जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

भारतरत्न लताबाईच्या मंगेशकर हॉस्पिटलवर १०० कोटी रुपयांचा दंड...!


भारताच्या रत्नाकडून गोरगरीबांची लुबाडणुक आणि सरकारची फसवणूक...!

मा. लता मंगेशकर यांनी त्यांचे वडील स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ २००० साली पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल स्थापन केले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारची सहानुभूती मिळवून महाराष्ट्रातसह पुण्यातील व परिसरातील आरोग्याच्या समस्या असणाऱ्या सामान्य लोकांची (सेवा) उपचार करणार आहे असे भासवून हॉस्पिटलसाठी करोडोची जमीन (पुणे शहराच्या मध्यभागी) तब्बल २४,००० स्के. मिटर (एकूण ६ एकर जमीन) ९९ वर्षांच्या कराराने केवळ ९९ रूपयामध्ये (रु. १/- प्रतीवर्ष) भाड्याने सरकारकडून घेतली (म्हणजे ९९ रूपयात ९९ वर्ष). 

ठरल्यानुसार मोफत व सवलतीत उपचार न दिल्यामुळे  जिल्हाधिकारी पुणे यांनी लता मंगेशकर यांच्या या हाॕस्पिटलला सरकारच्या नियमाचा भंग करून सरकारचा निधी चुकवला म्हणून दोन वर्षांपूर्वी १०० कोटी रुपयांचा दंड केलेला आहे. मात्र हॉस्पिटलने आजपर्यंत एकही रुपया भरलेला आहे की नाही. (पुरावा - पुण्यातील सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.)

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सामान्य गोरगरीब नागरिकांना सवलतीच्या दरात 'खाट व उपचार' उपलब्ध नाही असे सांगून टाळाटाळ केली जाते. महाराष्ट्र सरकारचे दीनानाथ मंगेशकर व इतर सर्व धर्मदाय मोठ्या हॉस्पिटलांना स्पष्ट आदेश आहेत की, गोरगरीब नागरिकांना (ज्यांची परिस्थिती नाजूक आहे अशा लोकांना) या ठिकाणी नाममात्र अर्थात मोफत स्वरुपात उपचार दिले गेले पाहिजे. त्यासाठी काही खाटा आरक्षित केलेल्या असतात. मात्र लोकांना सरकारच्या नियमानुसार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार मिळत नाहीत. याउलट लोकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा दीनानाथ हॉस्पिटल घालत असते. आजपर्यंत हजारो लोकांनी (अनुभव) तक्रारी करून सुद्धा त्या लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळले गेले, त्यांच्या शंकाचे निरसन आजपर्यंत संबंधित हॉस्पिटलचे ट्रस्टी करू शकले नाहीत. 'उलट या ठिकाणी भोंदूगिरी चालते.' दरवर्षी लाखो रुपयांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व त्याचे ट्रस्टी सरकारला चुना लावण्याचे काम करतात. मग शेतकऱ्यांच्या विरोधात का...!

मंगेशकर हॉस्पिटल वर १०० कोटी रुपयांचा दंड...

मंगेशकर कुटुंब व ट्रस्टी मिळून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चालवतात. सध्या त्यांनी कुठल्या तरी वैद्यकीय संस्थेला ते भाड्याने दिलेले आहे असे कळते. मात्र त्यावर संपूर्ण कंट्रोल हा मंगेशकर कुटुंबाचा आहे. याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ने महाराष्ट्र सरकारची वेळोवेळी फसवणूक केलेली आहे. एक रुपयाच्या भाडेतत्त्वावर असणाऱ्या जागेवर लोकांची (गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल) अपचार (सेवा) करण्यासाठी आरक्षित असणाऱ्या काही 'खाटा' ठेऊन हॉस्पिटल चालवण्याचे सरकारच्या नियमाप्रमाणे परवानगी घेतलेली आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्राचा धंदा समजून दीनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल  दिवसाढवळ्या अडचणीत असलेल्या नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा एकमेव राष्ट्रीय कार्यक्रम करते. म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दोन वर्षापूर्वी १०० कोटी रुपयांचा दंड दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर केलेला आहे. मात्र 'भारतरत्न' मिळालेल्या मा. लता मंगेशकर यांनी आपली पदाचा गैरवापर करून (राजकीय पाॕवर वापरून) दोन वर्षात १०० कोटी रुपया मधील एक रुपया आणि आज पर्यंत भरलेला नाही. कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रचंड छळतात अचानक कामावरून काढून टाकतात  म्हणून संभाजी ब्रिगेड ने सुद्धा वेळोवेळी हॉस्पिटल समोर आंदोलने केली आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना विनंती व आवाहन आहे की, ज्या हॉस्पिटल वर राज्यसरकार अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर कोटीचा दंड आकारला असेल तर दोन वर्षात त्यांनी किती रुपयांचा दंड भरला किंवा भरला का नाही...? हे महाराष्ट्रासमोर जाहीर केले पाहिजे.

जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार चालतो, लोकांची फसवणूक केली जाते, लाखो रुपयांना सरकारला गंडा घातला जात असेल तर भारतरत्न पुरस्काराच्या काढून लता मंगेशकर महाराष्ट्राची फसवणूक का करतात...? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. कारण जर त्यांना शेतकरी आंदोलनाचा त्रास होत असेल तर महाराष्ट्राची फसवणूक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल करत असेल तर आम्हाला सुद्धा लता मंगेशकर कुटुंबाचा त्रास होतो हे त्यांनी लक्षात घ्यावे व 100 कोटींचा दोन वर्षात दंड भरला का...? हे महाराष्ट्रा समोर जाहीर करावे.

मोठ्या व्यक्ती म्हणून मा. लता मंगेशकर यांनी भारतरत्न पुरस्काराच्या आडून जर शेतकरी आंदोलन वर टीका करत असतील तर त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वरच्या 100 कोटी दंडाचे उत्तर दिलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि यापुढे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेला मोफत सेवा मिळाल्या पाहिजे खाटा उपलब्ध झाल्या पाहिजेत अशी संभाजी ब्रिगेडची महाराष्ट्राच्या वतीने विनंती वजा मागणी आहे.

उत्कृष्ट गायिका म्हणून मा. लता मंगेशकर यांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र मा. राणू मंडल चांगल्या गायल्या म्हणून त्यांना राग येत असेल, त्या चिडत असतील, घराच्या जवळ उड्डाणपूल होत होता म्हणून त्यांना भारतात राहू वाटत नसेल, तर 'शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या व शेतकऱ्यांचं पिकवलेलं अन्नधान्य खाणाऱ्या लता मंगेशकर यांच्या विरोधात आम्हाला राग का येऊ नये? कारण आमच्यासाठी शेतकरी हा सर्वोच्च आहे. 

शेतकरी जगला पाहिजे, त्यांचा सन्मान झालाच पाहीजे. शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही.

#INDIATOGETHER

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!