आधुनिक भारताचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज
१७ व्या शतकात छत्रपती महाराणी ताराबाई साहेब यांनी कोल्हापूर गादीची स्थापना केली. त्याच्या पुढे-मागच्या काळात माझ्या पूर्वजांनी आपली सातारा गादी सोडून कोल्हापूर गादीला आपली तळपती तलवार कायम वाहिली, असे आमच्या कुटुंबात आम्हाला सांगण्यात आले. आपसूकच त्या नंतरच्या आमच्या पिढ्या ह्या कोल्हापूर गादीशी ईमानइतबार प्रामाणिक राहिल्या. राजपाट गेले आणि स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या... क्रांतिवीरांच्या पराक्रमाने आणि बँलिस्टर मोहनदास गांधी यांच्या सत्याग्रहाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
देशाच्या या राजकीय सत्ताकारणाच्या या संक्रमण काळात स्वतंत्र भारताला विकासाचे आणि सार्वजनिक सुधारणांचे तोरण बांधण्याचे काम केले ते म्हणजे बरोडा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीच. हे ढळढळीत त्रिवार सत्य आहे. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे सामाजिक सुधारणांचा आणि सर्वोत्तम प्रशासनाचा मूर्तिमंत मोत्यांचा हारच !
जगदाळे सरकार यांची तलवार कोल्हापूर गादीला परंपरेने समर्पित आहेच. त्यामुळे प्रा. डॉ. रूपा शहा मॅडम आणि पत्रकार उदय कुलकर्णी यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या "असा हा लोकराजा" हे विकत घेतलेले पुस्तक तीनच तासात वाचून पूर्ण केले.
या पुस्तकातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातली अनेक पैलूवर संतुलानात्मक प्रकाश टाकला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी भटा-ब्राम्हनानी आणि त्यांच्या वळचणीला गेलेल्या काही मराठा सरदारांनी अनेक अफवा... खोटे-नाटे विचार पसरविले आहेत. समुद्रातील मोती वेचावे तसे शाहू महाराज यांच्या जीवनातली अशा विचारांना या लेखक द्वयीनी वास्तव बाजू मांडून शाहू राजांच्या कार्याला उजाळा दिला आहे.
टिळकांचे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सख्य जरी नसले तरीही विशाल हृदयाच्या राजर्षी शाहू महाराजानी टिळकांचा द्वेष कधीच केला नाही.
पण टिळकांच्या मनात कमालीचा जात्यांधपणा होता. हे प्रत्येकवेळी त्यांच्या कर्मठ कृतीतून सिद्ध झाले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सोशल रिफॉर्म आणि एड्युकेशन रेव्यालुशन हे टिळकांना कधीही आवडले नाही. उलटपक्षी केसरी मधून शाहू राजांच्यावर ब्राम्हण्यावादी प्रतिगामी विचाराची बुज राखून टिकेच्या अनेक फैरी झाडल्या होत्या. मनुवादी विचारांची पाठराखण करून लोक कल्याणकारी राजाच्या कार्याला जनमत मिळवून देण्याचे सोडून त्यांच्यावर प्रतिगामी लेख लिहून मनुवाद जपण्यात टिळकांनी धन्यता मानली आहे. हे वैदिक आणि पुरणोक्त प्रकरणाच्या वेळी केसरीतून प्रकाशित झालेल्या अनेक लेखातून स्पष्ट होते. पण असो.
किंबहुना प्रतिगामी विचारांच्या कलमकसायांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यू पश्चात लिहिलेल्या अनेक साहित्यातून तर दर्शविले आहे. आणि त्याच साहित्याचा संदर्भ घेऊन अनेकांनी लिखाण केल्यामुळे टिळक विरुद्ध छत्रपती शाहू महाराज रंगवला आहे.
पण "असा हा लोकराजा" या पुस्तकातून पावणे दोन पानात सावधपणे वास्तव टिळक आणि शाहू महाराज हा विषय हाताळला आहे.
डॉ कृष्णाबाई केळवळकर व छत्रपती शाहू महाराज हा विषय चांगला हाताळला आहे. माझ्यासाठी तर हा नवा संदर्भ आहे. भारतात जनमलेल्या प्रत्येक डॉक्टरने विशेषत: महिला डॉक्टरने हा पाठ वाचणे गरजेचेच आहे. पुढील आवृत्तीत यावर थोड अजून सखोल विश्लेषण करता आले तर बहुउपयोगी होईल.
सगळेच ब्रिटिश व मिशनरी वाईट नव्हते हे प्रकरण खरेच गरजेचे होते. हा दृष्टीकोन मांडले आहेत. हे म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांना इंग्रजांचा एजंट म्हणून हिनवणाऱ्या प्रतिगामी विचाराच्या ग्रामसिंहाना मारलेला दगड आहे. गाढवाला गुळाची चव काय प्रमाणे हे ग्रामसिंह षंढच गिरे तो भी टांग उपर... तरी पण हे प्रकरण लेखक द्वयिच्या ठिकाणी असलेला उदात्त आणि विशाल हेतू स्पष्ट करतो.
गुन्हेगारी जमाती हा शिक्का पुसला : फासे पारधी समाजातील लोकांना शाहू महाराजानी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किती मोठं योगदान दिले आहे ते स्पष्ट होते. ह्या जमातीचे लोक स्वत:ला रजपूत समजतात हे विधान बरोबर आहे आणि धाडसाचे पण आहे. कारण राजपुतांचा पण सध्या वेगवेगळा प्रकार संदर्भात येतो. राणा - पिंढारी राजपूत हा महाराणा प्रतापसिंह यांच्या सोबत यवनांच्या विरोधात त्वेषाने लढलेला वर्ग आहे. हळदी घाटातील लढाईत जित आणि अजित लढाई नंतर स्वाभिमानाने जंगलात राहणारा हा समाज इंग्रजकालात आर्थिक विवंचना आणि पोटाची भूक भागविणयासाठी नाईलाजाने वाटमारी करू लागला. नंतर यांच्यातील राणा भीमदेवी ताकद जागी होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी किंबहुना त्यांच्याकडे साहेबी गुलामी करणाऱ्या प्रतिगामी ब्राम्हण्यवादी लोकांनी राजपुतांचे खच्चिकरण करण्यासाठी राणा राजपुताना लोकांच्या माथी मुद्दामहून गुन्हेगारीचा शिक्का मारला होता. तो राजर्षी शाहू महाराजानी पुसून टाकला.
कुच कोरवी समाजाला ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजानी सन्मान बहाल केला आहे. त्याबद्दल प्रतिगामी व काही उच्चवर्णीय लोकांनी राजर्षी शाहू महाराज यांचा अनादर केला आहे.
१०४ पानाचे "असा हा लोकराजा" हे पुस्तक दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेने फक्त १००₹ ला उपलब्ध करून दिले आहे. छोटे पण थोडक्यात शाहु महाराजांच्या जीवनकार्याला समजून घेण्यासाठी योग्य आहे.
समीक्षक
पत्रकार अमरसिंह राजे
८२०८९४८८९६
#bookreview #chtrapatishahumaharaj
#amarsinhraje #samikashakraje
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!