जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

...संसद नांगरावी असे म्हणतो !

घराणेशाहीच्या फिरंगी बाभळीने वेढलेली संसदच ,
एकदा आडवी उभी नांगरावी म्हनतो.

लोकशाहीच्या प्रत्येक पानावर
पडलाय पांढरा मावा. 
ही किड क्रांतीच्या रोगरने, 
कायमची चेंगरावी म्हनतो 

हे थिट्या प्याकेजचे मुरवान 
आपल्या गव्हाणी पर्यंत पोहंचत नाही.
आता संसद ते शिवार अशी
नवी पाईपलाईन पुरवावी म्हनतो.

आजपर्यंतचे सारेच बी किडके निघाले,
निघताहेत अजूनही.
आता माझ्या ओटीतल्या वानाची 
नव्याने पेरणी करावी म्हनतो.

माझा प्रत्येक हंगाम लुटायला टपल्यात व्याजखाऊ 
भोरड्या गोफणीच्या गुंड्याने 
नेम धरुन एक एक मारावी म्हनतो.

आरे ज्याचे खाता त्याला लाथा 
हि व्यवस्था आता चाबकाचे फोडावी म्हनतो 
संसदेच्या कपाळावरचा तो गोपीचंदन टिळा खुरपुन 
मुद्रा मातीची कायमची खुरप्याने कोरावी म्हनतो 
संसदच एकदा नांगरावी म्हनतो ..

कवी : दत्ता सरगर 

(सांगोल्याचे,प्राचार्य डॉ.आप्पासाहेब पुजारी यांनी स्वलिखीत श्रीसंत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र भेट दिल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!