गो ब्राह्मण प्रतिपालक मठाधीश साठ गाईंचा मृत्यू हे पाप कोठे फेडणार
गो ब्राह्मण प्रतिपालक मठाधीश साठ गाईंचा मृत्यू हे पाप कोठे फेडणार
संकटकाळी नरो वा कुंजरोवा अशी भूमिका घेणे पसंत करणारे सिद्धगिरी मठ कणेरी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या मठाचे मठाधिपती आता सध्या अलीकडे स्वतःला जगतगुरु परमपूज्य महास्वामीजी म्हणून घेतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचमहाभूत लोकोत्सव परिषद प्रदर्शन प्रवर्तन असे वीस ते 26 फेब्रुवारी भरले
भारतीय परंपरेला पुढे करून हिंदू राष्ट्राचे स्वप्न बाळगणाऱ्या धार्मिक पक्षाकडून कोट्यावधी रुपये यांचा लाभ करून घेणे जमले तर राजकीय खुर्ची बळकावणे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने गावागावातून भाजपच्या आमदारकीला उत्सुक असणाऱ्या तरुण पोरांच्या कडून वेगवेगळ्या वस्तूंचा कोट्यावधी रुपयाचा खजिना गोळा करणे आणि त्याला दान आणि दक्षिणा असे गोंडस नाव देणे हे चालूच होते या समारंभाला अनेक उपक्रमाने सजवले होते त्यातील एक उपक्रम गोशाळा होता भारतीय देशी गाईंचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून गाईंचे संगोपन 20 एकरावर पसरलेल्या गोशाळेत केले जाते तसेच शेतकऱ्यांना गोपालना बद्दल मार्गदर्शन केले जाते 22 प्रजातींच्या 1000 पेक्षा जास्त गायी इथे पाहायला मिळतील असे महाराजांनी सांगितले होते आणि त्यानुसार प्रदर्शन चालू होते गावागावातून गोळा केलेल्या अन्नाचा साठा इतका मोठा झाला की मिळालेली भीक आता कोणाला घालायची तर गाईंना आणि त्या शिळ्या अन्नातून विषबाधा होऊन साठ गाई मेल्या आणि तीस गंभीर आजारी आहेत हि फार वाईट घटना झाली शासनाने चौकशी करावी.
ही गंभीर घटना बाहेर पडल्यावर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तेथे जाणे साहजिक आहे पण मठाधिशांनी आदेश दिला की कोणीही याचे वार्तांकन करू नये छायाचित्रण करू नये
महाराजांना अशा वाईट गोष्टी लपवण्याची खोडच आहे यापूर्वी त्यांच्या जुन्या निवासस्थानातून 80 लाख रुपये चोराने पळवले एवढी प्रचंड रक्कम महाराजांनी पोत्यात भरून ठेवलेली होती ती सगळी पोती नेता येत नव्हती त्यामुळे एक पोते वाटेतच पडले आणि या पोत्यात दोन हजाराच्या साऱ्या नोटा होत्या महाराजांनी कळवळून प्रसार माध्यमांना आणि पोलीस विभागाला विनंती केली की 80 लाख म्हणू नका फक्त आठ लाखच रक्कम जाहीर करा हा पैसा कुठला होता काळा होता का गोरा होता व्यक्तिगत होता का मठाचा होता संस्थेचा होता का याची चौकशी आयकरने आज पर्यंत कधी केलेली दिसत नाही खरंतर अनेक राजकीय पुढारी आयकर इंडिला घाबरून भाजपमध्ये गेले कदाचित अशीच भीती महाराजांच्या मनामध्ये असावी आणि म्हणून त्यांनी भाजपसाठी मठाचे द्वार आणि आपल्या मनाची महाद्वार सताड उघडे ठेवलेली दिसते
गोष्ट निश्चित आहे की माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जे केले ते या लोकोत्सवातून कधीच साध्य होणार नाही आज शेतीच्या संदर्भातील एक आर्थिक क्रांती ही राजू शेट्टीनी घडवून आणली मात्र या महाराजांना हे जमले नाही शेतकऱ्यांच्या बड्या नेत्याला महाराजांनी मठावर या कार्यक्रमात का बोलावले नाही हे कोडेच आहे कदाचित भाजपची त्यांना सक्त आज्ञा असावी
स्वतःची खासदारकीची स्वप्ने बाळगून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उमा भारती साध्वी प्रज्ञा अशा राजकारणी संन्याशांची वाट पकडली आहे पैशाच्या मागे लागणाऱ्या भगव्या वस्त्रधारी लोकांना महाराष्ट्रीय संतांच्या शब्दात ढोंगीच म्हणायला हवे हे कसले संन्याशी संन्यास धर्माची बदनामी करणारे बोके
पंचमहाभूत लोकोत्सवातून कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेच्या मानेवर भूतकाळाचे भूतच आणून ठेवले आहे वास्तविक लिंगायत समाजाने अशांना जाब विचारायला हवा त्यांना जाब विचारणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे सिद्धेश्वर स्वामी ते अलीकडेच वारले
जनता ही खुळी आहे महाराजांचे आध्यात्मिक तेज की पैशाचे ते यातील फरकच त्यांना कळत नाही त्याही मुक्या बिचार्या गाईप्रमाणे महाराज त्यांना हाकलतील तिकडे हाकलतात एक दिवस शिळ्या खराब झालेल्या उपदेशाचा मलिदा खाऊन तेही पंचमहाभूतात विलीन होतील कोणी सांगावे...!
धार्मिक लोक आता असे बोलू लागलेत की गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात असे संघाचे प्रमुख सांगतात अशा पवित्र गाईंना लिंगायत धर्मातील एका मठा धिशाने यम सदनास धाडले तेही शिळे अन्न घालून त्यामुळे पवित्र गाई सदेह वैकुंठाला गेल्या याचे पाप आता कणेरी मठाचा मठाधीश कसे फेडणार या जन्मी तर शक्य दिसत नाही असे पैठणच्या ब्राह्मणांनी भाकीत केले आहे एकंदर या महाराजांचे ग्रह फिरलेले आहेत त्यामुळे त्याला आमदार खासदार होता येणार नाही आणि मठाधीशाच्या गादीवरही यापुढे बसता येणार नाही असे पंचांग कर्त्यांचे म्हणणं आहे
*-डॉ सुभाष देसाई कोल्हापूर*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!