बुद्धिजीवी वर्ग उतरला रस्त्यावर, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता सर्व पक्ष, संघटना, पत्रकार तसेच उच्चशिक्षित तरुण तरुणी यांचा राष्ट्रध्वज घेवून शांती मार्च!
कळंबोली/प्रतिनिधीः देशात शेतकऱ्याचे कंबरडे मोडणाऱ्या कृषी विधेयकाला मागे घेण्याकरिता मागील 40 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देन्या करिता समाजसेविका डॉ. वर्षा चौरे यांच्या नेतृत्वाखाली कामोठे सर्कल ते कळंबोली सर्कल पर्यंत हातात राष्ट्र ध्वज घेवून शांती मार्च काढण्यात आला. यावेळी शाहनवाज खान, योगेश निपाने, डॉ रुक्मिणी धायगुडे, रोशन शेख, इरफान शेख, शकील अहमद आदी उपस्थित होते.
सरकारच्या शेतीविषयक काळ्या कायद्यांचा जाहीर विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतातील शेतकरी आंदोलन करत आहेत. गेले 40 दिवसांपेक्षा अधिक काळापासून देशातील शेतकरी राजधानी मध्ये ठाण मांडून बसले आहेत. पण भारतभर शेतकऱ्यांचे चालू असलेले आंदोलन दडपण्यासाठी, सरकार पालकांच्या भूमिकेऐवजी भक्षकाच्या भूमिकेत वागत आहे.
या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपण अन्नदात्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरिता दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता कामोठे सर्कल ते कळंबोली सर्कल पर्यंत तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व पक्ष संघटना व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!