आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक
आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या बाबत संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून सकारात्मक निर्णय करू असे अश्वासन ग्रामविकास व कामगार मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी सिटु सलग्न, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या शिष्टमंडळास दिले.
आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्याचा दर्जा मिळावा व आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी राज्यातील सुमारे 70 हजार आशा व गटप्रवर्तक 15 जुन 2021पासून बेमुदत संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज सिटु अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना संघटनेच्या वतीने कागल येथे त्यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळ भेटले.
या निवेदनामध्ये आशांना 18000 रु व गटप्रवर्तकांना 22000 रु किमान वेतन मिळावे,कोवीड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता 300 रु प्रमाणे सर्व समान शहरी व ग्रामीण आशा व गटप्रवर्तकांना मिळावा, गटप्रवर्तक कांचे अकरा महिन्याचे करार पत्र बंद करून त्यांना आशां प्रमाणे कायम नियुक्तीचे पत्र देण्यात यावे, गटप्रवर्तक यांना आशां प्रमाणे रेकॉर्ड किपिंगसाठी 3000रु मोबदला मिळावा,राष्ट्रीय मोहिमांमध्ये गटप्रवर्तकांना वेगळा मोबदला देण्यात यावा, गटप्रवर्तकांना प्रतिदिन 25रु दैनिक भत्ता मिळतो त्यामध्ये वाढ करण्यात यावी, आशा व गट प्रवर्तक यांना प्रसूती व मेडिकल रजा या पगारी मिळाव्यात, आशा व गट प्रवर्तक यांना 500रु मोबाईल भत्ता मिळावा,गटप्रवर्तकांना आशा साॅप्टवेअर भरण्यासाठिचा भत्ता प्रतिदिवस 50रुआहे(पाच दिवसांकरीता)आहे तो प्रतिदिवस 500रु मिळावा.आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी सिटुचे जिल्हा सचिव शिवाजी मगदुम,तालुका संघाचे मा. सदस्य सुरेश बोभाटे,संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा नेत्रदिपा पाटील, जिल्हा सचिव उज्वला पाटील, तालुका अध्यक्षा मनिषा पाटील, जिल्हा सह सचिव माया पाटील, सुरय्या तेरदाळे, सुप्रिया गूदले,अनिता अनुसे, विद्या बोभाटे,उषाताई नलवडे,मनीषा भोसले, रमिझा शेख,अर्चना कांबळे, राणी मगदूम, नंदा पाटील, आरती लुगडे, पदमा भारमल, सारिका तिप्पे, वंदना सातवेकर, मनीषा चौगले, बेबीताई पावले,वंदना साठे ,सुजाता मगदूम, सविता आडुरे, शोभा आगळे ,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!