जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बाभूळ" आणि "हाड मोडीवर औषध"

"बाभूळ" आणि "हाड मोडीवर औषध"

बाभळीच्या कोवळ्या खोडाने दात घासल्यास दंतरोगमुक्ती होते. व हिरड्या घट्ट होतात. याच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास तोंडाचे विकार दूर होतात. जुलाब, अतिसार, मधुमेह या विकारात सालीचा उपयोग केला जातो.  

याचे लाकूड सागवानापेक्षा दुप्पट टणक असते. लाकडाचा उपयोग इमारतीकरिता, घरबांधणी, शेती अवजारे, फर्निचर इत्यादीसाठी केला जातो.
याचे लाकूड इंधनाचे उत्तम साधन आहे. जाळण्याकरिता याच्या लाकडाचा उपयोग होतो. याची हळुवार जळण्याची क्षमता, धूर कमी होतो या सर्व कारणांमुळे हे लाकूड इंधनासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. 

बाभूळ वृक्षाची रोपे बियांपासून तयार केली जातात. शेताच्या कडेने कुंपणासाठी बाभळीची झाडे लावली जातात. या झाडाचा उपयोग जनावरांसाठी खाद्य पाला म्हणुन केला जातो. या वृक्षाची साल काळसर असते. त्यात १२ ते २० टक्के टॅनिन असते. कातडी उद्योगात या टॅनिनला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. टॅनिन निर्मिती, औषधी म्हणून याचा  वापर केला जातो. लाख किडे वाढविण्यासाठी याच्या डिंकाचा उपयोग होतो.  बाभुळ डिंक पौष्टिक असल्याने डिंकाचे लाडू केले जातात. 

बाभूळ हे आपणास साधारणपणे उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये पाहावयास मिळते, हा वृक्ष आपणास जास्तकरून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया मध्ये खूप प्रमाणात आढळतो.

बाभुळ ओसाड जागेवर वाढते. याची वाढ कोरड्या हवेत होते. कमी पाण्यात जास्त तापमानात तग धरून वाढत असल्यामुळे दुष्काळी प्रदेशात या झाडाची लागवड चांगली होऊ शकते. ही वनस्पती काटेरी झुडपा सारखीच असते हिच्यावर खूप लांब आणि तीक्ष्ण असे टोकदार काटे असतात, बाभळीची पाने गळाली तरी काट्यांमुळे सावली राहते. याचा काटा फारच टोकदार असतो. याच काटा रुतला तर बाभळीच्याच काट्याने तो काढता येतो. काट्याने काटा काढणे ही म्हण यावरूनच प्रचलित झाली.

 याला पिवळी गोल फुले येतात. काही भागात एप्रिल महिन्यात हे झाड पिवळ्या फुलांनी भरून जाते. साधारणपणे हिवाळ्यात या झाडांना शेंगा सुद्धा येतात आणि उन्हाळ्यात पूर्णपणे झाडावर लटकलेल्या दिसतात. तसेच या झाडांच्या डिंकाचे, शेंगाचे, सालीचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत पण त्याची माहिती आपल्यातील अनेक लोकांना नसते त्यामुळे आज आपण या झाडाचे असणारे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

बाभळीची साल:- 
आयुर्वेदानुसार बाभूळांची साल म्हणजे पुरूषांसाठी रामबाण औषध असल्याचे सिद्ध झाले आहे. यात तांबे, झिंक, फायबर, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे, जे पुरुषांच्या शरीरात रक्त परिसंचरण वेगवान करण्यासाठी कार्य करते.

त्याच्या वापरामुळे शरीराचे रक्त परिसंचरण संतुलित होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती योग्य मार्गाने कार्य करते. ज्यामुळे शरीरात सेक्स हार्मोन्सचे उत्पादन वेगाने होते. ज्यामुळे लैंगिक शक्तीमध्ये प्रचंड वाढ होते. यामुळे पुरुषांना निरोगी आणि उत्साही वाटते तसेच त्यांच्या शरीराची तग धरण्याची क्षमताही वाढते.

वापर पद्धती:- बाभळीच्या सालीचे चूर्ण बनवूनही तुम्ही हे सेवन करू शकता. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु लैंगिक सामर्थ्य वाढविण्यासाठी आपणास त्याचे सेवन करायचे असल्यास, 200 ग्रॅम बाभूळीची साल उन्हात कोरडी करा.

