ना ब्रिटन मध्ये NAAC सारखं काही आहे, ना अमेरिकेत. जगातली सर्वात उत्तम विद्यापीठे ज्या देशात आहेत् तेथें हे प्रकार नाहीत.. तरी तेथे उच्च शिक्षण व्यवस्था बऱ्यापैकी आहे. Academic performance index हा तर कुठेच नाही.. आपल्याकडे हे दोन्ही आहेत पण आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेला उच्च वगैरे म्हणायला जीभ अडखळते खरे तर.. साप चावून मरायला टेकलेल्या पेशंट च्या भवती मांत्रिक लोकं चप्पल आपटतात, कसले कसले पाणी घेउन वर्तुळे काढतात, आकाशाकडे बघून कसले तरी मंत्र पुटपुटतात. पेशंट वाचत नाही ह्याची खात्री असते वैदुला, पण काही तरी केल्या सारखे दाखवावे लागते. NAAC वगैरे ही तसलीच झाडफुक आहे. चांगली, दर्जेदार विद्यापीठे स्वतःच्या तेजाने जगाला स्पष्ट दिसतात. त्यांना कसलेच certificate नको असते. पण ज्याच्याकडे व्यवस्थेने दिलेले सर्टिफिकेट असेल तो ज्ञानी आणि ज्याच्या कडे नाही तो अडाणी मानणारी आपली फडतूस व्यवस्था आहे. वैदू लोकांची माञ उत्तम सोय झालीय.
डॉ. नीरज हातेकर
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!