सांताक्रूझ मध्ये तीन घरे नाल्यात कोसळली महिलेसह तीन मुली वाहून गेल्या
सांताक्रूझ मध्ये तीन घरे वाकोला नाल्यात कोसळली महिलेसह तीन मुली वाहून गेल्या
सांताक्रूझ येथील वाकोला नाल्यात तीन घरे कोसळली
एका घराचे छत, दुसऱ्या घराची भिंत व तिसरे घर तळमाळा ११:३० वाजता सकाळी संपूर्ण कोसळले व या घरातील मिलिंद काकडे यांचे संपूर्ण कुटुंब नाल्यात वाहून गेले, त्यांची पत्नी रेखा व लहान मुलगी जान्हवी हिचे शव NDRF ची टीम व स्थानिकांनी खूप मेहनतीने शोधले. स्थानिकांनमध्ये सुनील कडवे व त्यांची दोन्ही मुले विशाल व केवळ होते. तसेच अनिकेत जाधव हे ही होते व सर्वात अगोदर घर पडल्या वर एक अडीज वर्षाची लहान मुलगी नाल्यात वाहताना अजय बुटीया व उमेश परब यांनी त्यांच्या घराजवळून (नवजीवन) येथून पाहिले व त्या मुलीचा पाठलाग करत धावत धावत पंचशील इमारती जवळ पोहचले व मुलगी दिसताच अजय बुटीया ह्या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उडी मारली त्या पाठोपाठ बबन बनसोडे ने सुद्धा उडी मारली अजय ने मुलीला पाण्यातच उचलून घेतले ह्या दोघांच्या मदतीला राकेश शेडगे यांनी नाल्यात येऊन अजय ला हाथ दिला व अजय कडून मुलगी घेऊन उमेश च्या ताब्यात दिली उमेश ने मुलीला उचलून घेतलं तिथे मनसे चे ८९ चे शाखा अध्यक्ष संतोष उप्रलकर बाईक घेऊन तयारच होते यांनी मुलीला व्ही. एन. देसाई रुग्णालय येथे घेऊन जायला लागले व पाठी मागच्या सीट वर बसलेले उमेश मुलीचे पोट दाबत होते.जेणे करून पोटातील पाणी निघावे व पाणी निघाले उल्टी निघाली बाईक हॉस्पिटल ला पोहचली. डॉक्टर ने सुद्धा वेळ वाया न घालवता उपचार सुरू केले व ह्या सर्वांनी मिळून शिवण्या ह्या अडीज वर्षाच्या मुलीचा जीव वाचवला अजून ही ७ वर्षाची श्रेया सापडली नाही आहे उद्या परत NDRF ची टीम व स्थानिक सुनील कडवे व सहकारी सकाळ पासून शोध मोहीम राबविणार आहेत.
पण प्रश्न हे सुद्धा आहेत की...
१)नालेसफाई झाली असती तर हा अपघात घडला असता का ?
२)शासन, प्रशासन जीवित हानी झालेल्या कुटुंब प्रमुखाला काही मानधन देईल का ?
३) ज्या तीन ही घरांचे नुकसान झाले ते ती घर बांधून अथवा योग्य जागी स्थलांतर करणार का?
४) भविष्यात अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून संरक्षण भिंत व नाले सफाई करणार का ?
आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे कोन देणार?
नितिन कांबळे
मीडिया वार्ता न्युज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!