जेव्हा हे पूर्णपणे कोरडे होईल, तेव्हा त्यास बारीक करून घ्या आणि त्याची पूड बनवा व रोज एक चमचा मध घालून ही पावडर पाण्यासह सेवन करा. यामुळे लैंगिक उत्तेजनात प्रचंड वाढ होईल. तसेच, आपले अकाली स्खलन सुद्धा नाहीसे होईल.

सालीचे फायदे:- 
आपण नियमितपणे ते सेवन केल्यास लैंगिक सामर्थ्य वाढेल. त्याच वेळी, नपुंसक’त्व आणि शारीरिक दुर्बलता देखील मुक्त होईल. यामुळे शरीराची तग धरण्याची क्षमताही वाढेल. बाभळीच्या सालात जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पाचन क्रिया मजबूत होते. यामुळे पोटात बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या उद्भवणार नाही.

अस्तिभंगावर:- 
आपलीं हाडे अनेक प्रकारे मोडली जातात. त्याचप्रमाणे हाडांचे दोन तुकडे होतात, कधी कधी तर हाडास चिर सुद्धा पडलेली असते, किंवा हाडमध्ये बाक आलेला असतो. सांदा निखळने म्हणजे हाड मोडून तो बाहेर आलेला असतो, तसेच हाडांचा चुरा झालेला असतो, चीर पडलेली असते, किंवा हाडांचे दोन तुकडे झाले असता, बाभळीच्या बियांचा खूप उपयोग होतो.

बाभळीच्या बियांचे वस्त्रगाळ चूर्ण मध व तूप याबरोबर खावे. अथवा बाभळीचा वाळलेला कच्चा डिंक आणून त्याची चांगली बारीक पूड करावी. त्या पुडीचे समभाग करुन उत्तम साजूक तूप घालून त्यात तो डिंक भिजून द्यायचा व त्यामध्ये चवीपुरती साखर घालावी. आणि ते मिश्रण रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या क्षमते प्रमाणे घेत जावे.

त्यामुळे मोडलेले हाड जोडले जाते व ती हाडे पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. ज्या व्यक्तींचा सांधा निखळलेला आहे अश्या माणसांना हा कच्चा डिंक जरूर द्यावा. त्याच्यामुळे हाडे व्रजासारखी कठीण होतात.

मल विकार:- 
नियमित टॉयलेट साफ होत नसेल, त्यामुळे अस्वस्थता वाढते, पोटात बारीक बारीक दुखते, मनास अस्वस्थता निर्माण झाली आहे की काय अशी शंका येते, भूक लागली असेल तरी खायची इच्छा होत नाही, अन्नावर वासना होत नाही, तर अश्यावेळी बाभळीच्या शेंगा मिळाल्यास त्या  चांगल्या, किंवा सुकलेल्या सुद्धा चालतील, पावशेर शेंगा घेऊन त्यामध्यें पावशेर पाणी घालावे व त्याचा एक अष्टमाश काढा करावा व त्यात थोडे जायफळ पूड व ज्येष्ठ मधाचे चूर्ण घालून तो काढा नियमित घेत जावा. त्यामुळे  तुमचे मल विकार नाहीसे होतात.

शक्ति येण्यासाठी:- 
अनेक लोकांच्या अंगातील शक्ती आपोआप कमी झालेले असते, त्यांच्या कमरेत दुखू लागते, काम करत असताना काम करण्याची इच्छा निघून गेलेली असते, बाहेरून चालून येतो तेव्हा पायाचे गोळे खूप दुखू लागतात.
अश्यावेळी बाभळीच्या शेंगा घ्या आणि त्या फडक्यात घालून त्यांचा रस काढून घ्या, व अडमासे १ते २ चमचे रस काढून १ कपभर दुधात घ्यावा, त्यामध्ये थोडी सेंद्रिय साखर टाकून ते मिश्रण रोज दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे त्यामुळे आराम पडतो. व शक्ती वाढून वीर्य दोष आपोआप कमी होतो.

गुडघे बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी... 

