मांस दिर्घकाळ टिकविण्यासाठी टोमॅटोचे कोटिंग उपयुक्त - प्रोसेसिंग उद्योगास संधी
मांस दिर्घकाळ टिकविण्यासाठी टोमॅटोचे कोटिंग उपयुक्त - प्रोसेसिंग उद्योगास संधी
महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीखाली मोठे क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्त्वाचे जिल्हे आहेत. खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतक-यांचे प्रमुख पिक आहे. टोमॅटोमध्ये शीर संरक्षक अन्नघटक मोठया प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्त्व अनन्य साधारण आहे. टोमॅटोमध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे तसेच खनिजे चुना, लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्येही पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्त्व वाढलेले आहे.
स्पेन येथील सीएसआयसी संशोधकांच्या पथकाने टोमॅटोच्या सहाय्याने जिलेटिन कोटिंग्ज साध्य केल्या असून ज्यामुळे मांस दीर्घकाळ स्टोरेज करण्यास मदत होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रोकेमिस्ट्री अँड फूड टेक्नॉलॉजी (आयएटीए-सीएसआयसी), स्पॅनिश नॅशनल रिसर्च काऊन्सिल (सीएसआयसी) आणि पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ वॅलेन्सिया (यूपीव्ही) यांनी टोमॅटो प्रोटीनच्या हायड्रोलायझेटने समृद्ध केलेल्या जिलेटिन कोटिंगची प्रभावितता दर्शविली आहे. ज्यामुळे मांस शिजवल्यानंतर या पेप्टाईड्सची अँटीऑक्सिडेंट क्रियाशीलता राखली जाते. आणि ते शरीरासाठी हानिकारक देखील नाही.
आयएटीए-सीएसआयसी मीट अँड मीट प्रोडक्ट्स बायोकेमिस्ट्री, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ग्रुपच्या संशोधकांनी टोमॅटोच्या त्वचेपासून विकसित केलेले कोटिंग्ज ताज्या मांसवर लावले असता ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. कोल्ड स्टोरेज दरम्यान त्यांचे शेल्फ लाईफ वाढते. आयएटीए-सीएसआयसीमधील शास्त्रज्ञ लेटिसिया मोरा यांच्या मते, "बायोएक्टिव्ह पेप्टाइड्सचा स्रोत म्हणून टोमॅटो उद्योगातील या उप-उत्पादनांचा वापर केल्यास त्यांना कमी किंमतीत अतिरिक्त मूल्य मिळते आणि यामुळे उद्योगातील टिकाव वाढण्यास मदत होते.”
महाराष्ट्रात टोमॅटोची लागण मोठ्या प्रमाणात केली जात असून टोमॅटो प्रोसेस करून अशा प्रकारची पेस्ट करून मास निर्यात करणाऱ्या कंपनींना ती पेस्ट पुरविता येऊ शकते ह्याबाबत भारतात देखील संशोधन होऊन व्यावसायिक वापर सुरु झाल्यास शेतकरींना टोमॅटो लागवडीतून उत्पन्न वाढू शकते.
Source : Agri Trade Media
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!