कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची डिजिटल बँकिंगमध्ये गरुड भरारी…!
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रगती देदीप्यमान......
सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे गौरवोद्गार......
बँकेच्या भिम ॲपचे केले लॉन्चिंग......
कामकाज आढाव्याचीही बैठक......
कोल्हापूर, दि. ६: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००९ ते २०१५ या सहा वर्षाच्या काळात प्रशासकीय कारकीर्द होती. प्रशासकाच्या काळानंतर गेल्या सात वर्षात या बँकेने केलेली प्रगती देदीप्यमान आहे, असे गौरवोद्गार सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी काढले.
सहकारातील शेतकरी सभासदांच्या विकास सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक व राज्य सहकारी बँक या त्रिस्तरीय रचनेमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे कामकाज गौरवास्पद आहे, असेही ते म्हणाले.
आयुक्त श्री. कवडे यांच्यासह अप्पर आयुक्त शैलेश कोथमिरे, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, लेखापरीक्षणचे विभागीय सहनिबंधक श्री. छत्रीकर या अधिकाऱ्यांची जिल्हा बँकेत आढावा बैठक झाली. यावेळी बँकेच्या "भिम ॲप"चे अनावरण आयुक्त श्री. कवडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. ए. बी. माने यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती व विविध योजनांचे सादरीकरण केले.
आयुक्त श्री. कवडे यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीचे आणि विविध योजनांचे कौतुक केले. बँकेने प्रशासक कालावधीनंतर विशेष प्रगती साधल्याबद्दल अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ व संचालक मंडळाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. बँकेच्या सांपत्तिक स्थितीमध्ये झालेली तिप्पट वाढ, बँकेने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांचेही त्यांनी कौतुक केले.
बँकेचे जेष्ठ संचालक व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर म्हणाले, बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गरुडझेप घेतली आहे. संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, जिल्हाभरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गावातीलच मायक्रो एटीएममधून अंगठ्याद्वारे पेन्शन मिळण्याची व्यवस्था बँक राज्य बँकेच्यामार्फत करीत आहे. त्याला सहकार विभागाने गती द्यावी. तसेच नोटाबंदीच्या काळातील २५ कोटीच्या नोटा बँकेकडे पडून आहेत. त्या रिझर्व बँकेने परत घेण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा करावा. बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, सहकार आयुक्तानी केलेल्या सूचनांची बँक पूर्तता करेल.
"डिजिटल बँकिंगमध्ये गरुडझेप......."
आयुक्त श्री. कवडे यांनी जिल्हा बँकेने डिजिटल बँकिंगमध्ये टाकलेल्या क्रांतिकारक पावलांचे कौतुक केले. भिम ॲप लॉन्चिंग हे त्यातील महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले. डिजिटल बँकिंग प्रगतीमधील महत्त्वाची टप्पे असे...........
●भिम ॲप ही विनामूल्य सेवा, प्ले स्टोअर वर उपलब्ध .....
● २०१३ साली शंभर टक्के कोअर बँकिंग व २०१९ साली स्वतःचा सीबीएस प्रकल्प हाती घेतला.....
● रुपे कार्ड, ३२ एटीएम केंद्रे, मोबाईल बँकिंग, यूपीआय, मायक्रो एटीएम, चार मोबाईल व्हॅन या डिजिटल सुविधा कार्यान्वित......
● नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या प्राधिकरणाकडून भिम ॲपला मंजुरी. ३२ हजारपेक्षा अधिक ग्राहक यूपीआय सेवा वापरत आहेत.. भिम ॲप ही अधिक सुरक्षित.
● ग्राहकांना २४ तास आयएफएससी कोड व बँक खाते नंबरशिवाय व्यवहार करता येणार. क्यू आर कोड, मोबाईलनंबरद्वारेही पैशाची देवाण-घेवाण चालणार.......
●३२ एटीएम व ३९७ मायक्रो एटीएमच्या माध्यमातून गाव पातळीवरही सुविधा. विशेषता दूधबिलेही मिळतात गावातच. लवकरच अंगठा लावूनही करता येणार व्यवहार......
यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी आरोग्य मंत्री आमदार डाॅ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. स्वाती कुंभार यांनी केले.
कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या "भिम ॲप"चे अनावरण सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
#कोल्हापूर #जिल्हामध्यवर्तीसहकारीबँक
#सहकार #KDC #भीम #यूपीआयपेमेंट
#UPI #BHIM #App #DigitalBanking
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!