जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

जॅकी चॅन आणि शाहरुख खान... कहा गंगू तेली कहा राजा भोज..!


१८ ऑगस्ट २०१४ रोजी चॅनला म्हणजेच ऍक्शन चित्रपटाचा बादशहा दस्तुरखुद्द जॅकी चॅन च्या मुलाला १४ ऑगस्ट रोजी बीजिंग पोलिसांनी ड्रग्स बाळगल्यामुळे अटक केली होती. सोबत तैवानी अभिनेता काई को सुद्धा होता. चॅनच्या अपार्टमेंटची झडती घेतल्यानंतर पोलिसांना  3 औंसहून अधिक अम्लीपदार्थ सापडले होते. थोड्याच वेळात, जॅकी चॅनने आपल्या मुलाच्या ड्रगच्या वापराबद्दल जाहीर माफी मागितली होती. तेव्हा जॅकी चॅन म्हणाला होता की, "माझ्या मुलाच्या कृत्याची मला लाज वाटते. एक बाप म्हणून हे माझे अपयश आहे आणि मी त्याच्या संरक्षणासाठी  ह्यात कुठलाही  हस्तक्षेप करणार नाही. कारण आज तो वाचेल पण त्याच्या सवयी बदलण्यात मला परत अपयश आले तर, तो अजून कुणाला ह्याच्या नादी लावायची शक्यता आहे."
जॅकी चॅनच्या मुलाला ड्रग्सच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला होता. नंतर त्याच्या मुलानेही याबद्दल जाहीर माफी मागितली. त्यात तो म्हणाला होता की, "आपण केलेले कृत्य चुकीचे असून,केलेल्या कृत्याला कुठल्याही प्रकारची सहानुभूती अथवा माफी नाही; म्हणून मी शिक्षा भोगून आलोय. ह्यापुढे असं कृत्य कधीही माझ्या हातून घडणार नाही."

जॅकी चॅन आणि त्याच्या मुलाच्या ह्या कृत्याने जगापूढे एक 'समाजाप्रती असणाऱ्या जाणीवेचं" उदाहरण स्थापित केलं. जॅकी चॅनच्या मुलाचं ड्रग्स घेणं, जवळ ठेवणं आणि वाटप करणं समर्थनीय नाहीच ... परंतु त्यानंतर त्याच्या वडिलांचं आणि त्याचे  स्वतःचे ह्याला प्रतिसाद देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण 'तुम्ही कितीही मोठ्या बापाचे सुपूत्र असले तरी कायद्यापुढे सगळे समान असतात 'ही भावना त्यांच्या कृत्यातून प्रदर्शित होते. आणि म्हणूनच , कदाचित त्यांच्या ह्या कृत्यामुळे का होईना अनेक तरुणांचं चुकीच्या मार्गावर जाणं थांबल असावं अशी वेडी अशा बाळगायला हरकत नाही. कारण आपण फक्त अाशेवर जगणारी माणसं.. 

पण हे छान छान , आदर्श बिदर्श झालं विदेशात...

आपल्याकडे काय ??? 

आपल्याकडे परवा एका राजसुमाराला ड्रग्स घेतल्या,बाळगल्या म्हणून पोलिसांनी पकडलं आहे..
पण इकडे त्याच्या बद्दल सहानुभूतीची लाट आलीये लाट. देशात हजारो वाईट घटना घडल्या पण तोंडातून एक शब्द न काढणारे आज - "बच्चा है ।", अजून काय तर त्याला मुद्दाम पडकलं...
काही येडे पंखे तर त्याच्या घराबाहेर "we are with you king khan in this tough time" अस लिहीलेले पोस्टर्स घेऊन उभे आहेत.
'ड्रग्स बाळगणे , सेवन करणे' असे काय काय आरोप असलेल्या आरोपीचं पकडलं जाणं 'टफ टाईम' असू शकतो ?
जर असेल टफ टाईम तर नक्कीच ह्या पोस्टर वाल्यांची पण एकदा चौकशी व्हायला हवी. कारण कदाचित हेच त्याला ड्रग्स पुरवत असावे. (नाही !! आपला एक संशय म्हणून म्हंटल) 
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जण म्हणाला, "आर्यन कशाला ड्रग्स विकेल ??? त्याच्याकडे इतका पैसा आहे की, तो ते क्रूझ विकत घेऊ शकतो." 
(अहो, त्या जॅकी चॅन कडे इतका पैसा आहे की, तो ते मन्नत का काय त्याच्यासहित आर्यनच्या बापाला ४ वेळा विकत घेऊन ८ वेळा विकू शकतो, ते पण "लॉस" मधे...
पण कदाचित आपल्या उपस्थितमुळे कोर्ट आणि पोलिसांच्या कामावर परिणाम होईल म्हणून जॅकी चॅन आपल्या मुलाच्या केसच्या वेळी कोर्टात उपस्थित सुद्धा राहिला नव्हता. कारण होतं मुलाच्या हातून घडलेला असमर्थनीय गुन्हा. )  

तळटीप
कोर्टात केस अजून सुरू आहे, तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणत आहात हे चुकीचे आहे... असे म्हणणारे शाहरुखचे पंखे खूप आहेत. त्यांच्यासाठी - मी कुठेही गुन्हेगार असा उल्लेख केला नाही. आणि आर्यन खान वरील गुन्हा अजून सिद्ध झाला नसला तरी, त्याने ड्रग्स सेवन केल्याचं मान्य केलं आहे आणि त्याने केलेल्या कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. आणि ह्याबद्दल त्याच्या पिताश्रींची (समाजात काही लोकं त्यांना रोल मॉडेल मानतात ) सामाजिक संदेश देणारी जॅकी चॅन सारखी कुठली प्रतिक्रिया सुद्धा आली नाही म्हणून हा लेखन प्रपंच...

- © अनुप देशपांडे 
(आजीव सभासद,विश्व मराठी परिषद, पुणे)
दिलीप मुसळे

सामाजिक जाणीव...
(कॉपी पेस्ट पोस्ट)
#छंदमाझा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!