जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

श्रीराम पचिंद्रे लिखित "शाहू" ... नव्या पिढीने हमखास वाचली पाहिजे !

श्रीराम पचिंद्रे लिखित "शाहू" 


आपल्या जवळ असलेल्या परिसाची आपल्या महत्ता आपल्याला कमी असते. तसेच काहीसं माझ्या बाबतीत झाल. त्यांची आणि माझी मैत्री साधरणत: एक तपाची. दै पुढारीच्या मुख्य कार्यालयात त्यांच्याशी माझी ओळख झाली ती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने... “गझलकार श्रीराम पचिंद्रे आणि भाऊसाहेब पाटणकर यांच्या नंतरचा उभरता मराठी शायर म्हणून राजे !” अशी ही ओळख शामदाने (श्री शाम पचिंद्रे गझलकार श्रीराम पचिंद्रे यांचे बंधू) करून दिली होती. त्यानंतर आम्ही दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहोतच. पण संसारीक जबाबदार्या- जिवनातील चढ उतारामूळे शामदापासून मी मात्र दुरावलो. 



तर झाल असं... एका महान व्यक्तीची बायोग्राफि फिल्म निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून त्या महान व्यक्तीच्या जीवनाशी संबधीत सर्व त्या संदर्भीय ग्रंथाचे संकलन-वाचन करण्यासाठी, मी या दिवसांत आपला ग्रंथालये पालथा घालत फिरत आहे. असेच करता-करता माझ्याच गावातील श्री हनूमान वाचनालयात गेलो होतो. पुस्तकांची सर्व कपाटे उघडायला लावून मी आमच्या लायब्रेरीयनला तब्बल तीन-साडेतीन तास छळत होतो. पण मला हवं असलेलं पूस्तक काय मिळत नव्हते. त्यात मला शोधायला मदत कर म्हणून मी त्याला ही बळजबरी करत होतो. सर्व कपाटे चाळून झाली तरी मला हवं असलेले पुस्तक काही मला मिळाले नाही. सरतेशेवटी एका कपाटात मला श्रीराम पचिंद्रे लिखीत “शाहू” ही कादंबरी निर्दशनास आली आणि मी स्तब्ध झालो. मला श्रीरामदादा भेटत होते संपादक-गझलकार म्हणून, पण कादंबरी लेख़क म्हणून आज मला ते पहिल्यांदाच भेटले. त्यांच्या गझलेचा मी चाहता आहेच. पण खाश्या मित्राची लेख़न शैलीचा आस्वाद घेण्याची माझी मनिषा जागी झाली. तसेही राजर्षी शाहू महाराज हे माझे दैवत आणि सामाजिक कौटूंबिक जीवनातील आदर्श व्यक्तीमत्त्व हा तर दुग्धशर्कारा योग. त्यामुळे मी प्रदिप गुरवला (आमचा लायब्रेरीयन) ह्या कादंबरीची माझ्या नावाने रजिस्टरला नोंद करायला सांगितले. आज्ञेबरहुकुम प्रदीपने नोंद केली आणि एकदाची मला कादंबरी देऊन, त्याने सुटकेचा सुस्कारा टाकला. 

वाचन हे माझं व्यसनच ! त्यात हा दुग्धशर्कारा योग त्यामुळे घरी आल्या-आल्या तब्बल २२८ पानांची ही कादंबरी अधाश्यासारखी अवघ्या दोनच दिवसांत वाचुन पूर्ण केली. आणि भारतीय इतिहासातील ४ राजकिय नेत्यांच्या परस्पर सहजसंबधा बाबत मी ठाम झालो. बाळ गंगाधर टिळक, कागलकर गोपाळकृष्ण गोख़ले, बॅलिसटर मोहनदास करमचंद गांधी आणि दस्तूरखुद्द छत्रपती राजर्षी शाहू महाराज ! 

