राज्यस्तरीय पोवाडा व पाळणा गायन स्पर्धा : डॉ वर्षा चौरे
राज्यस्तरीय पोवाडा व पाळणा गायन स्पर्धा
मुंबई: आज आपण स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अखंड जीवन वाहिलेल्या महापुरुषांना विसरून चालणार नाही. याचसाठी मे - जून २०२३ मध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती आणि ऑनलाईन पोवाडा व पाळणा गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा ग्लोबल ताज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२० मध्ये बेस्ट यूट्यूब चॅनल अवॉर्ड विजेते DR VARSHA R CHOURE या चॅनल मार्फत घेण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन डॉ वर्षा रामचंद्र चौरे यांनी केले आहे.
स्पर्धेस पात्र स्पर्धकांना प्रमाणपत्र व प्रोत्साहन पारितोषिक दिले जाणार असून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिली जाणार आहेत.
प्रथम क्रमांकास ₹५००००/-,
द्वितीय क्रमांकास ₹४००००/-,
तृतीय क्रमांक विजेत्यास ₹३००००/- पारितोषिक देण्यात येणार आहेत.
स्पर्धा प्रवेशाबाबत:
१. प्रत्येक पोवाडा/ पाळणा यासाठी ₹१०००/- प्रवेश फी असेल.
२. एका पेक्षा जास्त पोवाडा/ पाळणा यात भाग घेता येईल.
३. नोंदणीकृत स्पर्धकांना पोवाडा / पाळणा आमच्याकडून देण्यात येईल. तेच गायचे आहे.
४. दिनांक ५ मार्च २०२३ रात्री ८:०० वाजे पर्यंत 8424867070 या नंबर वर sms करून आपली नावनोंदणी करावी.
६. नावनोंदणी नंतर स्पर्धकांना स्पर्धेचे नियम व अटी सांगितले जातील आणि payment साठी लिंक दिली जाईल.
आपल्या संपर्कातील गायक व शाहीर यांना पाठवावे ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!