गुडघे कधीही बदलू नका.साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे... त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते... जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात... पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय..? अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी कर्ज काढून तयार होतात... परीणाम... अपयश..! निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून... पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते... बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर... यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे. जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खर्च करू शकत नाहीत त्यांच्यासाठी... शहरात नाही पण खेडोपाडी, न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली बाभूळ या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे... अमेरिकेत हे झाड नाही... नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता... असो, *या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या... २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब... औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत..आहे की नाही गंमत..? आपणास पोस्ट आवडल्यास पुढे पाठवा, खरे पुण्य पदरी पाडून घ्या.. ! 
डाॅ.पवन कुमार
(नॅचरोपॅथी)

हाडमोडीवर औषध

हाड मोडल्यावर (फ्रॅक्चर झाल्यावर) लवकर बरे होण्यासाठी काय खावे? चिकन आणि अंडी यावर प्रभावी आहेत का?

हात मोडल्यावर किंवा कुठल्याही प्रकारचे फ्रॅक्चर झाले असता लवकर बरे होण्याचा एक देशी पण अत्यंत प्रभावी औषध मी सांगणार आहे.

पालघर जिल्यातील वाडा तालुक्यात सूर्यमाळ नावाचे एक गाव आहे. तिथले अदिवासी बांधव एक जंगली वनस्पतीच्या मुळ्या गोळा करतात. हाड मोडल्यावर त्या मुळ्या पाण्यात भिजवून घेतल्यास 7 ते 8 दिवसात हाड जुळून येते. मी स्वतः या औषधाचा उपयोग माझ्या आईसाठी दोन वेळेस केला आहे. गेल्या वेळेला आईच्या हाताचे हाड पंज्या जवळ 4 ते 5 तुकड्यात मोडले होते. डॉक्टरांनी प्लास्टर केले आणि आठ दिवसांत ऑपरेशन करून सळ्या टाकाव्या लागतील असे सांगितले होते. त्यावेळी मी हे औषध आणून दिल्यानंतर आठ दिवस एकदिवस आड करून 3 वेळा तिला दिले. ऑपरेशन साठी आठ दिवसांनी गेलो असता पुन्हा एक्स रे काढला तेव्हा हाड सगळीकडे जुळून आलेले दिसले. डॉक्टर पण गमती मध्ये म्हणाले की तुम्ही माझे नुकसान केले. त्यांनी देखील मान्य केले की 65 वर्षाच्या वयात आठ दिवसात हाड आश्चर्यकारक रित्या जुळून आले.

औषध वापरण्याची पध्दत: 
औषधाच्या मुळ्या डोस प्रमाणे झाडाच्या पानाच्या पुडीमध्ये बांधून मिळतात. एका पुडीतील औषध रात्री तांब्याच्या भांड्यात ग्लास भर पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे. नंतर तासभर काही खाऊ नये. शक्यतो मांसाहार टाळावा. एक दिवस सोडून औषध घ्यावे.

औषध मिळण्याचे ठिकाण:

सूर्यमाळ येथे गेल्यास कुठेही चौकशी केली असता लोक आणून देतात. अगदी 20 रुपये ते 50 रुपये पुडीमागे खर्च येतो. मी दोन वेळेस स्वतः जाऊन आणले आहे.

पण आता वाडा तालुक्यातील एक केमिस्ट श्री चाफेकर यांनी समाजसेवा तत्वावर फक्त कुरियर चार्जेस आणि औषधाचे आदिवासी बांधवाना द्यावा लागणारा अल्प मोबदला आकारून औषध घरपोच पोहोचवण्याची सोय केली आहे. माझ्या जवळच्या मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यासाठी मी अनेक वेळा हे औषध चाफेकर यांच्याकडून मागवले आहे. चार पुड्या मी नेहमी डीप फ्रीझ मध्ये ठेवत असतो.

१) श्री.चाफेकर मु.पो.ता.वाडा, जि.पालघर, - 421303. संपर्क 09225189371, 09225189373

२) श्री.किरण, भिवंडी M.: 8087348067 ३) श्री.हरेश्वर, वसई (निर्मळ) M.: 9860700504

खूप खात्रीलायक उपाय मला अनुभवाला आला आहे. तसेच काही साईड इफेक्ट आढळले नाहीत. तरीही गरजू व्यक्तिंनी स्वतःच्या जबाबदारी वर औषध घ्यावे. सोबत नेहमीचे डॉक्टरी औषध , प्लास्टर सुरू ठेवावे.

आपले अभिप्राय वाचायला नक्की आवडेल. काळजी घ्या.

सर्व वाचकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीतजास्त शेयर करावा जेणेकरून गरजू व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!