पहिली शिक्षण विचार परिषद संपन्न
कोल्हापूर :(ता.२१ऑगस्ट) येथील चित्रदुर्ग मठ येथे कर्मवीर भाऊराव पाटील #शिक्षण विकास मंच व मोहनदास करमचंद गांधी मंच आयोजित पहिली शिक्षण विचार परिषद संपन्न झाली। सदर परिषदेस विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या #शिक्षण विचार परिषदेचा मुख्य विषय "नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण" हा होता. डॉ. बी. एम. हिर्डेकर हे परिषदेच्या अध्यक्ष स्थानी होते. प्राचार्य डॉ. जे. पी. माळी, प्रा. कॉ. अतुल दिघे, adv. रविराज बिर्जे-पाटील, प्रा. टी. के. सरगर, अभिषेक मिठारी यांनी यावेळी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनेक त्रुटींवर बोट ठेवत सर्वसामान्य लोकांना शिक्षणापासून वंचित राहत शिक्षण प्रवाहापासून दूर फेकले जाऊ नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केले. डॉ. हिर्डेकर यांनी शिक्षण धोरणातून निसटलेल्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. प्रा. दिघे यांनी कष्टकऱ्यांच्या हातून शिक्षण काढून घेण्याचा प्रयत्न या धोरणातून दिसून येत असल्याचे सांगितले. तर डॉ. माळी यांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात शिक्षण राहावे यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखीत केली. Adv रविराज बिर्जे यांनी कायद्यातील अनेक बारकावे स्पष्ट करत शिक्षण विषयक अनेक कायद्यांची सुलभ मांडणी केली.
यावेळी, "लोकांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण" असा मसुदा तयार करून सर्वसमावेशक आणि लोकांचे लोकांसाठी असणारे शिक्षण धोरण मांडण्याचा ठराव परिषदेत संमत करण्यात आला.
बसव केंद्र, मावळा, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी आयोजनात सहभाग घेतला. यावेळी, राजशेखर तंबाखे, चंद्रशेखर बटकडली, बाबुराव तारळी, मावळा चे उमेश पोवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, डॉ अनमोल कोठाडीया, विक्रम भोसले, संभाजी ब्रिगेड चे निलेश सुतार, सुभाष पाटील, सुरज पुरी, यश आंबोळे, कार्तिक पाटील, यांचेसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वृत्त प्रतिनिधी
-अभिषेक मिठारी 9011637777
#शिक्षण #विचार #परिषद #कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!