जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

वंशावळी-वंशवेल (Family Tree) म्हणजे काय व ९ पिढयाची वंशावळी कशी जुळवावी

वंशावळी-वंशवेल (Family Tree) म्हणजे काय व 
९ पिढयाची वंशावळी कशी जुळवावी
(वंशावळी#स्वतःवडील-आजोबा-पंजोबा-खापरपंजोबा-पन्तू-नातू-अन्तू-खातू-नातू)
महसुल लेखः शुक्रवार दिनांक: ८ मे २०२०

आपण सर्वसाधारणपणे आपल्या पुर्वजांच्या वंशाची, कुळातील पूर्वजांच्या वंशावळी ही काही अपवादात्मक कारणांसाठीच जुळविण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणा-या काही महत्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये वंशावळी हा एक भाग आहे. परंतु हा वंशावळी जुळविण्याचा व शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतूदीसाठी सिमीत आहे. कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील व वडीलांचे वडील म्हणजे आजोबा इथपर्यंतच हा वंशावळीचा विषय मर्यादित होतो.

परंतु काही शहरात आजचा मुंबईस्थित तरूण वर्ग  व उत्साही चाकरमाणी  आपली वडीलोपार्जित मालकीची जागा, कुळाची जागा, वंशाची वंशावळी या पारंपरिक व महत्वाच्या गोष्टीचा शोध लावण्याचा व ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत व बहुतेक लोकांना यात यशही आले आहे व येत आहे.

आपण आपल्या पुर्वजांच्या वंशाची साधारणतः ९ पिढ्याच्या वंशाची वंशावळी शोधू शकतो जुळवू शकतो. या सर्व प्रकारात महसुल  विभागाचा दस्तैवजांपैकी काही महत्वाचे दस्तैवज खालीलप्रमाणे-

१)जंगलखर्डा नोंदवही पत्रक सन १८८६- सदर नोंदवहीत आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः १८२० साली झाला होता त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे ज्यांचा जन्म सन १७०० ते १७२० च्या आसपास झाला आहे त्या वंशातील मुळपुरुषाचे नाव नोंद असते. म्हणजे आपण ७ व ८ व ९ क्रमांकाची पुरुषाची वंशावळी या दस्तैवजावर नोंद असते.

२)बोटखत नोंदवही १८९५ - या दस्तैवजावरून आपण साधारण ७ व ८ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

३)प्रतीबुक हिस्सावार पत्रक नोंदवही- दस्तैवजावरून आपण साधारण ६ व ५ व ४ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

४)आकारफोड पत्रक १९५७-
दस्तैवजावरून आपण साधारण ४ व ३ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो. सन १९५६-१९५७ रोजी आपल्या जमीनीवर कसतव नोंद असलेले पूर्वज यांची माहीती आकारफोड पत्रकात मिळते.

५)फेरफार पत्रक नोंदवही व मेळाची फाईल-फेरफार दस्तैवज संचिका- गावनमुना ६अ, तसेच गुणपत्रिका  या दस्तैवजावरून  वंशावळीतील ३ व ४ क्रमांकाच्या पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

६)विदयमान २०२० चा ७/१२ उतारा- यावर आपले व आपल्या वडीलांचे नाव असते म्हणजे क्र.१ व २ क्रमांक  ची वंशावळी येथे जुळली जाते.

महसुल जमीन माहीतीकामे इतर महत्वाचे दस्त-
७) टिपनबुक नोंदवही-
(जागेचे सर्व्हे, वर्णन नोंद व मुळ भोगवटाधारक सदर बुकात सापडतात. साधारण १८४० ते १८८० या कालावधीच्या नोंदी)

८)सुडपत्रक-सुडाचा उतारा सन १८६४-सुडाच्या मुळ उता-यास जमाबंदी पत्रक असेही म्हणतात. जागेचे वर्णन याबाबत माहीती.

यापैकी कोणते दस्तैवज कोठे अर्ज करावेत.

१) जंगलखर्डा नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय
२) बोटखत नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय
३)प्रतीबुक हिस्सावार पत्रक नोंदवही-
तालुका भूमी अभिलेख तथा भुमापन विभाग कार्यालय
४) आकारफोड पत्रक- तालुका भूमी अभिलेख तथा भुमापन विभाग कार्यालय
५) टिपनबुक नोंदवही-भुमापन तथा भुमीअभिलेख विभाग तहसील
६) मेळाची फाईल-तहसिल/तलाठी कार्यालय
७) फेरफार नोंदवही/गुणपत्रिका/गावनमुना ६अ, ७/१२ उतारा-तलाठी कार्यालय
८) मेळ साक्षीदार पुरावा-तहसिलदार/तलाठी कार्यालय/ 

वंशावळी(Family Tree) जुळणी करून तहसिल क्षेत्रातील दुय्यम निबंधक तथा सक्षम महसुल प्रमाणक अधिकारी मार्फत प्रमाणित करावी. सदर प्रकरणातील टिपनबुक(सन १८४० ते सन १८८०), सुडाचा उतारा १८६४-सुडपत्रक, जंगलखर्डा नोंदवही १८८६ व बोटबुक नोंदवही-१८९५, ही मोडी लिपीमध्ये तहसिल कार्यालय/भुमापन तथा भुमीअभिलेख यांचे कार्यालयात उपलब्ध होते. त्याचे मराठीमध्ये शासकीय मोडीलिपी तज्ञाकडुन प्रमाणीत हस्तांतर करून घ्यावे. उपरोक्त महसुल वंशावळी संबधित माहीती व दस्तैवज हे महाराष्ट्रातील विविध तालुका-जिल्हा महसुल कार्यालयातून प्रत्यक्ष गोळा केलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे आहेत.वाचकांनी इतरही महसुल दस्तैवजांचीही माहीती घ्यावी व अभ्यास करावा.

व सदर दस्तैवज हे शासकीय नमूद महसुल विभागात अर्ज करून प्रत्येक दस्तैवज हा रुपये २/- ते जास्तीत जास्त रुपये १०/-व पेक्षा कमी जास्त शासकीय नियमानुसार भरणा करुन(प्रत्येक पृष्ठ) उपलब्ध होतात.
सदर वंशावळी जुळवणी संदर्भात माझा मुळ लेख हा २० एप्रिल २०१८ रोजी प्रसारित झाला होता. आता पुन्हा एकदा लोकांच्या माहीती व आग्रहावरून माझ्या पेजवर प्रसारित करत आहे. मुळ लेखात फेरफार-बदल करताना लेखकाची परवानगी घ्यावी. 

All Right Reserve @Copyright
महसुल लेखन व संशोधन :
DR. RANJANA B. KHOCHARE
PHD IN LAW, LLM, LLB, MBA, DBM, DCL
ADVOCATE BOMBAY HIGHCOURT 
SUNIL BHADEKAR
LLB, MBA(FINANCE), BCOM
-9920945107-9029644000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!