एसटी उर्फ लालपरी
वरवर पाहता किरकोळ वाटणारी गोष्ट किती दूरगामी परिणाम करते.
एसटी का जगली पाहिजे आणि का सक्षम राहिली पाहिजे.
मोठ्या राज्यात जिथे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भाग आहेत तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कळीचा मुद्दा आहे.
शहरात सिटीबस, मेट्रो, रेल्वे सगळ आहे, खाजगी वाहने आहेत आणि शाळांच्या स्कूल बस आहेत.
ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भागात, विरळ लोकवस्तीच्या भागात शाळा असण हीच मोठी गोष्ट.साहजिकच शिकायला वाहतुकीची साधन गरजेची.
महाराष्ट्रात मागील चार पिढ्यांची हि गरज एसटीने भागवलेली आहे.
शाळकरी-कॉलेज विद्यार्थी विद्यार्थीनी ग्रामीण भागातून जाण्यासाठी याच व्यवस्थेवर अवलंबून आहेत. मासिक पासमुळे स्वस्त सुविधा, जेवणाचे डबे येण्याची सोय या बाबी महत्वाच्या.
एसटीच्या फेऱ्या ग्रामीण भागात कमी होणे किंवा जास्त प्रवासी असलेल्या मार्गावर बसेस चालणे, बसेसची एकूण संख्याच कमी होण याचा थेट संबंध मुलींच्या शिक्षणाशी आहे.
एसटी बंद तर मुलींचं शिक्षण बंद.
खाजगी वाहतुकीने ,वडाप ,रिक्षाने मुलींना पालक शाळेत पाठवणार नाहीत. सगळ्याच शाळांकडे स्कूलबस नाहीत आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांची फी मुलींच्या बापाला परवडत नाही.
मग मुलगी शिकली प्रगती झाली किंवा एक शिकलेली मुलगी एक कुटुंब सुधारते हे फक्त पुस्तकात वाचायचं.
याचा पुढला परिणाम सांगू का ?
शिक्षित-कुशल मनुष्यबळ कमी होणे, परिणामी मजुरांची संख्या वाढणे , मागणी पुरवठा नियमाप्रमाणे मजुरीची रक्कम कमी होणे आणि लोकांची क्रयशक्ती कमी होणे.
त्याचा पुढला टप्पा म्हणजे एकूणच राज्याची आर्थिक प्रगती मंद झाल्यास सगळ्याच विकासाच्या गाड्याला खीळ बसणे.
उद्योग-व्यापारात महाराष्ट्र आघाडीवर असण्याला हि एसटी जिला आपण लालपरी म्हणतो तिचाही मोठा वाटा आहे. शिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात आणि कामावर जाणाऱ्या लोकांना सार्वजनिक वाहतुकीचे स्वस्त , खात्रीशीर साधन उपलब्ध करून देण्याला.
मूठभरांच्या स्वार्थासाठी एसटी महामंडळाची कबर खोदणे म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राची प्रगतीची चाक खड्ड्यात घालणे.
शिक्षणसंस्था उभारण्याला, सरकारी अनुदानाला भिक म्हणणे, पटसंख्या कमी झालीच्या नावाखाली शाळा बंद करणे आणि एसटी बंद करून त्या माध्यमातून मुलींचं शिक्षण बंद करणे हे सगळे बहुजनांचा शिक्षणाचा हक्क नाकारून त्यांच रुपांतर फक्त वेठबिगार गुलामात करण्याच षडयंत्र आहे.
अर्थात धर्माची अफू पिऊन तर्र झालेल्या बहुजनांना हे कळेल तेव्हा उशीर झालेला असेल.
#आनंदशितोळे
#रविवारची_पोस्ट
#शिक्षणहक्क
#एसटी #ST #लालपरी #शिक्षण #मुली #Female #Education
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!