राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद या काळ्या निर्णया विरोधात आणि मंदिरे तातडीने उघडण्यात यावीत या मागणीसाठी दि.१३ आँक्टोबर २०२० रोजी राज्यव्यापी "लाक्षणिक उपोषण" घोषित केले आहे. कोल्हापूर जिल्हात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी "लाक्षणिक उपोषण" करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपा पन्हाळा तालुका यांच्या वतीने श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सचिन शिपुगडे पन्हाळा तालूका भाजपा अध्यक्ष व अरूण माने (महाराज) अध्यात्मिक आघाडी समन्यवक पन्हाळा तालुका यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
सदर आंदोलनात सुरेश बेनाडे, अविनाश चरणकर, मंदार परीतकर, प्रकाश देशमुख, आनंदा आंगठेकर, संजय सावंत, संदिप गवळी,संदिप कुंभार,गजानन जोशी, रवीराज गाताडे, दिग्विजय पाटील, श्रीरंग गुरव प्रशांत गराडे,राकेश मोरबाळे, हरिदास उपाध्ये, संतोष ठाकरे, महेश जाधव, प्रकाश पाटील, दत्तात्रय बोबडे, सागर जाधव,महेश वरंवटे, अशोक जाधव, सचिन चिले, संकेत गुरवव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपोषणाला जोतिबा डोंगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आनंदा लादे व जोतिबा ग्रामपंचायत सदस्य. सुनिल नवाळेनी जाहीर पाठिंबा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!