मूळ मुद्दा
इस्लामपूर ला कोणीही बदनाम करत नाही आहे...
त्यामूळे मिलिंद पाटील साहेबांनी लिहिलेल्या लेखातील ह्या मुद्द्याला म्हणावे असा अर्थ उरत नाही. घटनास्थळ कोणतेही असू शकते.मूळ मुद्दा असा आहे की पुरोगामी चळवळीतील 75℅ मुस्लिम व्यक्ती ही स्वतःच्या धर्माची धर्मचिकित्सा अजिबात करत नाही. पुरोगामी चळवळीत राहून ते स्वधर्म सोडून इतर धर्मावर बिनबोभाट आसुरी टीका टिप्पणी करण्यात आघाडीवर असतात, पण त्यांच्या स्वतःच्या धर्माबाबत धर्मचिकित्सा कोणी केली तर संघा सारखे खालच्या पातळीवर जाऊन हीन दूषणे देतात "सार्वजनिक आणि खासगीत सुद्धा!" मी 2017 पासून माझ्या चळवळीतील सहकाऱ्यांचे पर्यवेक्षण करतो आहे. त्यातील निरीक्षणे मला समाधानकारक दिसली नाहीत. किंबहुना पुरोगामी चळवळ बदनाम करण्यासाठी सोडलेले ते व्हायरसच जास्त वाटले मला. हे फक्त मी इस्लाम बद्दल बोलतो आहे असे नाही तर नवं बौद्ध च्या भंत्याच्या बाबतीत हे तेच आणि नव्याने ख्रिस्त धर्म स्वीकारून येशूला आपला देव मानणारे यांच्याबाबतीतही बोलतो आहे. छाती ताठ करून मी पुरोगामी असे घोषीत करण्याऱ्यानी फक्त हिंदू धर्माचे चिकित्सकपणे समीक्षण करत असताना स्वतःच्या धर्माच्या पण चिकित्सा व समीक्षण करत जावे.
हे मला कधी जाणवलं....तर NRC च्या धर्तीवर. आम्ही चळवळीतील बरेच मित्र कायदेशीर लढाईसाठी प्रयत्नबद्ध असताना तथाकथित इस्लामचे पाईक स्वतःला जगाशी जोडून भारताला (माफ करा अंदाजे 75℅ मुस्लिम व्यक्ती भारताला #हिंदुस्थान असे संबोधित करते.) 130(त्यांनी बोललेला नेमका आकडा आठवत नाही) देशांकडून जमिनीची किंमत घेऊन ती RBI ला देणार मुस्लिमांना राहण्यासाठी अशी मनोभावना बोलून दाखवली तेंव्हा.
आज ही काही मुस्लिम व्यक्तींना भारत स्वतःचा वाटत नाही, हे संविधानाचे आणि त्या लाखो मुस्लिम समाजसुधारकांचे, सीमेवर भारतासाठी जीव अर्पण केलेल्या शहिद जवानांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आम्हीं हिंदू आमच्या धर्माच्या दलालावर जसे बोलतो, लिहितो चित्रपट काढतो, तसे इस्लाम मध्ये किती जणांनी प्रयत्न केलेत. इस्लाम मधील बुरखा प्रथा, बहूपत्नीत्व, स्त्री शिक्षण अशा चुकीच्या प्रथेवर किती पुरोगामी विचारांच्या लोकांनी आसूड ओढलेत सांगावे. रईस सारख्या, दाऊद सारख्या देशद्रोही लोकांवर चित्रपट काढले जातात पण भारतासाठी आणि मानव सेवेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्य केले अशा अनेक मुस्लिम व्यक्ती इतिहासात होऊन गेली आहेत, कार्य करत आहेत त्यांना किती मुस्लिम लोकांनी सहकार्य केले आहे का ? त्यांच्यावर चित्रपट काढलेत का ?? उलट अशा मुस्लिम समाजसुधारकांना #काफिर म्हणून हिनवण्यात आणि त्यांचे कौटुंबिक, सामाजिक, मानसिक खच्चीकरण करण्यातच धन्यता मानतात, बेगडी चळवळीचे कार्यकर्ते.
मागचे गेले धुऊन सारे...
वर्तमानमध्ये सदर व्यक्तींना समजले होते की कोरोनोची साथ पसरली आहे... त्यामुळे #म्हामंद( ग्रामीण मराठी शद्ब.... तीर्थयात्रा करून आल्यानंतर सुखरूपपणे स्वघरी पोचल्यावर श्रद्धेयगोष्ट(देव, अल्लाह, गॉड, जिझस वगैरे वगैरे) च्या आभार व्यक्त करण्यासाठी केलेले अन्नदान(आभार भोजन) म्हणजे "म्हामंद" होय.) घालायची त्यांना काय गरज होती? बरे श्रद्धा आहे तर स्वतःच्या घरापुरते घालायचं होतं ना! कशाला स्वतःच्या श्रद्धेच्या धिंढोरा पिटायची गरज होती. सरकारने सर्वांच्यासाठीच सूचना जारी केली होती ना. कोरोनो काय धर्म, जात, वर्ग, वर्ण, गरीब-श्रीमंत बघून येत नाही....तो काय तुमच्याकडे आधार कार्ड मागत नाही...."भाई तू कौन है तेरा आधारकार्ड दिखा मुझे ....फिर मै सोंचो तुझमे समा जाऊं की नहीं."
