छ. संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले?
छ. संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले? छ. संभाजी महाराज हे तर एवढे कर्तव्यदक्ष, अचूक, होते तर ते मुळात पकडले गेलेच कसे? आग्र्याला शत्रूच्या कैदेतून सुटण्यासाठी स्वतः संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना भरपूर मदत केली, त्यावेळेस तर ते अवघ्या 9 वर्षांचे होते… मग वयाच्या 32 व्या वर्षी ते एवढे निश्चिन्त, बेफिकीर कसे असतील? मग संभाजी महाराज पकडले गेलेच कसे, याचा अर्थ असा कि नक्कीच महाराजांच्या अगदी जवळचा कोणीतरी असणार !
यामध्ये प्रामुख्याने नाव पुढे येते ते म्हणजे छ. शिवाजी महाराजांचे जावई, छ. संभाजी महाराजांचे मेहुणे "गणोजी शिर्के " यांचं. पण संभाजी महाराज गेल्यानंतर पुढे हेच गणोजी शिर्के, राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून निसटायला मदत करतात, व स्वतः मुघल सेनेशी झुंझ देतात !! तर असे का? म्हणजेच गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले हा दावा सिद्ध होत नाही. तसेच संभाजी महाराजांना गणोजी शिर्के यांनी पकडून दिले असे कुठल्याही समकालीन पुरावे सांगत नाहीत. तसेच 2008 मध्ये महाराष्ट्र पुरातत्व खात्याने सुद्धा आम्हाला संभाजी महाराजांना गणोजी शिर्के यांनी पकडून दिले असा एकही लेखी पुरावा मिळालेला नाही, असे स्पष्ट केले. मग प्रामुख्याने दोन नावे पुढे येतात, ते म्हणजे पालीच्या मठाचा अधिपती "रंगनाथ स्वामी " आणि "कवी कलश " पालीच्या रंगनाथ स्वामींचे उल्लेख अनेक समकालीन पुराव्यात, पत्रात सापडतात, तसेच अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा ह्या रंगनाथ स्वामी चा उल्लेख सापडतो. पण हे सुद्धा अजून सिद्ध होऊ शकले नाही, आता राहिले छ. संभाजी महाराजांचे परम मित्र, सोबती संभाजी महाराजांची सावली "कवी कलश ". जेव्हा खानाचा छापा पडला तेव्हा, कविकलशांना बाण लागला.. व ते जोराने ओरडले "महाराज मला वाचवा" आणि त्यामुळेच संभाजी महाराज पुन्हा मागे फिरले, ही वस्तुस्थिती आहे. मग कवी कलश फितूर झाले काय? असा प्रश्न पुढे येऊन उभा राहतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!