जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बस्तवडेच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तब्बल एक लाखाचे दान

९० वर्षीय संत साहित्याचे अभ्यासक आदरणीय पां.रा.पाटील गुरुजी यांनी बस्तवडे विठ्ठल मंदिराच्या सेवा कार्यास दिली एक लाख रुपयांची देणगी.


निस्सीम विठ्ठल भक्त असणाऱ्या गुरुजींकडून गेली २५ वर्षे मंदिरात प्रतिएकादशीला विनामोबदला प्रवचन सेवा.!


राज्यात ज्या विठ्ठल भिशीची चर्चा अनेक ठिकाणी होत आली आहे त्या आदर्शवत अश्या श्री.विठ्ठल भिशीची स्थापना देखील गुरुजींनीच केली आहे.

बस्तवडे ता कागल गावचे सुपुत्र असलेल्या पां.रा.पाटील गुरुजी यांनी एक शिस्तप्रिय व आदर्श शिक्षक म्हणून अप्रतिम, प्रेरणादायी असे काम केले आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यातून गुरुजींचे ते शैक्षणिक कार्य ऐकायला अनुभवायला मिळते. याबरोबरच मराठी व्याकरणात तर गुरुजींचा अगदी हातखंडाच..! व्याकरणाचार्य हीच पदवी त्यांना द्यावी लागेल. 
आज ९० व्या वर्षी देखील त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, प्रासादिक विवेचन,अचाट स्मरण व सहज वक्तृत्व हे सारेच कौतुकास्पद आहे.ह्या वयात प्रति एकादशीला प्रवचन सेवा निरंतर सुरू आहे.ही त्या श्री.विठ्ठलाचीच कृपा आहे असा नम्र भाव त्यांनी गेल्या फाल्गुन वद्य एकादशीला व्यक्त केला व त्याचवेळी श्री.विठ्ठल मंदिराच्या सेवा कार्यास रोख एक लाख रु देणगी मंदिर व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली.
  
या उपक्रमाची देखील स्थापना..!

 जवळपास २० वर्षे गुरुजींनी विठ्ठल मंदिरात नित्य ग्रंथ वाचनाची सेवा बजावली. आपला अभ्यास जरी उच्चतम असला तरी, साध्या सुध्या भोळ्या भाबड्या शेतकरी श्रोत्यांना त्यांनी सदैव सहज बोलातून ग्रंथ समजून सांगितले.बस्तवडे विठ्ठल मंदिरात प्रति एकादशी ही छोट्या नाम सप्ताह स्वरूपात साजरी करण्याची परंपरा २५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात देखील गुरुजींचे मोलाचे योगदान..!

दर एकादशीला सकाळी ९ वाजता भजनाने विणा उभी केली जाते, त्यानंतर प्रति तासाचे विणा पहारेकरी विणा सेवा बजावतात,सायंकाळी ५ ते ६:३० हरिपाठ, ७ ते ८ प्रवचन, रात्री ८ ते ९ भिशी संकलन, ९:३० वाजता संगीत भजन जागर, द्वादशी पहाटेला काकडा आरती व सकाळी १० वाजता पुन्हा भजनाने विणा उतरली जाते व त्यानंतर दीडशे ते अडीचशे जणांचा भोजन प्रसाद असतो व या दीड दिवसाचा खर्च दोन तीन विठ्ठल भक्त करतात, असा हा उपक्रम.

या संयोजक जोड्या १९९७ मध्येच निश्चित केल्या आहेत व त्यानुसार हा उपक्रम अव्याहत सुरू आहे. याची संकल्पना व यातील प्रति एकादशीचे प्रवचन हे गुरुजीच करीत आले आहेत व तेही एक रुपया न घेता..!

१९६५ मध्ये राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक बळवंत लवाटे गुरुजी यांनी या विठ्ठल मंदिराची स्थापना करुन नाम सप्ताह व बारमाही ग्रंथवाचन सुरू केले त्याच मंदिरात पां.रा.पाटील गुरुजी यांनी विठ्ठल भिशी नावाचा एक अर्थकारणात आदर्श उभारणारा उपक्रम सुरू केला.या भिशीला २४ वर्षे झाली. त्याची स्थापना करण्यासह सलग १५ वर्षे पारदर्शी व्यवस्थापक या नात्याने भिशीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या भिशीने विठ्ठल हाच कारण तारण व जामीन मानून विठ्ठल भक्तांना खासगी सावकारकीतून मुक्त केले व भरलेल्या भिशीला व्याज १४ ते १५ टक्के दिले जात आहे. भिशीच्या अर्थकारणातील गुरुजींचा पारदर्शीपणा व निरपेक्ष भावाचा संस्कार सर्व मंदिर व्यवस्थापक व भाविकांवर पडला म्हणून तर, देवासमोर ठेवलेला एक रुपये देखील रोजकिर्दीला अनामीकाने ठेवलेला रुपया म्हणून जमा होतो.

कोणताही गाजावाजा न करता हे सारे कार्य करताना परवा त्यांनी मंदिराच्या सेवा कार्याला एक लाख रुपयांची देणगी दिली. ही देणगी व गेली अनेक वर्षे ते देत असलेले विविध माध्यमातील योगदान अनमोल आहे. 

शब्दांकन : 
श्री. मधुकर भोसले
पत्रकार, दै. पुढारी, मुदाळतीट्टा
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!