जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

जोतिबा अडकला राजकारणात

"जोतिबाच्या नावानं चांगभलं!!" 
पत्रकार अमोल शिंगे यांचा खास लेख


असं म्हणून जोतिबाच्या नावानं गुलाल उधळला की झालं माझं काम अशी मानसिकता करून घेतलेल्या सर्वच स्तरातील लोकप्रतिनिधींनी सध्या जोतिबा डोंगर आणि डोंगरकरांच्या समस्यांकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सुमारे दीड वर्ष जोतिबाचे मंदिर बंद आहे. यामुळे जोतिबावरील गुरव समाजसह सर्वच स्तरातील नागरिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. जोतिबा मंदिर हाच जोतिबा डोंगरावरील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे सर्वज्ञात असूनसुद्धा लोकप्रतिनिधींनी जोतिबा डोंगराच्या या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर हे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्र आणि गोवा या भागातील भाविकांचे कुलदैवत आहे. वर्षाकाठी 70 ते 80 लाख भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी जोतिबा डोंगरावर येत असतात. जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करणे आणि त्यांची देवताकृत्य करणे हा येथील गुरव समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. डोंगरी भाग असल्याने शेती बेभरवशाचीच असल्याने ग्रामस्थांनी मंदिराशी निगडित असणाऱ्या व्ययसायांकडेच मोर्चा वळवला आहे. एकूणच जोतिबा मंदिर हाच अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. परंतु सध्या जगभर सुरू असणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून जोतिबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे जोतिबा डोंगरावर होणारी भाविकांची वर्दळ ठप्पच पडली आहे. जोतिबा डोंगरावरील बाजारपेठेत भयाण शांतता पसरली आहे. "जोतिबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात दुमदुमणारा जोतिबाचा डोंगर भयाण शांततेच्या विळख्यात सापडल्यासारखा दिसत आहे. गुलालाच्या उधळणीत लाल भडक दिसणारे जोतिबाचे मंदिर आणि परिसर रंगहीन दिसत आहे. एकूणच जोतिबा डोंगरावरील धार्मिक आणि आर्थिक वैभव जणू लुप्तच पावलं आहे. या दीड वर्षात दोन चैत्र पौर्णिमेच्या यात्रा आणि एक श्रावण षष्ठीची यात्रा रद्द झाल्याने भाविकांचे धार्मिक नुकसान झालेच आहे पण जोतिबावरील सर्वच स्तरातील लोकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी काही सेवाभावी संस्थांनी आणि व्यक्तींनी डोंगरकरांना मदतीचा हात दिला मात्र ही मदत दीर्घकाळ पुरणारी नव्हती. जोतिबा डोंगरावर मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काही धोरणात्मक उपाय योजना करण्याची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरणारी ठरली आहे. या दोन महिन्यात जोतिबावरील 6 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सुमारे 80 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते इतकी भयानक परिस्थिती असतानासुद्धा एकही लोकप्रतिनिधी जोतिबा डोंगरावर फिरकला नाही ही बाब जोतिबा डोंगरावरील मतदारांच्या दृष्टीने दुर्दैविच म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील दुष्काळ दुर व्हावा म्हणून जोतिबाला साकडे घालायला येणारे प्रसिद्धी पिपासू लोकप्रतिनिधी जोतिबा डोंगरावर सध्या सुरू असणाऱ्या समस्यांचा दुष्काळ मात्र दूर करू शकत नाहीत. या माझ्या पोस्टच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील दानशूर लोकांना जोतिबा डोंगरावरील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी अवाहन करत आहे. आमच्या जोतिबा डोंगरकरांची संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली ही एक आर्त हाकच समजा...!

फेसबुक पेजवरून साभार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!