरी अद्यापही आयसीएमआरकडून याबाबत कुठलेही दिशा निर्देश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा वेळेवर आलेल्या गाईड लाईन्सनंतर आरोग्य विभागाची तारांबळ नक्कीच उडणार यात शंका नाही.
औषधी वाटप बंद झाला की काय ?
पावसाळ्यात साथरोग पसरू नये म्हणून म्हणून आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह प्रतिबंधित उपाय म्हणून काही औषधीचे वाटप केले जाते. मागास परिसराचा सर्व्हे करून त्या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात आजार होऊ नये म्हणून औषधी दिल्या जातात. मात्र, अद्याप तरी तसे काही होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.
👉तपासणी होणार तरी कशी?
साधा सर्दी, ताप, खोकला आणि कोरोना लक्षणे असलेली लक्षणे याची तपासणी करावी लागणार आहे. तेव्हा या दोन्ही रुग्णांची सरसकट तपासणी केले जाणार आहे का? आणि तसे जर झाले तर जून आणि जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याशिवाय राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!