यालाच धार्मिक कंड म्हणतात. तो प्रत्येक धर्मात आहे, तसाच प्रत्येक व्यक्तीत सुद्धा कमी जास्त प्रमाणात असतो. स्वधर्माची चाड प्रत्येकालाच असावी. पण लक्षात ठेवावे व्यक्तीच्या आनंद-सुख-समाधानासाठी धर्माचे नियमन असते. कालपरत्वे त्यातील प्रथा, रूढी-पंरपरा ह्यात बदल करून त्याचे पालन करायचे असते. स्वतः आनंदी सुखी जगा आणि दुसऱ्याला ही आनंदी सुखी जगू द्यावे, हाच प्रत्येक धर्माचा मूळ गाभा आहे.
पण धर्म पुरोहित(हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन वगैरे वगैरे) वर्गाच्या स्वार्थी भ्रष्ट अभिनिवेश वागण्यामुळे धर्माच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. होते चूक माणसाकडून...ती सोज्वळपणे मान्य करून क्षमाशील न्याय बुद्धीने सुधार करून जगणे म्हणजेच धर्माचरण होय. पण घडलेल्या घटनेचा विपर्यास करून चुकीचे समर्थनार्थ उभं राहणं, हे न्यायाला आणि धर्माला धरून नाही. जसा त्यांचा धर्म तसा माझा ही धर्म. ईश्वर-अल्लाह नहीं सिखाते आपस में बैर रखना...!
कोरोनोच्या धर्तीवर इस्लामपूर मधील घटना ही नैसर्गिक आहे. ती धार्मिक प्रसंगामुळे अधोरेखित झाल्यामुळे समाजात त्याचे भलेबुरे पडसाद उमटणारच. म्हणून काय चुकीचे समर्थन कोणीही करू नये. महापूरात बरीच मंदिरे पाण्याखाली गेली. त्यावेळी ही ह्याच तथाकथित पुरोगामी लोकांनी बऱ्याच पोस्टीं फिरवल्याच होत्या की. मग याचा संबंध इस्लामपूराशी किंवा जयंत पाटील यांच्याशी जोडण्याचा काहीही संबंध नाही.
त्या कुटुंबाने सरकारी सूचनेनुसार अल्लाहच्या प्रति स्वतःचा असलेला #श्रद्धेयभाव जोपासून तीर्थयात्रेची सांगता केली असती तर ही परिस्थिती उदभवली नसतीच. त्यांनी केलेली कृती ही समजून उमजून सम्पूर्ण होशो-हवसात केली आहे. सदर कृतीतून होणारे नुकसान हे फक्त त्या कुटुंबातील सदस्यांचे व्यक्तिगत नसून, समाजाची चूक नसतानाही समाजाचे ही अतोनात नुकसान करणारे आहे. पर्यायाने देशाचे आर्थिक, सामाजिक सलोखा भंग करणारे (सध्या ज्या पोस्टीं समाज माध्यमातून फिरत आहेत त्या) आणि न होऊ नये पण मनुष्यहानी होऊ शकते हा एक गुन्हाच आहे. ज्याची तरफदारी कोणीही करू नये.
#इस्लामपूर_हे_कोणाच्या_बापाची_जहागीर_नाही.
इस्लामपूर-वाळवा भागातील शेतकऱ्यांनी हजारो हेकटर जमिनी अव्वाच्या सव्वा व्याजाने भु विकास बँकेला तारण ठेवून पाण्याच्या स्कीमा केल्यात. पाण्याच्या स्कीमा करून त्या काळ्यामातीत स्वतःच्या शरीराची माती होऊ पर्यंत राबणूक केली आहे....उजाड दुष्काळी भागात रखरखत्या उन्हांत डोईवरची केस जाऊन टक्कल पडू पर्यंत स्वतःला शेतात खपविले आहे. तेंव्हा कुठे हे शहर उभं राहिलं आहे. आणि हो शेतकरी हा कुण्या एका धर्माचा नसतो, तो एक भारतीयच असतो शेवटपर्यंत....कोणत्याही प्रतिकूल-अनुकूल परिस्थितीत !
त्यामुळे कोणत्याही एका पक्षाने (काँग्रेसने) याचे श्रेय घेऊ नये. लोकांना स्वातंत्र्य मिळवून देऊन लोकराज्य स्थापन करण्यासाठी क्रांती अग्रणी जीडीबापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिकारक वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील अशा अनेक जहाल-मवाळमत वाद्यांनी स्वातंत्र्य मिळवल्या नंतर स्वतःला लोकोद्धार कार्याला वाहून घेतले. त्यासाठी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. भागातील लोंकांच्या हाताला काम दिले. बेकारी हटवली आणि विकास केला. हाच विकास काही नतदृष्ट लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळें मुद्द्यांमहून इस्लामपूर शहर बदनाम करण्याचे कारस्थान काही मंडळींकडून होत आहे.
जयंत पाटलांनी ही परंपरा कायम ठेवली. उलट त्याची पाळेमुळे घट्ट केली म्हणून ही त्यांना कदाचित या प्रसंगांत ओढण्याचा IT सेलने प्रयत्न केला.
पण जनतेने चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल पोस्टीं वर भरोसा न ठेवता सामाजिक सलोखा ठेवून "कोरोनोची" लढाई कोणतीही मनुष्यहानी न होता जिंकण्यासाठी स्वतःला घरातच कोंडून घ्यावे.
:- स्व.अमरसिंह राजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!