गवार शेंग...
गवार शेंग भाजी तशी फार लोकप्रिय नाही. मात्र मधुमेही व्यक्तींनी जरूर गवारशेंग भाजी खावी. कारण त्यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहते. या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत.
गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला एक टॉनिक मानले जाते.
गवारीत फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटाच्या अनेक विकारांवर ती गुणकारी ठरते. एक सौम्य रेचक म्हणून गवारीचा उपयोग होऊ शकतो.
गर्भवतींसाठी गवार उपयुक्त आहे. कारण त्यात लोह आणि कॅल्शियमचा साठा आहे.
आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, ही भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गवारीमध्ये आढळून येणाऱ्या फायबरला कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानले आहे.
गवारीला पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो. आदिवासी लोक दमा रुग्णांना गवारीच्या शेंगा कच्च्या खाण्याचा सल्ला देतात.
गवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या 3-4 कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.
गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून दुसर्या दिवशी या बिया बारीक करून सूज, सांधेदुखी, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो.
गवार खाणे वाताच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. मात्र गवार खाणे कफाच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे.
गवारीच्या बियांपासून गवार गम नावाचा कॉर्नस्टार्चसारखा पदार्थ घट्टपणा आणण्यासाठी आईस्क्रीम,पनीर किंवा इतर अनेक पदार्थात वापरला जातो.
पोटाचे अनेक विकार विशेषत: अतिसार, मधुमेह, कोलेस्टेरॉल यांसारख्या रोगांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधातही गवार गमचा वापर होतो.
डायबिटीस मधूमेह साठी ऐक चमत्कारिक औषध -24तास शूगर शी फाईट देनारे. व मधूमेह पासून उत्पन्न होणार्या 40प्रकारच्या रोगापासून बचाव करनारे व सुरू असलेल्या अॅलोपेथिक गोळ्या ईन्सूलीन पण काही दिवसातच बंद करता येनारे. -(शूगर फाईटर)-
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!