कोन आहेत हे एम पी
अण्णा ?
ज्यांनी डॅडींच्यासाठी कागल तालूक्यातून विधानसभा लढवली...
एम पी अन्ना अर्थात
श्री मनोहर पुरुषोत्तम पाटील मौजे ग्राम कुरणी येथे वास्तव्यास असलेले निवृत्त
आर्मी जवान.
अन्नाचा जन्म कुरणी येथे २४ एप्रिल १९६२ चा. दहावीची परिक्षा पास
झाल्यावर धाडसी स्वभावाच्या उपजत गुणांमूळे अन्नानी सैन्यात भरती होण्याचा निश्चय
केला. १९८९ ला अन्ना भारतीय सैन्य दलात भरती झाले. १९९५ ला अन्ना भारतीय सैन्य
दलातून निवृत्त झाले.
मन मोकळा स्वभाव आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुस
असलेल्या अण्णाची गाठभेट डॉन अरुणभाई गवळी उर्फ डॅडी यांचे सोबत दगडीचाळ येथे
झाली.
मिडियातील डॅडींची रक्तरंजित
प्रतिमा आणि प्रत्यक्ष डॅडींची रॉबिनहुडची प्रतिमा, तो ऐट
बघून अन्ना प्रभावीत झाले. ते डॅडींचे चाहते बनले. डॅडीनी त्यांच्या विषयी अधिक
विचारपूस केली असता. अन्नानाही समाजसेवेचे वेड आहे हे त्यांनी ताडले. डॅडीनी
त्यांना आपल्या अखिल भारतीय सेना पक्षाकडुन विधानसभा निवडणुक लढविन्यासाठी
प्रोत्साहन दिले. अन्नानी अखिल भारतीय सेनेकडुन १९९९ ची निवडनूक कागल तालुका मतदार
संघातून लढवली. त्यांना किती मते पड्ली हे महत्त्वाचे नाही. पण तत्कालीन
प्रस्थांपितांच्या विरोधात उभे राहुन निवडणूक लढविण्याचे धारीष्ट अन्नानी त्यावेळी
दाख़विले हे महत्त्वाचे. अन्ना हरले म्हणून थांबले नाहीत. त्यानी डॅडींचा आदेश
सरआँखोमें म्हणून मुरगूड परिसरातील अनेक समाजकार्यात सक्रीय सहभाग घेतला. अनेक
तंटेबख़ेडे सोडविले. २००१ मध्ये गुजरात राज्यात भुकुंप झाला होता. ह्या भुकुंपात
अनेक कूटूंबे जमिनदोस्त झाली. प्रेतांचा खच पडला होता. कोसळलेल्या दगड-मातीत
छीन्न-विछ्चीन झालेले भयावह मृतदेहांच्या सोडवणुकीसाठी सूटा-बुटातील नोकरवर्ग
धजेनासा झाला होता. ही जबाबदारी उचलली डॅडीनी. डॅडीनी अखिल भारतीय सेनेच्या आपल्या
पदाधिका-यांना आदेश दिला. तत्कालीन अभासे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजू जाधव
यांनी तो प्रत्येक तालुका अध्यक्षांना दिला. रक्तबंबाळ झालेले, काही कुजलेले मृतदेहांचे अंतिम संस्कार करणे ही म्हणावे तितकेसे सोपे काम
नव्हते. जिकरीचे, धाडसाचे आणि कमालीचे सहनशिलतेचे होते. अशा
या भयावह स्थितीत अन्नांच्यातील भारतीय सैनिक देशप्रेमाने जागा झाला. तो तळपू
लागला. जिल्हा अध्यक्ष राजू जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला गेला. अन्नांनी
कागल तालुक्यातील कुरणी गावातील आपले समर्थक, मित्रमंडळीचा
एक-एक ग्रुप करुन डॅडींच्या आदेशाबरहुकुम गुजरात राज्याची वाट धरली. त्यांनी कुरणी
ग्रामस्थांकरवी गुजरात राज्यातील भुकुँप पिडित भागातील ते मृतदेह दगड-मातीच्या
ढिगा-यांतून बाहेर काढुन ज्याच्या त्याच्या धर्मानूसार त्याच्यावर अंतिमसंस्कार
केले. वास्तवीक कुरणी गावाच्या ग्रामस्थांचे या कार्याबद्द्ल विशेष आदर सत्कार
राज्यपातळीवर होणे गरजेचे होते. कागल तालुक्यातील राजकिय आसुया ही जगजाहिर आहे. त्यामुळे कदाचीत कुरणी गावाच्या
ग्रामस्थांचे व अन्नांचे यथोचित आदर सत्कार झाले नाहीत. पण तरीही अन्नाचे वन मॅन
आर्मी म्ह्णून समाजकार्य सुरुच राहिले. निवृत्त झाले नंतर त्यांनी आपले पदवी
शिक्षण पुर्ण करून महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ची परिक्षाही दिली. त्यांचे अनेक
पोलिस अधिकारी मित्र होते. समाजातील उच्च वर्गातील लोकांच्यात उठ-बस होती. ह्या
मुळेच त्यांनी अनेकांची कामे मार्गी लावली.
अन्नांचे वडील
लहाणपणीच वारले असल्याने त्यांची स्वत:च्या आई सोबत नाळ घट्ट जोड्ली होती. २०१४
साली त्यांचे आईंचे वयोमाना परत्वे देहावसन झाले. अनेक संकटात ताठ मानेने उभे
ठाकणारे आणि निधड्या छतीने संकटांना सामोरे जाणारे अन्ना आईच्या जाण्याने गळून पडले. आईच्या निधनानंतर सहाच महिन्यांनी
अण्णांना लकवा मारला.
आज अण्णांची
तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. अण्णा आपल्या जडजिभेने जेंव्हा त्यांचा अनुभव
कथन करतात, तेंव्हा सिमेवरील सैनिक आणि सांसरीक-सामाजीक समरांगण याचे
दर्शन होते. अखिल भारतीय सेनेच्या नव्या पीढीतील कार्यकर्त्याना, कुरणी गावातील नव्या पिढीला आणि कागल तालुक्यातील आसुयेने ओतप्रोत
भरलेल्या राजकिय इतिहासाला नक्किच मार्गदर्शक ठरेल. याच बरोबर डॅडी आपल्या
जूण्याजाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आजही विचारपूस करतात, हे ही यातून स्पष्ट झाले. कदाचीत येना-या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत
अखिल भारतीय सेनेचा उमेदवार कागल तालुका मतदारसंघातून निवडून येण्याची ही नांदी
असु शकेल.
प्रस्थापितांच्या
विरोधात दंड थोपटून नव नेतृत्व सक्षम करण्यासाठी श्री. मनोहर पुरूषोत्तम पाटील
उर्फ एम.पी अण्णा हे कागल तालुक्यातील राजकीय इतिहासातील सार्थ अर्थाने “वन मॅन
शो” आहेत. त्यांच्या कार्याची कागल तालुका राजकिय विश्व दख़ल घेवो अगर नाही, पण जनमानसांच्या
मनात व अखिल भारतीय सेना पक्षाच्या रेकॉर्ड मध्ये अण्णा आपली विशेष जागा निश्चित
आहे.
शब्दांकन : पत्रकार
अमरसिंह राजे, बस्तवडे
ABS News TV
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!