भारतीय इतिहासात सांस्कृतीक दहशतवाद्यांनी घातलेल्या गोंधळामूळे महान व्यक्तींच्या पराक्रम, शल्य, कार्य, आर्थिक व्यवस्थापन, ते करताना त्यांना आलेल्या अ‍डचणीं बाबत नव्या पिढीला त्याचे मार्गदर्शनपर बिजारोपन झालेच नाही. राजकारणाला आज गलिच्छ भोंगळ कारभाराचे द्योतक समजण्यात येत आहे. जे की धांदात नादार खोटे आहे. 

पत्रकार श्रीराम दादांच्या ठायी असलेल्या अंगच्याच निर्भीडवृत्ती मुळे त्यांनी, जगात दुसरी सामाजिक क्रांती करणारा नायक कादंबरीतून सुस्पष्टपणे सांगितला आहे तो इतरांच्या सारख़ा रंगवला नाही. साहित्यीक क्षेत्रात-कलेत कादंबरी रंगवून-रंगवून लिहिण्याचा प्रघात आहे. त्यासाठी चमत्कार-बिमत्कार नसलेले प्रसंग खुलवून वाचकांच्या कलेने सामाजिक वर्चस्वाचे भान ठेवून लिहिली जाते. पण श्रीराम दादांनी भाटगीरी करण्याचे टाळले आहे. तसा तो त्यांचा पिंडच नाही. जे आहे ते सत्य अविचल... या इथे पर्वा कुणाची... फिकीर कुणाला ! ही वृती लेख़काची आढळून येते. म्हणूनच मी म्हणालो कि,  “श्रीराम दादांनी राजर्षी शाहु महाराज आपल्या कादंबरीतून सांगितला आहे.” वर्ण वर्चस्वाच्या पक्षाला त्यांनी झुगारले आहे. 

ब्राम्ह्ण म्हणुनिया कोण मुलाहिजा करतो... असो वा अम्ही मरहट्टे यवनांना देऊ रठेठे !

असा कोणताही स्व: भावनांना त्यात न गुंतवता. जसाच्या तसा प्रसंग शब्दांकित केला आहे. शाहु महाराजांनी केलेले सामाजिक क्रांतीकारक प्रयोग ज्याला आपण Revolutionary Social Engineering Concept  संबोधतो. ते त्यांनी छोट्या-छोट्या  प्रसंगातून सुस्पष्ट केले आहेत. जगात शाहु महाराजांसारखी माणसे क्वचितच जन्मतात. जी आपल्यासारखीच हाडांमांसाची असतात पण मानवजातीसाठी असे अगाध कार्य करतात की ३३.००१ (नमो नावाचा एक स्वयंघोषित देवाची वाढ झाली आहे सध्या म्हणून .००१) कोटी देव सुध्दा त्यांच्या समोर नतमस्तक होतो. कोणतीही कादंबरी हा ऐतिहासीक पूरावा होवू शकत नाही. कादंबरी ही फक्त वाचकांची वाचन तृष्णा भागविण्यासाठीच असते. पण बाबा भांड लिखीत “युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड” आणि श्रीराम पचिंद्रे लिखीत “शाहु” ह्या दोनच कादंब-या जगात अशा आहेत कि यांना ऐतिहासीक द्स्ताऐवज म्हणून मान्यता लाभू शकते. वाचायचच झाले तर ह्या दोन्ही कादंब-या लागोपाठ वाचल्या तर भारतीय तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकिय-सामाजिक परीस्थीतीचे अवलोकन होइल. इदं ब्रम्हं ! हिंदुस्थान कळेल. 

