अत्यावश्यक सेवेतून माध्यमकर्मीना वगळण्याचे सुपीक डोकं कुणाचे?
अत्यावश्यक सेवेतून माध्यमकर्मीना वगळण्याचे सुपीक डोकं कुणाचे?
• निर्णयाचं घोडं कुठे पेंड खाते यापेक्षा राजकीय इच्छाशक्ती महत्वाची !
चौथा स्तंभ हे शासनाचे डोळे नि कान ! ते सक्षम असणे आवश्यक !
जळगाव : जिल्ह्य़ातील सर्व पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्ग यांचे लसीकरणासाठी जाहीर निवेदन काढले गेले,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यानी दिलेले निर्देश पोहोचवले गेले! जळगावला जे जमलं ते इतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यातील सर्व जनसंपर्क विभागाना का जमत नाही? मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून सद्यस्थितीत सर्वसमावेशक सर्वहितार्थ काम होणेबाबत सूचना सर्वाना दिल्या गेल्या नाहीत का? या विभागाकडे निर्णय घेण्याचा अधिकार नाही ,तर मग ज्या कोणा संबंधित विभागांचे वरिष्ठांकडून महत्त्वपूर्ण निर्णय होतात,ते कोणत्या भूमिकेतून विचार करतात हा विचार करण्याचा ,अत्यंत चिंतनीय विषय आहे! तोच सध्या ऐरणीवर आहे! पत्रकार आपल्या अन्यायकारक घटनाबाबत आपल्याच माध्यमातून लिहू शकत नाहीत! कारण माध्यमकर्मी एकसंघ होणे मालकाना परवडणारं नाही! आता अत्यावश्यक सेवेतून वळल्यावर हेही बोलू लागले!
मुख्यमंत्री महोदय व पत्रकार हितासाठी आस्तेकदम का होईना निवेदन देणारे सर्व जननेते सकारात्मक आहेत असं मानलं तर,मग घोडं कुठं पेंड खातय?
• जरा विचार करा! आमदारांचे,खासदारांचे पगार भत्ते,सुविधा वाढवण्यासाठी निर्णय एकीने नियोजनबद्ध होऊ शकतात! लोकशाहीचे 3ही स्तंभांना विशेषाधिकार आहेत! अधिकारात सुधारणा करणे ,वाढवणे हे अधिकारही याचेकडे आहेत! मात्र4थ्या स्तंभाकडे नाहीत!
• हा स्तंभ जनतेचा आरसा आहे रक्षक आहे!आपल्या माध्यमांतून सत्य समोर आणून लोकशाही बळकट करणारा आधार! याचेवर हल्ले,आघात अनेक मार्गाने होतात... अगदी कामाची काहीच खात्री न उरण्याचे कायदे बनवणारे महान केंद्र सरकार!
• आर्थिक तंगी व इतर कारणाने गळे घोटणे,हक्काचे वेतन मागितल्यावर छळवणूक करणे,अगदी लोकशाहीच्या मुळावर आघात करणाऱ्या आभासी पेड बातम्यांसाठी पैसे वसुली करणारे असा शिक्का लावणे,ठराविक बिटचे कुरण तयार करणे, गॅग तयार करणे पासून ते मालक धार्जिण्या हेतूने 4 था स्तंभ नेहमीच अधिकार शून्य ठेवणेपर्यत सगळे प्रकार होत आलेत !
• मूळात 4थ्या स्तंभाचा आत्मा असलेला श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्ग सक्षम व्हावा, त्याने आपले काम प्रामाणिकपणे करावं व सन्मानाने जगावं असं कुणालाही वाटत नाही हे वास्तव आहे!
• प्रशासनातील अधिकारी 4थ्या स्तंभाला सक्षम करू इच्छितात का यावर सगळ अवलंबून आहे!महत्वाचं आहे ते घोडं कुठे पेंड खाते ? हे नसून मस्तवाल घोड्याला काबूत आणून जनहितार्थ काम करवून घेणारे नेतृत्व कोण करू शकतो हे ? पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्ग हे श्रमिक कामगार आहेत तर मग त्यांचे हित कोण पाहाणार?
• या आपत्कालीन काळात शासकीय ,निमशासकीय इतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून सर्व मदत व सुरक्षा वीमा कवच मिळते, मग नेहमीच अत्यावश्यक सेवेत असणारा 4था स्तंभ (पेपर छपाई,वितरण परवानगी,गाडी असलेल्यांना काम करण्यास मंजुरी,यात चॅनल्स महत्त्वाचे) अत्यावश्यक सेवेतून बाहेर काढण्याचे काळे काम कुणाच्या सुपीक डोक्यातून आले ,हे कळले तरी काय करणार कोण?
• इथे महत्त्वाची आहे ती राजकीय इच्छाशक्ती! जर ती नसेल तर काहीही फरक पडणार नाही!कितीही पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी या कोरोनाआपत्कालीन स्थितीत कितीही बळी पडले तरी यांना काहो फरक पडणार नाही . कारण इथे प्रत्येकाला सत्तेची खुर्चीचा खेळ खेळायचा आहे! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांची नीती जर अभ्यासली तर सगळे विषय सोपे होतील...महाराजांनी जमिनीवरील गडांसह जलदुर्गाचे महत्त्व जाणून समुद्रीमार्ग मजबुत केले!
• गुप्तहेरखाते मजबूत केले! स्त्रीशक्ती,गुणीजनाचा,सर्वधर्मीय सन्मान केला! अठरापगड जातीजमातीचे सहकारी जोडले,त्यांची कदर केली! छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते जगात बलाढ्य होते! बाळभीमराव नाईक निंबाळकर तथा बहिर्जी नाईक…… हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते.... यात गनिमीकावा सर्वश्रेष्ठ!
• 4था स्तंभ हा समाजाचे आरसा असल्याने जनहिकारी राज्यकर्त्यांचे डोळे व कान असतात! पण यातच कचरा साचत असेल तर ती तशीच राहू देणे हे सरकार व लोकशाहीला घातक आहे! आणि हे समजण्याची ,सुधारणा करण्याची क्षमता सगळ्यांकडे असते.पण राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे महत्त्वाचेच!
• असो वर्तमानात खरे श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्ग चक्रव्यूहात लढत आहेत! कोंडी फोडणे अत्यावश्यक! पण एक आहे हा अभिमन्यू मारला जाणार नाही,कारण त्याचेकडे खुलेपणा लढण्यासाठी अनेक शस्त्र आहेत! चौथा स्तंभ आणखी नव्या झळाळी ने उभा राहिल कारण कधी नाही इतका तो जागरूक झालाय ! लढाई हक्काची,सन्मानाची आहे! परिवर्तन तर होणारच!
• आणि हो सर्वश्रेष्ठ गुरू 4थ्या स्तंभासोबत आहेत! जिथे अन्याय, अधर्म वाढतो तिथे तो असतोच! हे लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण!
• आता आमचेबाबत अचूक निर्णयाच सरकारी घोडं पेड खात चुकारपणा करत राहणार की जबाबदारीने कामाला लागणार हे पहायचे!
• शीतल करदेकर :अध्यक्ष एनयुजेमहाराष्ट्र
• सचिव:एनयुजे इंडिया, नवी दिल्ली
• 7021616645
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!