जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे ? समज-गैरसमज

भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे ? समज-गैरसमज

भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे, असे काही समीकरण तयार करता येणार नाही. तेव्हा हाडे मजबूत करण्यासाठी कोणी अतिरेकी कॅल्शियम घेत असेल तर त्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे. माणूस वृद्धत्वाकडे झुकायला लागला की, त्याची हाडे नाजूक व्हायला लागतात आणि छोट्या-मोठ्या अपघाताने फॅक्चर होणे असे प्रकार घडायला लागतात. शरीरामध्ये कॅल्शियम कमी असले की, हाडे लवकर कमकुवत होतात आणि असे प्रश्न निर्माण होतात. म्हणून कॅल्शियमचा पुरवठा शरीराला भरपूर झाला पाहिजे, असे डॉक्टर सांगतात.

वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत शरीराला कॅल्शियम मिळत आहे की नाही, याचा कधी विचार केलेला नसतो आणि 50 व्या वर्षानंतर त्याचे परिणाम जाणवायला लागतात. मग लोक जागे होतात आणि टॉनिक, पोषक आहारद्रव्ये यांच्यासोबतच कॅल्शियमही दिले जाते. आता ही गोष्ट सर्वांना माहीतच झालेली आहे.

ऑस्टिओपोरोसिस हा विकार वृद्धत्वात टाळण्यासाठी शरीराला कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे, हे लोकांच्या मनावर बिंबले आहे. मात्र, आता याबाबतीतसुद्धा तज्ज्ञांमध्ये वेगळा अनुभव यायला लागला आणि त्यांनी याबाबतीत थोडा सावधानतेचा इशारा दिला आहे. भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे, असे काही समीकरण तयार करता येणार नाही. तेव्हा हाडे मजबूत करण्यासाठी कोणी अतिरेकी कॅल्शियम घेत असेल तर त्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे. काही वेळा मर्यादेपेक्षा अधिक कॅल्शियमचा पुरवठा शरीराला झाला तर उलट हाडांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संबंधीचे शास्त्र थोडे समजून घेतले पाहिजेत. ऑस्टिओपोरोसिस हा कॅल्शियमच्या कमतरतेचा विकार नाही.

तेव्हा केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडे मजबूत होतील आणि वृद्धावस्थेमध्ये ऑस्टिओपोरोसिसपासून सुटका होईल असे काही मानता कामा नये. ऑस्टिओपोरोसिस हा फार गुंतागुंतीचा विकार आहे. त्यामागे व्यायामाचा अभाव, दीर्घकाळचा शरीराचा दाह, जीवनसत्त्वाचा अभाव, सूक्ष्म द्रव्यांचा अभाव आणि पोषणविषयक असमतोल हीसुद्धा ऑस्टिओपोरोसिसची कारणे आहेत. तेव्हा हे लक्षात घेतले म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस टळेल, हा गैरसमज असल्याचे समजेल. हे टाळायचे असेल तर ‘ड’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारा आहार घेतला पाहिजे. शरीराला थोडे उन्हातून फिरवले पाहिजे. उन्हातून मुबलक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.

जाहिरात
शिव आयुर्वेद सेवा चे शुगर फाईटर 16 प्रकारच्या प्राचीन भारतीय वनस्पतींनी युक्त मधुमेह साठी रामबाण शुगर फाईटर एक वेळ वापरुन खात्री करा🌱 संपर्क.
8999431330
7725800900


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!