आज भारत देश विनाशाच्या वाटेवर वाटचाल करत आहे. भारतीय राजकारण अमानवीय व्यवहारांत गुंतले आहे. अंह आणि स्वार्थाने देशातील कोट्यावधी सर्वसामान्य जनता त्राही मांम करत आहे. अशा वेळी देशातील मुख्य राजकिय, प्रशासकिय नेत्यांनी अधिकार्यांनी “शाहु” या कांदबरीचे वाचन करावे म्हणजे लोकविकास कळून येईल. लोकविकासांत शत्रू विरोधक असतातच... तिजोरीत ख़डख़डाट असतोच... रिपोर्टींग पर्सन हा असतोच... अशातूनही लोकविकास साधता येतोच हेच हया कादंबरीतून शिकायला मिळते. कोण म्हणतं शाहु महाराजांना शत्रू नव्हतता. बाळ टिळकांच्या सारख़ा गबरू शत्रू कुणाला मिळाला आहे का ? शाहु महाराजांनी नेह्मीच त्यांचे वार हसतमुखपणे झेलले. टिळकांना ते नेहमीच मित्र मानायचे... टिळक शाहू महाराजांना मित्र मानायचे का ? तर ते नाही. हे मानगांवच्या परिषदेसंदर्भातील त्यांच्या मतावरून स्पष्ट होते. शितावरून भाताची परिक्षा केली तर हे समजून येईल. शाहु महाराजांना प्रत्येक बाबतीत इंग्रजांना रिपोर्टीग करावे लागत होते. अगदी स्वत:च्या मुलाच्या लग्नाची बोलणी करतानाही रजामंदी घ्यावी लागत होती.  

बॅलिसटर मो.क. गांधी हे बॅलिसटर होते. पण महात्मा नव्हते. महात्मा एकच सातारा कटगूण या गावी जन्मलेले महात्मा जोतिबा फुले. त्यांना महात्मा ही उपाधी स्व-अधिकारात तत्कालीन हिंदुस्थान सरकारच्या साक्षीने महाराजा सयाजीराव गायकवाड, बडोदा नरेश यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला स्मरून दिली होती. त्यानंतर तत्कालीन हिंदुस्थानच्या आणि सध्याच्या भारतीय इतिहासात बॅलिस्टर मो. क. गांधी यांना महात्मा ही उपाधी दिली आहे याचा पुरावा आज पावेतो उपलब्ध नाही. याचा अर्थ असे नव्हे कि त्यांना महात्मा म्हणून संबोधु नये. त्यांचे देश कार्य आहेच मुळी. आदराने म्हणा महात्मा गांधी... पण “महात्मा” या मुळ उपाधीचा स्विकार्ता आणि दाता आहे.... त्यांना झाकोळण्यासाठी गांधीना महात्मा संबोधु नका. जगाच्या मान्यतेनुसार “माझे सत्याचे प्रयोग..” हे बॅलिस्टर मो. क. गांधी यांचे आत्मचरित्र ते त्यांनी स्वत: लिहिलं आहे. असे आम्ही शाळा-कॉलेजात शिकलो. कारण आम्हांला तसे आमच्या गुरुजनांनी शिकवले. त्यात स्वत: बॅलिस्टर मो. क. गांधी लिहितात कि, “अफ्रिकेतून भारतात आल्यानंतर त्यांनी गुलाम मुक्तीची, वेठबिगारीची, हाताने संडास (या इथे मी ‘मैला’ शब्द लिहु शकत होतो, पण आताच्या नव्या पिढीला हा शब्द तितकासा ओळखीचा नाही. ज्या योगे कार्याचे नक्कि बोध व गांभिर्य कळले नसते) भरून टाकण्याची परंपरा बंद करू इच्छित होते. पण आसेतू हिमलयात... अखंड हिंदुस्थानात छोट्या-छोट्या राज्यांत विभागलेल्या राजांनी, सरदारांनी, नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही. पण तत्कालीन हिंदू महासभेच्या पुढाकाराने भारतीय राजकाणात अफ्रिकेत वकिल असलेल्या गांधीचा शिरकाव झाला. त्यावेळी बाळ टिळक यांचा गांधीना कमालीचा विरोध होता. हिंदुमहासभेत गांधीना सदस्यत्व मिळु नये म्हणून सदस्यांवर टिळकांचा दबाव होता. तरीही हिंदूमहासभेचे तत्कालीन अध्यक्ष (कागलकर) गोपाळकृष्ण गोख़ले यांनी बॅलिस्टर मो. क. गांधी यांना हिंदुमहासभेचे सदस्यत्व बहाल केले. याची साक्ष म्हणून स्वत:च्या आत्मचरित्रात बॅलिस्टर मो. क. गांधी लिहितात कि, “गोपाळकृष्ण गोख़ले हे माझे राजकिय गुरु आहेत.” 

जर हे सत्य असेल तर मग खरी गंमत तर पुढे आहे. 

