उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 52 वर....
पुन्हा नव्याने 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह...
उस्मानाबाद- दि:२८ उस्मानाबाद जिल्ह्यातील अखेर त्या 7 प्रलंबित अहवालापैकी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे. मंगळवारी एकूण 89 रुग्णाची टेस्ट करण्यात आली होती,त्यापैकी 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते तर 7 जणांचे अहवाल प्रलंबित होते.या 7 जणांचे प्रलंबित अहवाल आले आहेत.त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत तर इतर जणांचे अहवाल inconclusive आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून ही उस्मानाबादकरांसाठी चिंतेची बाब आहे.हे चार रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ती,उमरगा शहर,लोहारा तालुक्यातील काटी,चिंचोली आणि वाशी तालुक्यातील गोजवडा येथील आहे. जिल्ह्यात एकूण 52 कोरोना बाधित रुग्ण झाले असून 12 जणांना डिस्चार्ज दिला असून 40 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!