जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी... बारसू प्रकल्पाबाबत मत प्रदर्शित करण्याबास ही बंदी...!

राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आलेली आहे. 

शिरोळ ( प्रतिनिधी) : बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश करण्यात आला असून रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. 
       बारसू प्रकल्पास शेतक-यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतक-यांच्यावर लाठीहल्ले , अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतक-यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी ऊपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे. 
          दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून यामध्ये त्यांनी सोशल मिडीयावरही पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे.अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्याठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायर प्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याची टिका राजू शेटटी यांनी केली आहे. 
     दरम्यान काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांचेवतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांचेवतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचो कारण दाखवित सदर नोटीस लागू करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!