राजकारणातील स्थितप्रज्ञ तेजस्वी तारा निखळला!
लातूर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे दुःखद निधन.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे शिल्पकार डॉ शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. परवाच कोरोनावर मात करून ते घरी परतले तेंव्हा सगळ्यांनाच मोठा आनंद झालेला पण आजची पहाट तो आनंद अल्पायुषी ठरविणारी निघाली.
दादा म्हणजे राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तीमत्व. त्यांची निर्व्यसनी जीवनशैली तर आजच्या तरूण पिढीसाठी आदर्श ! लातूर जिल्ह्याच्या निर्मितीपासून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अतुलनीय असे आहे. पाटबंधारे विभागामार्फत त्यांनी मोठे कार्य उभे केले. दादांच्या दुःखद निधनाने राजकारणातील एक पर्व शांत झाले आहे, न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ शिवाजीराव निलंगेकर पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तस्वकीयांना व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दादांच्या जाण्याने राजकारणातील एक स्थितप्रज्ञ तेजस्वी तारा निखळला!
काही प्रसंगात अव्वल, अस्सल आणि गरज असेल तेव्हा अट्टल काँग्रेसवाले कसे होते, याचे अत्यंत लक्षवेधक उदाहरण.
ब्राम्हणी मिडियाने म्हणजे गोन्द्या-म्हाद्याच्या पत्रकारितेने आणि अर्धवट समाजवादी माणक्या जाधव यांनी निलंगेकर यांना बदनाम केले.
अत्यंत फडतुस, फालतू आणि सबळ पुरावा नसलेल्या गुणवाढ प्रकरणात मटा-लोकसत्तातुन झालेल्या आरोपानी मुख्यमंत्रीपद गेले. बहुजन समाज-काँग्रेस- ग्रामविकास-मराठा समाज हाच खेड्याचा कारभारी हे सूत्र अधिक ठळक करणारा पुढारी.
बंटी-चंटी-मॉन्टी अशा आजच्या काँग्रेसवाल्यानी आहार-विहार याचे अनुकरण करावा असा हा पुढारी.
...लातूरच्या आरएसएस वाल्यानी उद्ध्वस्त केलेली लातुरातली शेवटची टोपी. पण इतिहास त्यांची नोंद घेईल.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!