सिद्राम पाटील नावाचं वादळ अखेर शमले...
कागल: घरात राजकीय पिंड नसतानाही केवळ आपल्या बाहुबळाच्या जोरावर आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मदतीने कागल तालुक्यातील राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झालेले *म्हाकवे* (ता.कागल)येथिल माजी सरपंच, ना.हसन मुश्रीफ गटाचे कणखर नेतृत्व आणि खरेदी-विक्री संघाचे संचालक मा.सिद्राम दादू पाटील तथा दादा(वय७५)हे आज काळाच्या पडद्याआड झाले.त्यांच्या निधनाने गटाला धक्काच बसला आहे.
१९४५मध्ये अत्यंत गरीब आणि शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सिद्राम पाटील यांनी शिक्षणाकडे फारसे लक्ष न देता ऐन तारुण्यात राजकीय, सामाजिक क्षेत्रात उडी घेतली.अन्यायाविरुद्ध बंड करून उठण्यात ते माहीर होते.मुश्रीफ गटाचे ते सुरक्षाकवचच म्हणून संबोधले जात.
गोरगरीब, दिन-दलितासाठी ते आधारवड होते. मजबूत शरीरयष्टी, पैलवानी बांधा,गोरापान रंग,भारदस्त व्यक्तीमत्व असणारे सिद्राम पाटील हे म्हाकवे राजकीय पटलावरील वादळ तयार झाले.
२०१५च्या ग्रामपंचायत निवडणूकीत सिद्राम पाटील गटाने एकाकी झुंज देत ग्रामपंचायतीवर गटाची सत्ता प्रस्थापित केली होती. तलावातून पाणी योजना पुर्ण करून गावाला शुध्द पाण्याची पुर्तता करण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले. गत महिन्यातच ग्रामपंचायतीने१४व्या वित्त आयोगातून ही योजना पुर्ण केली.
शेतकरी आणि दुध उत्पादकांना न्याय देण्यासाठी त्यांनी जय भवानी दुध संस्थेची उभारणी केली.तसेच, हनुमान विकास सेवासंस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला.शायनिंग युवक मंडळातील कार्यकर्त्यांना त्यांनी सातत्याने बळ दिले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ गटाशी ते निष्ठेने कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे म्हाकवे गावच्या राजकीय पटलावर एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याचे मुल्यमापन होते. अशा भारदस्त व्यक्तीमत्व लाभलेल्या सिद्राम पाटील यांच्या मृताआत्म्यास चिरशांती लाभो..हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!!
-निवास मधुकर पाटील
म्हाकवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!