अक्कलकोट(वीरभद्र पोतदार): तालुक्यातील दुधनीत मंगळवारी 2 रुग्ण पॉझिटीव्ह आढळताच भाजीपाला मार्केट कन्टोन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. दुसर्या दिवशी त्याच दोन रुगणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. म्हणून मग भाजी विक्रेते यांनी दुकान चालु करुन भाजी विक्रीस परवानगी द्यावी म्हणून नगरपालिकेसमोर रस्ता बंद आंदोलन केले.
मुख्याधिकारी यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार कंन्टेनमेंट झोन मधील सर्व दुकाने 19 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत. भाजी विक्रेत्यांना भाजीपाला मार्केट च्या मागील बाजूस 70 फुट रोडवर भाजीपाला विक्रीस परवानगी दिली आहे. तसेच मास्क न घालुन फिरणार्यांना व विक्रेत्यांना 100 ₹ चा दंड आकारण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!