पशुवैद्यकीय डॉक्टरांची लंपी विरोधातील लढाई यशस्वी: उमेश मगदूम
पशुवैद्यकीय डॉक्टरांची लंपी विरोधातील लढाई यशस्वी: उमेश मगदूम
सिद्धनेर्ली : (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या पशुधनावर आलेल्या लंपीसारख्या रोगाला परतावुन लावण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केलेली लढाई यशस्वी झाली, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी उमेश मगदूम यांनी केले ते २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आर एम कार्पेट अॕन्ड लाईट हाऊसच्या वतिने आयोजित केलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना देण्यात आलेल्या "लंपी योद्धा सन्मानपत्र" वितरण सोहळ्यात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा विठ्ठल कांबळे हे होते.
यावेळी बोलताना उमेश मगदूम पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा शेती नंतरचा मुख्य व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे,लंपीमुळे हा व्यवसायच मोडकळीस येतो की काय अशी भिती पशुपालकांना होती परंतु शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी वेळीच या पशुधनाला योग्य उपचार पद्धती अवलंबल्यामुळे, या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यात यश मिळाल्याचेही उमेश मगदूम यांनी यावेळी बोलुन दाखवले.
यावेळी बोलताना तालुका विस्तार अधिकारी डॉ दिपक घनवट म्हणाले, लंम्पीसारख्या आजारावर मात करण्यासाठी आम्ही जरी प्रयत्न केले असले तरी खरी खबरदारी व जबाबदारी पार पाडावी लागली आहे ती पशुपालकाला, आपल्या पशुपालकाने जर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नसते, जनावरांच्याकडे दुर्लक्ष केले असते तर कदाचित लंपी आजाराने मृत जनावरांची संख्या वाढली असती.त्यामुळे पशुपालकच खरा लंपी योद्धा आहे, असे प्रतिपादन डॉ घनवट यांनी केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना, प्रा. विठ्ठल कांबळे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आर. एम. कार्पेट अॕन्ड लाईट हाऊस ने घेतलेला कार्यक्रम हा, कृतिशील कार्यक्रम आहे, अशा उपक्रमाने दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना न्याय मिळतो,या कृतिशील कार्यक्रमाचा इतरांनीही बोध घ्यावा असे आवाहनही प्रा कांबळे यांनी केले.
यावेळी सत्कारमूर्ती मान.डॉदिपक घनवट यांच्यासह डॉ रघुनाथ मगदूम,डॉ उदय पोवार, डॉ गोविंदा पाटील, डॉ कृष्णात मगदूम,डॉ. संदीप कांबळे,डॉ बाबासाहेब पाटील,डॉ बाजीराव कांबळे,डॉ वैभव कांबळे आदी पशुवैद्यकीय डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय कुरणे, अनिल पोवार, सागर साळोखे, दिपक माने, सुशांत मगदूम, संभाजी मगदूम, स्वप्नील मगदूम, पवन पोवार, राज पाटील, सुरज लाड, सुदर्शन लोहार,निखिल चौगुले, अमित कांबळे, मोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पोतदार यांनी केले, प्रास्ताविक मधुकर येवलुजे यांनी तर सर्व मान्यवरांचे स्वागत आर एम कार्पेट आणि लाईट हाऊसचे सर्वेसर्वा रोहन मगदूम यांनी केले तर शेवटी आभार कॉ शिवाजी मगदूम यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!