१. बॅलिस्टर मो. क. गांधी यांच्या कार्यात सहभाग नोंदविण्यास अखंड हिंदूस्थानातील कोणताही नेता, राजा, सरदार त्यांना साथ द्यायला नव्हता.

२ हिंदूमहासभेचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोख़ले ह्यांनी बॅलिस्टर मो. क. गांधी यांना सदस्यत्व बहाल करण्यापूर्वी बॅलिस्टर मो. क. गांधी फक्त वेळ अपव्यव करत होते तत्कालीन नेतृत्वासमोर.... (सध्याच्या भाषेत राजकिय नेत्यांच्या मागे लागून टाईमपास करत होते.)

३. हिंदूमहासभेत सद्स्य होण्यापूर्वी बॅलिस्टर मो. क. गांधी यांच्या ब्ल्युप्रिंट मध्ये कोठेही “दलितोध्दाराची योजना” नव्हती. मग बॅलिस्टर मो. क. गांधी यांना बाळ टिळक यांचा कमालीचा विरोध अ‍सताना सुध्दा हिंदू महासभेत सदस्यत्व मिळाल्यानंतर “हरीजन” ह्या शब्दाने दलितोध्दाराची योजना कशी प्रसवली.

त्याचे उत्तर असे कि, “राजर्षी शाहू महाराज यांच्याच सांगण्यावरून बॅलिस्टर मो. क. गांधी यांना बाळ टिळक यांचा कमालीचा विरोध अ‍सताना सुध्दा हिंदू महासभेत सदस्यत्व हिंदूमहासभेचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोख़ले ह्यांनी बहाल केले होते. बॅलिस्टर मो. क. गांधी जरी स्वातंत्र्याचे जरी भोक्ते असले तरीही सनातनी परंपरेचे पाईक होते. स्पृश्य-अस्पृश्य जातभेद याचे पालन करणारे होते. कदाचित बहुसंख्य लोक दलितोध्दाराच्या योजनेमुळे दुरावतील म्हणून ही त्यांनी तत्कालीन परिस्थीतीत ही संकल्पने पासून दूर राहून यत्न करण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहु महाराजांना... शुद्रांच्या राजाला मदत मागायची कशी म्हणून संकोचत होते. तिथे त्यांनी पत्रा द्वारे विचारणा केली. विनंती नव्हे. 

बॅलिस्टर मो. क. गांधी यांचा उद्देश चांगला होता. समाजात नवी आशा जागवणारा होता. स्वातंत्र्य संग्रामात चेतना ओतणारा होता. म्ह्णुन मग छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी हिंदुमहासभेचे अध्यक्ष कागलकर गोपाळकृष्ण गोखले यांना बॅलिस्टर मो. क. गांधी यांना सदस्य करुन घेण्याचा आदेश दिला. त्यांनी शिरसांवद्य मानून प्रचंड विरोध असतानाही बॅलिस्टर मो. क. गांधी यांना हिंदुमहासभेचे सद्स्यत्व दिले. ही बाब कुठेही लिखित नाही. १९९६ मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेत भाषणासाठी माझे वर्ग शिक्षक सत्त्याप्पा कोरे गुरुजी यांनी बॅलिस्टर मो. क. गांधी हा विषय दिला होता. भाषणाची रंगीत तालिम घेताना माझ्या डॉक्टर असलेल्या आजोबांनी हे मला सांगितेले होते. ह्या संदर्भाचा मी तेंव्हा पासून मी शोध घेत होतो ज्याचा श्रीराम दादांच्या "शाहु" या कादंबरी ने संपवला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे खुप मोठे योगदान आहे. देशातील प्रत्येक क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक शाहु राजाला आदर देतो, नम्रपणा बाळगतो. ते ह्याच कारणांमुळे ! 

मग बॅलिस्टर मो. क. गांधी यांनी सत्याचे प्रयोग या त्यांच्या स्वलिखीत आत्मचरित्रात छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचा नामोल्लेख़ टाळावा. याचे मला वैषम्य वाटते. पक्षीय राजकारणाच्या आडोश्याला गेलेल्या ब-याच लेख़कांनी गांधी रंगवला. पण गांधीना साथ देणा-याना त्यांनी अक्षरश: पडद्याआडच ठेवले. का ? 

महाराजा सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती राजर्षी शाहु महाराज दोघेही तत्कालिन हिंदुस्थानाच्या विकासाचे नाणे. त्याचा छाप-काटा म्हणजे हे दोघे राजे. इंग्रजांचा पुरता अंमल असताना आपल्या प्रजेची काळजी घेऊन योजना राबविणे हे महत्तम कार्य खूप मोठे. आज गावात गटार बांधायची ग्राप सदस्याचा जीव मेटाकुटीला येतो. मग ती परिस्थीती कशी असेल ह्या आत्ताच्या पिढीला समजून येईल. भारतदेशातील सामाजिक क्रांती दोघांनीही आपआपल्या परीने केली. 

तसेही महाराजा सयाजीराव गायकवाड मोठा करताना छत्रपती राजर्षी शाहु महाराजांना झाकोळायचा किंबहूना नकारात्मक चित्रण करण्याचा प्रयत्न काही लेखकांनी केला आहे. तसा प्रयत्न श्रीराम पचिंद्रे यांनी केला नाही. हे विशेष ! 

छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे जीवन चरित्र हे कोणत्याही पुस्तकांत बंदिस्त होणार नाही. सामावणार नाही. कारण विकासपुरूष हा युगेयुगे जगतो. तो सोन्याची खान असतो. साल बदलली... पादशाही बदलली तरीही सोन्याची किंमत कमी झाली नाही. ती उत्तरोउत्तर वाढतच जाते. तसेच काहीसे ह्या युगपुरूषांचे आहे. वैश्विक चराचर अकल्पीत असलेल्या उर्जेकडून मानव धर्माला मिळालेली सप्रेम भेट आहे. श्रीराम पचिंद्रे यांनी लिहिलेली “शाहु” ही कादंबरी म्हणजे ह्या सोन्याच्या खानीतून घेतलेला तुकडा आहे. 

कालमानापरत्वे लोकांची वाचन शक्ती कमी होऊन क्षीण झाली आहे. सद्य काळी ह्या नवपिढीला स्वकुळाचा-स्वधर्माचा विसर पडला आहे. त्यांना अफवेतील शाहुच फक्त माहित आहे. त्यांना आपला मायबाप असलेल्या शाहु महाराजांना थोडक्यात समजून घ्यायचा असेल तर हीच ती शिदोरी.

श्रीराम पचिंद्रे लिख़ीत “शाहु” ही कादंबरी घरा-घरात प्रत्येक भाषेत भाषांतरीत झाली पाहिजे. म्ह्नजे “जगणं कसं जगाव” याचा प्रत्यय येईल. स्वत:चे कुटुंब चालविणे म्हणजे एक राज्य चालविण्यासारख़ेच आहे. प्रजा म्हणजे कुटूंबाचेच सदस्य होय. प्रत्येकाच्या ईच्छेनूसार त्याला हव नको ते बघणं हे कुटूंबप्रमुखाचे कर्तव्य तेच जे राजाचे कर्तव्य होय. 

श्रीराम पचिंद्रे माझे स्नेही-मित्र आहेत म्हणून मी हा लेख प्रपंच करतो आहे असे नव्हे. जे भावलं... जे गावलं... जे सत्य आहे... कसोटीवर खरं उतरलं म्हणुनच बंद केलेले फेसबुक अकाऊंट रिओपन केले आणि आपल्याशी शेयर केले. फेसबूक ने मताचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. ज्या पध्दतीने फेसबूक इंटरेसट बेस्ड जाहिरातींचा मारा करत आहे. त्याच धर्तीवर फेसबुक इंटरेसट बेस्ड कंटेटचा मारा युझरवर करत आहे. ज्याची कबुली मार्कझुकेरबर्गने स्वत: दिली आहे. त्यामुळेच मी ही व्यक्तिगत सोशल मिडीया पासून दुरच होतो. पण “शाहू” ही कादंबरी वाचली आणि स्वत:ला रोखु शकलो नाही. 


- अमरसिंह राजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!